Home /News /lifestyle /

Facebook टॅगमुळे नवऱ्याचं पितळ उघड! घटस्फोटामागचं खरं कारण आलं बायकोसमोर

Facebook टॅगमुळे नवऱ्याचं पितळ उघड! घटस्फोटामागचं खरं कारण आलं बायकोसमोर

एका Facebook Tag मुळे तिला आपली फसवणूक झाल्याचं कळलं. महिलेने आपल्या Ex Husband चा खरा चेहरा जगासमोर आणला आहे.

 नवी दिल्ली, 31 जुलै : सोशल मीडियावर (Social Media) जगभरातले लाखो, कोट्यवधी लोक जोडलेले असतात. त्यामुळे एखादी गोष्ट अगदी वाऱ्याच्या वेगाने सगळीकडे पसरते. तसंच एखादं गुपितही यामुळे उघडकीस येऊ शकतं. फसवणूक करणाऱ्या पतीचं (Husband) गुपित सोशल मीडियामुळे पत्नीला (Wife) कळल्याची एक घटना घडली आहे. तिने आपल्या पतीचा खरा चेहरा जगासमोर आणला आहे. या घटनेमुळे आपल्या पतीवर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या महिलांना एक धडा मिळाला आहे. 'आज तक'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. नाओमी (Naomi) नावाच्या महिलेनं आपला हा अनुभव सांगितला आहे. पतीनं तिची फसवणूक केल्याची गोष्ट Facebook Tag उघडकीस आली. नाओमी आणि तिचा पती डेव्हिड (David) यांनी आठ महिन्यांपूर्वी घटस्फोट घेतला होता; पण अचानक एक दिवस नाओमीला एक फेसबुक नोटिफिकेशन (Notification) आलं, त्यात तिला टॅग करण्यात आलं होतं. डेव्हिडच्या आंटीनं त्याला आणि नाओमीला मुलगा झाल्याबद्दल अभिनंदन केलं होतं. आई आणि बाळ दोघंही सुखरूप असल्याचं आणि आपण बाळाला भेटण्यासाठी आतुर असल्याचं त्यात म्हटलं होतं. ही पोस्ट बघून नाओमी आश्चर्यचकीत झाली. कारण त्याने नाओमीपासून आपण विभक्त झाल्याचं सर्वांपासून लपवलं होतं हे या पोस्टवरून स्पष्ट होत होतं. तसंच डेव्हिड आणि ती विभक्त होऊन आठच महिने झाले होते. एवढ्या कमी कालावधीत त्यानं दुसरं लग्न कधी केलं आणि त्याला मूल कसं झालं असा प्रश्न तिला पडला. नंतर थोड्याच वेळात ती पोस्ट तिच्या नावाशिवाय दिसू लागली. बॉयफ्रेंडसह रसिकाचं Bold फोटोशूट, सोशल मीडियावर आहे या कपलचीच चर्चा याचाच अर्थ त्याचं आधीपासूनच दुसऱ्या स्त्रीबरोबर प्रेमप्रकरण सुरू असणार अशी खात्री नाओमीला पटली. तिनं या पोस्टचा स्क्रीनशॉट काढून आपल्या मित्र-मैत्रिणींना पाठवला आणि याचा अर्थ काय होऊ शकतो असं विचारलं. त्यावेळी डेव्हिडला मूल असावं असा याचा अर्थ होत असल्याची शक्यता तिच्या मित्रानं व्यक्त केली. हे ऐकून नाओमीला खूप दुःख झालं. तिच्या पतीनं तिची फसवणूक केल्याचं तिच्या लक्षात आलं. आणि इतके दिवस या सगळ्यासाठी ती विनाकारण स्वतःला दोष देत असल्याचं तिला कळून चुकलं. डेव्हिडनं तिच्याबद्दल प्रेम वाटत नसल्याचं सांगून घटस्फोट मागितला होता. आपल्या वागण्यामुळेच डेव्हिड आपल्याला सोडून गेला असं ती समजत होती. कारण त्यांचा घटस्फोट होण्याआधी काही महिन्यांपूर्वी डेव्हिडच्या आईचा मृत्यू झाला होता. त्याच वेळी नाओमीचा गर्भपात (Miss Carriage) झाला होता. त्यामुळे ती त्या दुःखात चूर होती. ती उदास आणि एकटी राहत होती. यामुळे आपण डेव्हिडकडे नीट लक्ष दिलं नाही. त्याची काळजी घेतली नाही, म्हणून तो आपल्यापासून दूर गेला असा समज नाओमीनं करून घेतला आणि ती स्वतःलाच दोष देत होती. डेव्हिडचं आणि तिचं नातं तुटू नये यासाठी तिनं खूप प्रयत्न केले. त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला; पण त्यानं ते साफ नाकारलं आणि दोघांनी वेगळं होणंच योग्य आहे असं सांगून घटस्फोट घेतला. सोडली 14 लाखाची नोकरी, आता फक्त ‘पोज’ देऊन करते करोडोंची कमाई आपल्या नवऱ्यानं या सगळ्या गोष्टींची कबुली द्यावी आणि तिची माफी मागावी अशी अपेक्षा नाओमीनं व्यक्त केली आहे. केवळ नवऱ्यानेच नव्हे, तर तो विवाहित आहे हे माहीत असूनही त्याच्याबरोबर प्रेमसंबंध ठेवणाऱ्या मेरी नामक महिलेनंही आपली माफी मागावी असं तिनं रिलेशन पोर्टलवर म्हटलं आहे. त्याचा खरा चेहरा जगासमोर आणणार असल्याचंही तिनं म्हटलं आहे. अशा प्रकारे पतीने केलेली फसवणूक एका फेसबुक टॅगमुळे अशी उघडकीस आली.
First published:

Tags: Divorce, Relationship

पुढील बातम्या