मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तुझ्यासाठी कायपण! लग्नाआधी तिचं हाड मोडलं, त्यानं स्ट्रेचरवरच केलं लग्न

तुझ्यासाठी कायपण! लग्नाआधी तिचं हाड मोडलं, त्यानं स्ट्रेचरवरच केलं लग्न

प्रेमाची एक अनोखी कथा facebook च्या माध्यमातून समोर आली आहे. अचानक आलेल्या संकटावर मात करत जोडप्यानं ठरलेल्या दिवशीच हिमतीनं लग्न केलं.

प्रेमाची एक अनोखी कथा facebook च्या माध्यमातून समोर आली आहे. अचानक आलेल्या संकटावर मात करत जोडप्यानं ठरलेल्या दिवशीच हिमतीनं लग्न केलं.

प्रेमाची एक अनोखी कथा facebook च्या माध्यमातून समोर आली आहे. अचानक आलेल्या संकटावर मात करत जोडप्यानं ठरलेल्या दिवशीच हिमतीनं लग्न केलं.

    प्रयागराज, 16 डिसेंबर : प्रेम वेडं असतं. इतकं वेडं, की प्रेमी त्यातून एकमेकांसाठी जीवही द्यायला तयार होतात. उत्तर प्रदेशात (up) अशाच एका प्रेमी जोडप्याची कथा समोर आली आहे. दोघांचं लग्न ठरलं. लग्नाला नेमके 8 तास उरलेले असताना तिचा अपघात झाला. त्यात थेट मणक्याचं हाड मोडलं. कमरेसह पाय आणि इतरही ठिकाणी इजा झाली. मात्र होणाऱ्या पतीनं आपला निर्णय न बदलता तिच्याशी चक्क हॉस्पिटलच्या स्ट्रेचरवरच लग्न लावलं. प्रयागराजचे (Prayagraj) सामाजिक कार्यकर्ते सुशील मानव यांनी फेसबुक पोस्टमधून (Facebook post)ही अनोखी प्रेमकथा समोर आणली आहे. उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यातील कुंडा भागात राहणारी आरती मौर्य आणि जवळच्याच गावात राहणारा अवधेश. दोघांचं लग्न घरच्यांनी ठरवलं. ८ डिसेंबरला  वरात येणार होती आणि नेमकी आठेक तास आधी आरती छतावरून खाली पडली. एका लहान मुलाला छतावरून पडण्यापासून सावरताना आरतीचा पाय घसरला. तिच्या मणक्याचं हाड पूर्णतः मोडलं. बाकीही बऱ्याच ठिकाणी मार लागला. तिला लगोलग प्रयागराजच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं, की तिला काही काळापुरतं अपंगत्व आलं असून ती सलग काही महिने चालू-फिरू शकणार नाही. सगळेच अस्वस्थ झाले. आरतीचं लग्न आता मोडणार ही भीती तिच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींना वाटू लागली. आरतीच्या घरच्यांनी उद्विग्न होत मुलाकडच्यांना 'निदान आरतीच्या लहान बहिणीशी तरी लग्न करा', अशी ऑफर दिली. अवधेश मात्र म्हणाला, की मी केवळ आरतीशीच लग्न करणार आहे आणि लग्नही आजच होईल. सगळेच आनंदून गेले. डॉक्टरांची परवानगी घेत आरतीला दोन तासांसाठी अँब्युलन्समधून घरी आणलं गेलं. ती स्ट्रेचरवर झोपून असतानाच लग्नाच्या सगळ्या विधी केल्या गेल्या. सलाईन लावून आडव्या पडलेल्या आरतीच्या भांगात अवधेशनं सिंदूर लावला. आरतीची बिदाई झाली. मात्र सासरी नाही तर हॉस्पिटलमध्ये! दुसऱ्या दिवशी होणाऱ्या ऑपरेशनच्या फॉर्मवर अवधेशनं पती म्हणून स्वाक्षरी केली. या आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा आसपासच्या गावांमध्येही होते आहे. विवाह नावाच्या शाहीद कपूर अभिनित चित्रपटाची आठवण देणारी ही खरीखुरी लव्ह स्टोरी नेटकऱ्यांनी अक्षरशः उचलून धरली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Love story, Uttar pardesh, Wedding

    पुढील बातम्या