मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

वजन कमी करायचंय? ब्लॅक कॉफी प्या ! अट मात्र एकच...

वजन कमी करायचंय? ब्लॅक कॉफी प्या ! अट मात्र एकच...

वजन कमी करण्यासाठी जिमपासून(Gym) ते महागड्या औषधांपर्यंत अनेक उपाय केले जातात. पण घरच्या उपायांनीदेखील तुम्ही वजन कमी (WeightLoss) करू शकता. दररोज व्यायाम करण्याबरोबरच ब्लॅक कॉफीचं (Black Coffee) देखील सेवन करू शकता.

वजन कमी करण्यासाठी जिमपासून(Gym) ते महागड्या औषधांपर्यंत अनेक उपाय केले जातात. पण घरच्या उपायांनीदेखील तुम्ही वजन कमी (WeightLoss) करू शकता. दररोज व्यायाम करण्याबरोबरच ब्लॅक कॉफीचं (Black Coffee) देखील सेवन करू शकता.

वजन कमी करण्यासाठी जिमपासून(Gym) ते महागड्या औषधांपर्यंत अनेक उपाय केले जातात. पण घरच्या उपायांनीदेखील तुम्ही वजन कमी (WeightLoss) करू शकता. दररोज व्यायाम करण्याबरोबरच ब्लॅक कॉफीचं (Black Coffee) देखील सेवन करू शकता.

मुंबई, 21 डिसेंबर: आजच्या या धकाधकीच्या जीवनात वजन वाढीच्या (Weight Gain) समस्येने अनेक जण त्रस्त आहेत. घरून काम करणाऱ्या व्यक्तींमधे ही समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. जिमपासून(Gym) ते महागड्या औषधांपर्यंत अनेक उपाय केले जातात. पण घरच्या उपायांनीदेखील तुम्ही वजन कमी (WeightLoss) करू शकता. यामध्ये तुम्ही दररोज व्यायाम करण्याबरोबरच ब्लॅक कॉफीचं (Black Coffee) देखील सेवन करू शकता. यामध्ये वजन कमी करण्यासाठी आणि नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते. कोरोनाच्या(Covid 19) या संकटकाळात अनेकजण घरून काम करत आहेत. लॅपटॉपवर तासनतास एकाच जागेवर बसून काम करावं लागत आहे. त्यामुळं या व्यक्तींना ब्लॅक कॉफीचा खूप फायदा होणार असून वाढत्या वजनाला नियंत्रित करण्यासाठी ब्लॅक कॉफी तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. 1)Bio-active compounds कॉफीमध्ये असणाऱ्या बायो ॲक्टिव्ह कंपाउंडचा वजन कमी करण्यासाठी खूप फायदा होतो. ब्लॅक कॉफीमध्ये क्लोरोजेनिक ॲसिड (Chlorogenic Acid), कॅफिन (Caffin), ट्रायगोनेलिन आणि मॅग्नेशियम असतं. वजन कमी करण्यात या घटकांची भूमिका जास्त असल्याने वजन कमी करण्यात आणि संतुलित राखण्यास मदत होते. एका अभ्यासात ही गोष्ट समोर आली असून यामध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांना ब्लॅक कॉफीचा फायदा जास्त होतो. पुरुष वजन वाढवण्याकडे अधिक जोर देत असल्यानं त्यांना याचा जास्त फायदा होतो. 2)कमी कॅलरीज् ब्लॅक कॉफीमध्ये कमी प्रमाणात कॅलरी असतात. त्यामुळे वजन कमी करण्यात हे फायदेशीर ठरू शकतं. परंतु अनेक जणांना कॉफीमध्ये साखर, दूध आणि क्रीम घालून प्यायची सवय असते. त्यामुळे याचा फायदा होत नाही. ब्लॅक कॉफीमध्ये झिरो फॅट(Zero Fat) आणि कॅलरी (Calorie) असल्यानं वजन कमी करण्यात मदत करते. वजन कमी करायचं असेल तर मात्र दूध आणि साखरेचा वापर टाळणं आवश्यक आहे. त्यामुळं वजन कमी होण्याऐवजी ते वाढू शकतं. 3)इन्सुलिन लेव्हलचं संतुलन ब्लॅक कॉफीमध्ये असणाऱ्या क्लोरोजेनिक ॲसिडमुळं शरीरातील इन्सुलिन पातळी कमी राहण्यास मदत होते. आपल्या आहारामुळं आपली शरीरातील साखरेची पातळी सतत वाढत असते. वाढत्या वजनामुळं टाईप-2 डायबेटिस होण्याची शक्यता असते. त्यामुळे साखरेची पातळी मोठ्या प्रमाणात वाढते. ब्लॅक कॉफीच्या सेवनामुळे यात तुम्हाला मोठी मदत होते. 4)कॅफिन कॅफिनमुळे (Caffeine) भूक नियंत्रित येते. यामुळे अवास्तव खाण्याचा तुमचा मूड होत नाही. सतत काम करत राहिल्यानं तसंच रात्री जागवं लागल्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात कॉफी सेवन करतात. यामुळं नर्व्ह् सिस्टीमवर देखील याचा प्रभाव पडतो. त्यामुळे वजन नियंत्रित होण्यास मदत होते. स्प्रिंजर लिंकमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, कॅफिन नर्व्हस सिस्टीमवरील परिणामाद्वारे शरीरातील फॅटच्या ऑक्सिडेशनवर प्रभाव पाडते. त्यामुळे वजन वाढत नाही. त्याचबरोबर एका अभ्यासात याचे परिणाम दीर्घकाळ नसल्याचंदेखील सामोर आलं आहे. त्यामुळे जे ब्लॅक कॉफी पितात त्यांची भूक कमी होऊन वजन नियंत्रित करण्यास मदत होते. पण या सगळ्याचा प्रभाव काहीकाळ होत असल्यानं याचा वजन कमी करण्यास दीर्घकाळ फायदा होत नाही.
Published by:Amruta Abhyankar
First published:

Tags: Lifestyle

पुढील बातम्या