मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

डोळा लवणं हे शुभ-अशुभाचे की 'या' आजाराचे आहेत संकेत? वेळीच द्या लक्ष

डोळा लवणं हे शुभ-अशुभाचे की 'या' आजाराचे आहेत संकेत? वेळीच द्या लक्ष

डोळा लवण्यामुळे काही तरी अशुभ घडतं, ही केवळ अंधश्रद्धा असून डोळा लवण्याचा संबंध थेट आरोग्याशी आहे. डोळ्यांच्‍या स्नायूंचं आकुंचन झाल्‍याने डोळे लवतात.

डोळा लवण्यामुळे काही तरी अशुभ घडतं, ही केवळ अंधश्रद्धा असून डोळा लवण्याचा संबंध थेट आरोग्याशी आहे. डोळ्यांच्‍या स्नायूंचं आकुंचन झाल्‍याने डोळे लवतात.

डोळा लवण्यामुळे काही तरी अशुभ घडतं, ही केवळ अंधश्रद्धा असून डोळा लवण्याचा संबंध थेट आरोग्याशी आहे. डोळ्यांच्‍या स्नायूंचं आकुंचन झाल्‍याने डोळे लवतात.

मुंबई, 19 जानेवारी: आपले डोळे लवणं किंवा फडफडण्याबद्दल (Eye Twitching) समाजात विविध अंधश्रद्धा अस्तित्वात आहेत. कोणता डोळा लवत आहे, यावरून शुभ-अशुभ घटनांचा अंदाज बांधला जातो. डोळा लवण्यामुळे काही तरी अशुभ घडतं, ही केवळ अंधश्रद्धा असून डोळा लवण्याचा संबंध थेट आरोग्याशी आहे. डोळ्यांच्‍या स्नायूंचं आकुंचन झाल्‍याने डोळे लवतात. डोळा लवण्याची क्रिया काही सेकंदं किंवा मिनिटांनंतर स्वतःहून थांबते; पण असं होत नसेल तर ते डोळ्यांच्या आजाराचं लक्षण असू शकतं. याबाबत खबरदारी बाळगणं गरजेचं आहे. डोळे उघडणं आणि बंद करण्याचं काम करणारे Orbicularis Oculi हे स्नायू आपलं काम योग्य तऱ्हेने करत नाहीत, तेव्हा डोळा लवतो. तसंच यामागे इतरही काही कारणं आहेत. ती कोणती हे आपण जाणून घेऊ या.

कधी उद्धवते ही समस्या?

डोळ्यांना संसर्ग (Eye Infection) झाल्यास डोळे लवण्याची समस्या निर्माण होऊ शकते. डोळे खूप कोरडे पडले, जळजळ झाली किंवा डोळ्यांत पाणी येत असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. याशिवाय, मज्जासंस्थेशी संबंधित समस्यांमुळेही डोळे लवण्याची समस्या उद्भवू शकते.

हे वाचा-आश्चर्य! 4 हात आणि 4 पाय; भारतात जन्माला आलं असं विचित्र बाळ; डॉक्टर म्हणाले...

रात्रीची झोप कमी झाली आणि थकवा आला, की डोळे लवण्याचं प्रमाण वाढतं. कामाच्या वेळी एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करताना डोळ्यांचा वापर जास्त होतो. अशा परिस्थितीत झोप कमी झाली असेल, तर डोळ्यांच्या स्नायूंना विश्रांती मिळत नाही आणि डोळा लवतो. यासाठी पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे.

डोळे लवण्याची समस्या तणावामुळेसुद्धा उद्भवू शकते. ताणतणावांवर नियंत्रण ठेवलं, तर डोळ्यांचं लवणं थांबतं. साध्या कारणांमुळे डोळे लवण्याची समस्या उद्भवत असेल, तर ते थांबवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. यासाठी डोळ्यांना उबदार कापड लावल्यास डोळे लवणं थांबतं.

हे वाचा-Dolo650 | कोरोनामध्ये सर्वात जास्त हिट ठरलं हे स्वदेशी औषध!

कॅफिनचं अतिसेवन हेदेखील डोळे लवण्याचं कारण आहे. चहा, कॉफी, सोडा, चॉकलेट या सर्वांमध्ये कॅफिन असतं. त्यामुळे डोळा लवतो. म्हणून आपल्या आहारात कॅफिन हळूहळू कमी करावं किंवा ते घेणं पूर्णपणे थांबवावं. यामुळे डोळे लवण्याची समस्या कमी होईल.

डोळे हा फार नाजूक अवयव असून, ते खूप संवेदनशील असतात. त्यामुळे डोळ्यांची योग्य काळजी घेणं महत्त्वाचं आहे. डोळे फार अमूल्य असून, त्यांच्या आजाराबाबत दुर्लक्ष करू नये. आपल्या डोळ्यांचं आरोग्य (Eye Health) आपल्या हातात असतं. यासाठी योग्य आहार घ्यावा आणि डोळ्याची योग्य काळजी घ्यावी. असं केल्यास दृष्टी सुधारण्यासाठीही मदत होते.

First published:

Tags: Eyes damage, Health, Health Tips