FACT CHECK: 14 फेब्रुवारीपर्यंत एक तरी बॉयफ्रेंड मिळवा, कॉलेजनेच विद्यार्थिनींना दिलेला आदेश खरा आहे का?

FACT CHECK:  14 फेब्रुवारीपर्यंत एक तरी बॉयफ्रेंड मिळवा, कॉलेजनेच विद्यार्थिनींना दिलेला आदेश खरा आहे का?

सध्या सोशल मीडियावर व्हॅलेनटाइन्स डे (Valentine's day ) साठी एक तरी बॉयफ्रेंड मिळवा, असं एका कॉलेजचं परिपत्रक व्हायरल होत आहे. St John's College च्या नावाने फिरणारी ही सूचना खरी आहे की fake?

  • Share this:

आग्रा, 27 जानेवारी: पुढच्या महिन्यात असलेल्या Valenetine Day 2021 ची तयारी आणि त्यासंदर्भातल्या बातम्या सुरू झाल्या आहेत. पण त्यातली एक निश्चितच चक्रावून टाकणारी आहे. एका कॉलेजनेच म्हणे परिपत्रक काढून सर्व विद्यार्थिनींनी 14 फेब्रुवारीच्या आत स्वतःसाठी बॉयफ्रेंड शोधून ठेवा असा फतवा काढला.  ही बातमी सोशल मीडियावर बरीच फिरते आहे. खरंच असं काही झालं आहे की ही Fake News आहे?

आग्रा (Agra college Valentine's day) येथील एका कॉलेजने जारी केलेले परिपत्रक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या परिपत्रकाची जोरदार चर्चा आहे. यामागचं कारण म्हणजे या कॉलेजने विद्यार्थिनींना 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेनटाईन्स डेच्या आधी किमान एक तरी बॉयफ्रेंड शोधा असं सांगितलं आहे. खरंच कॉलेजकडून विद्यार्थिनींना असे आदेश देण्यात आले आहेत की नाही? या परिपत्रकामध्ये कितपत सत्यता आहे?

सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होणारे हे परिपत्रक आग्रा येथील सेंट जॉन्स कॉलेजने (St John's College) जारी केलेलं आहे. या परिपत्रकावर कॉलेजचा औपचारिक लोगो आणि पत्रकाच्या शेवटी कॉलेज अधिकाऱ्याची डिजिटल सही आहे. सेंट जॉन्स कॉलेज ही आग्र्यातील सर्वात जुनी शैक्षणिक संस्था आहे. 1859 साली ब्रिटिशांनी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली होती.

व्हायरल झालेले परिपत्रक 14 जानेवारीचं आहे. या परिपत्रकात असं लिहिलं आहे की, '14 फेब्रुवारीपर्यंत सर्व मुलींनी किमान एक तरी बॉयफ्रेंड मिळवणे बंधनकारक आहे. सुरक्षेच्या उद्देशाने हे केले गेले आहे. एकट्या मुलीला कॉलेजच्या आवारामध्ये प्रवेश करण्याची परवानगी देता येणार नाही. त्यांना आपल्या बॉयफ्रेंडसोबतचा सध्याचा फोटो दाखवावा लागणार आहे. प्रेम पसरवा.'

सेंट जॉन्स कॉलेजच्या लेटर हेडवर लिहिलेला हा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या परिपत्रकावर कॉलेजचे असोसिएट डीन आशिष शर्मा यांची सही आहे. या परिपत्रकाचे रिव्हर्स गुगल सर्च (reverse Google search )  केल्यावर काहीही रिझल्ट आला नाही. पण यावरील लोगोचा काही भाग रिव्हर्स गुगल सर्च केल्यानंतर तो संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवर घेऊन जातो. दरम्यान, प्रत्यक्ष अधिकृत वेबसाईटवर 'Notices/Upcoming and Highlights' या विभागात 2021 ची परिपत्रकं तपासली असता यामध्ये अशा प्रकारच्या आशयाचे कोणतेही परिपत्रक सापडलं नाही.

सेंट जॉन्स कॉलेजचे प्राचार्य एस. पी. सिंग यांनी याप्रकरणी सोमवारी स्पष्टीकरण देणारं पत्रक जारी केलं. त्यांनी सांगितलं की, 'आमच्या लक्षात आले आहे की काही टवाळखोर लोकांनी कॉलेजच्या अधिकाऱ्यांना चुकीचे मेसेज पाठवले आहेत. कॉलेजचे नाव आणि प्रतिष्ठा खराब करण्याचा या मागचा हेतू असल्याचे दिसून येत आहे.' द फ्री प्रेस जर्नलने आपल्या वृत्तामध्ये ही माहिती दिली आहे.

हे देखील वाचा - NonVeg न खाता कसं मिळवाल Vitamin? जाणून घ्या महत्त्वाचे 5 Veg स्रोत!

'विद्यार्थ्यांनी अनधिकृत माहितीकडे दुर्लक्ष करावे. कॉलेजचे अधिकारी अशाप्रकारचे गैरवर्तन करणाऱ्यांचा शोध घेतील आणि त्यांच्यावर कारवाई करतील.', असं देखील एस. पी. सिंग यांनी सांगितलं. दरम्यान, यावर्षामधील ही पहिली घटना नाही. याआधी देखील अशाच प्रकारचे एक परिपत्रक व्हायरल झाले होते. चेन्नईच्या 'एसआरएम' युनिव्हर्सिटीच्या ( SRM University) नावाने हे परिपत्रक होते. या परिपत्रकावर मात्र तारीख वेगळी होती.

Published by: Aditya Thube
First published: January 27, 2021, 10:22 PM IST

ताज्या बातम्या