मुंबई, 15 डिसेंबर : आपण सुंदर, आकर्षक दिसावं, असे प्रत्येकाला वाटतं. आपला रंग गोरा (Fair Skin) असावा असं वाटत राहतं आणि गोरं होण्यासाठी अनेक उपाय केले जातात. गोरे होण्यासाठीची विविध क्रीम (Side effect of Fairness Creams) बाजारात उपलब्ध आहेत. गोरेपणाची इतकी क्रेझ आहे, की महिला किंवा मुली कोणतं ना कोणतं क्रीम किंवा कॉस्मेटिकचा वापर करून रंग उजळवण्याचा प्रयत्न करत असतात. पण, याचा परिणाम उलट होतो. केमिक्लसमुळे त्वचा खराब होते. रंग गोरा (Skin Lightening Creams) करण्याची हमी देणाऱ्या बाजारात अनेक कंपन्या असल्याचे दिसून आले आहे. जर तुम्ही अशाच गोरे करून देण्याचा दावा करणाऱ्या कंपनीचं क्रीम वापरत असाल तर आताच सावध व्हा.
नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या मते, रंग उजळ करणाऱ्या क्रीमचे अनेक दुष्परिणाम असतात. त्वचेची जळजळ होणे, चेहरा लालसर होणे, त्वचेला खाज सुटणे, त्वचा खराब होणे, तसेच त्वचेचा रंग गडद होणे किंवा उजळ होणे, त्वचा पातळ होणे, चेहऱ्यावर चट्टे आणि डाग येणे हे क्रिमचे दुष्परिणाम (Whitening Creams Side Effects) आहेत.
हे वाचा - वजन कमी करण्यासाठी 'ग्रीन कॉफी' Best पर्याय, जाणून घ्या त्याचे जबरदस्त फायदे
तुमच्या त्वचेचा रंग शरीरातील मेलेनिनच्या पातळीवर अवलंबून असतो. गोरे करणाऱ्या क्रिम्सचा परिणाम तुमच्या शरीरातील मेलेनिनवर होतो आणि तुमचा रंग थोडा उजळ होतो. फेअरनेस क्रिम्समुळे तुमच्या शरीरातील मेलेनिन कमी होते आणि तुम्ही गोरे दिसू लागता. रंग उजळ करणाऱ्या कोणत्याही क्रिमचा वापर जास्त काळ करू नये, असं तज्ज्ञ सांगतात.
बाजारामध्ये विविध क्रीम आणि इतर सौंदर्य उत्पादनं उपलब्ध आहेत. रंग गोरा करण्याचा दावा करणाऱ्या क्रिमध्ये पॅराबेन्स नावाचा धोकादायक पदार्थ असतो. याचा आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. फेअरनेस क्रिममध्ये मुख्यतः हायड्रॉक्विनॉन (hydroquinone) आणि कॉर्टिकोस्टिरॉईड्स (corticosteroids) या दोन प्रकारचं ब्लिचिंग असतं. तज्ज्ञांच्या मते, क्रिममध्ये नेहमी हायड्रॉक्विननचं (hydroquinone) प्रमाण 4% पेक्षा कमी असायला हवं.
हे वाचा - तुम्हीही उभं राहून पाणी पिता का? जरा थांबा; आधी वाचा पाणी पिण्याची योग्य पद्धत
आपल्या त्वचेचा रंग हा नैसर्गिक असतो. त्यामुळे तो बदलण्याचा प्रयत्न करू नये. जास्त क्रीमचा वापर हा तुम्हाला वेळेपूर्वीच म्हातारे दिसू शकतो. त्यामुळे बाजारातील आकर्षक जाहिरातींना बळी पडू नये. आपण जसे आहोत, तसा स्वतःचा स्वीकार करावा. नैसर्गिक सौंदर्य खुलवण्यासाठी निरोगी आहार, व्यवस्थित झोप आणि व्यायाम याची मदत घ्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beauty tips, Health, Lifestyle