सावधान! फेसबुकवर जर 'असा' मेसेज आला तर रिकामं होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट

सावधान! फेसबुकवर जर 'असा' मेसेज आला तर रिकामं होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट

फेसबुकद्वारे जगभरात कोणत्याही व्यक्तीशी बोलणं आणि कनेक्ट राहणं तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं

  • Share this:

नवी दिल्ली, ०८ ऑक्टोबर २०१८- अकाऊंट हॅक करणं, चोरी करणं यानंतर आता फेसबुकच्या माध्यमातून पैसे चोरण्याची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. विचार करा की तुम्हाला माहित नसतानाही एक त्रयस्त व्यक्ती तुमच्याच फेसबुक अकाऊंटवरून तुमच्या मित्र- परिवाराशी बोलत आहे. तुम्ही अडचणीत आहात असं सांगून पैशांची मदत मागत आहे. अशात तुमच्या निकटवर्तीयांनी तुम्ही खरंच अडचणीत आहात असं समजून पैसे देऊ केले तर ते पैसे डुबलेच म्हणून समजा. तुम्हालाही असे मेसेज येत असतील तर वेळीच सावध व्हा.

फेसबुकद्वारे जगभरात कोणत्याही व्यक्तीशी बोलणं आणि कनेक्ट राहणं तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं. ४ ऑक्टोबरला अनेक फेसबुक युझरने फसवणुक झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे. फेसबुकवर त्यांच्या नावाचं फेक अकाऊंट सुरू करून त्यांच्याच मित्र- परिवाराकडून पैसे मागितले जात आहेत.

मास्टर शेफ इंडिया कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आणि मॅसिव्ह रेस्तराँचे फाऊंडर जोरावर कालरा यांनी आपल्या अकाऊंटवर पोस्ट शेअर करत म्हटले की, हॅकर्सने त्याचं फेक अकाऊंट बनवून त्यांच्या मित्रांना मेसेज करून त्यांच्याकडून पैसे मागितले. जोरावर यांच्यासारख्या अनेक सेलिब्रिटींनी अशाप्रकारचा तक्रारी केल्या आहेत. त्यांच्या फेसबुक अकाऊंटप्रमाणेच इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअपवरही मित्र- परिवारांना असे मेसेज गेले आहेत.

एवढेच नाही तर काही युझरना फेसबुक आणि व्हॉट्सअपवर नोटिफिकेशन जाऊन त्यांना तातडीने पासवर्ड बदलण्यासही सांगण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून फेसबुकचा उपयोग करुन लोकांकडून पैसे उकळण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी जगभरात ५ कोटी युझरचा डेटा लीक झाल्याचे प्रकरण समोर आले होते. यात भारतीयांच्या अकाऊंटचा सर्वात जास्त समावेश होता. तसेच अमेरिकेतील २०१६ च्या निवडणुकांमध्ये डोनाल्ड ट्रम्पच्या बाजूने मतदान करण्यासाठी कॅम्ब्रिज एनालिटिका नावाच्या कंपनीकडून फेसबुकच्या मार्फत सांगण्यात आले होते, असा आरोप करण्यात आला आहे. याबद्दल अजूनही चौकशी सुरू असून कंपनीकडून स्पष्टीकरण मागितले आहे.

VIDEO: डॉक्टर तरुणीचा गळा कापणारा 'तो' मांजा अजूनही तिथेच!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 8, 2018 11:33 AM IST

ताज्या बातम्या