नवी दिल्ली, 24 जानेवारी : आपली त्वचा निरोगी आणि सुंदर असावी, ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. आपणाला कोरियन सौंदर्याबद्दल माहिती आहे का? कोरियन लोकांना सौंदर्याची (Korean Beauty) खूप आवड असून अनेकांना असं वाटतं की आपली त्वचादेखील कोरियन मुलींसारखी चमकदार आणि सुंदर असावी. पण कोरियन तरुणींसारखं सौंदर्य मिळवणं इतकं सोपं नाही. यासाठी दीर्घकाळ प्रयत्न करावे लागतात. सौंदर्य टिप्सबद्दल बोलायचं तर आपल्याला फक्त तीन स्टेप्स पार कराव्या लागतील. पहिली त्वचेचं क्लिनींग, दुसरी टोनिंग आणि तिसरी मॉइश्चरायझिंग. जाणून घेऊ, कोरियन फेस केअर टिप्समधील 10 स्टेप्स सांगणार (Face Care Tips) आहोत.
1. ऑईल बेस्ड क्लिन्झर
ही पहिली स्टेप्स अतिशय सोपी आणि महत्त्वाची आहे. ऑईल बेस्ड क्लिन्झर सर्व अशुद्धी, धूळ, अस्वच्छता आणि मेकअप काढून टाकण्यास मदत करतो. शिवाय, त्वचेवर असलेल्या चांगल्या बॅक्टेरियाचं संरक्षण करतो.
2. डबल क्लिन्झींग
हे क्लीन्झर वॉटर बेस्ड क्लिन्झर आहे. याचा वापर आधी लावलेलं ऑईल बेस्ड क्लिन्झरचं तेल स्वच्छ करण्यास, घाण काढून टाकण्यास, घाम काढून टाकण्यास आणि तुमच्या त्वचेची छिद्रं मोकळी करण्यासाठी होतो.
3. एक्सफोलिएटिंग
त्वचेवर साचलेली धूळ, ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स किंवा डेड स्किनमुळं त्वचेची छिद्रं बंद होतात. ते काढण्यासाठी तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा त्वचा एक्सफोलिएट करू शकता. तुम्ही तुमच्या त्वचेला योग्य ठरतील असे स्क्रब किंवा केमिकल लिक्विड एक्सफोलिएट करण्यासाठी वापरू शकता.
4. टोनर
टोनर ही या प्रक्रियेतील पुढची पायरी आहे. याच्यामुळं तुमच्या त्वचेची पीएच पातळी संतुलित करण्यास मदत करते.
5. एसेन्स
एसेन्स हे सीरम आणि टोनरचं वॉटर बेस्ड मिश्रण आहे. याच्यामुळं तुमच्या त्वचेतील ओलावा कायम राहण्यासह त्वचा डागरहित राहील. याचा वापर केल्यानं तुमची त्वचा चमकदार आणि काळसरपणातून मुक्त होईल.
6. सीरम
तुमच्या चेहऱ्यावर ओलावा आणण्यासाठी सीरम वापरणं आवश्यक आहे. त्याचा वापर सुरकुत्या, कोरडेपणा, हायपर-पिग्मेंटेशन प्रतिबंधित करतो.
हे वाचा -
Beauty Care Tips: सनस्क्रीन वापरताना ‘ही’ काळजी घ्या; अन्यथा त्वचेसाठी ठरू शकतं हानिकारक
7. शीट मास्क
शीट मास्क हे एक प्रसिद्ध कोरियन उत्पादन आहे. हे त्वचेसाठी आरामदायी तसंच, वापरण्यास सोपे आहे. फेस शेप मास्क सीरम आणि हायड्रेटिंग एसेन्समध्ये भिजलेला असतो. याच्या त्वचेचं पोषण होतं. हे सर्व प्रकारच्या त्वचेसाठी योग्य आहे.
8. आय क्रीम
तुमच्या चेहऱ्याचा सर्वात संवेदनशील भाग म्हणजे तुमच्या डोळ्याभोवतीची त्वचा. सुरकुत्या आणि वृद्धत्व दर्शविणारी ही चेहऱ्यावरील पहिली जागा आहे. आय क्रीम या भागातील कोरड्या त्वचेतील पाण्याची पातळी योग्य ठेवण्यास मदत करतं. याच्यामुळं त्वचा तरुण आणि चमकदार राहते.
हे वाचा -
महागड्या Beauty Products ची नाही गरज; आहारातील इतकासा बदल खुलवेल तुमचं सौदर्यं
9. मॉइश्चरायझर
मॉइश्चरायझर त्वचेला चमक देतो. त्यामुळं त्वचा अधिक तजेलदार दिसते.
10. सनस्क्रीन
शेवटची आणि महत्त्वाची पायरी म्हणजे सनस्क्रीन. सनस्क्रीनमुळं सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांना तुमच्या त्वचेपर्यंत पोहोचण्यापासून रोखलं जातं. त्यामुळं त्वचेचा कर्करोग आणि डीएनएचं नुकसान होण्याची शक्यता कमी होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.