दिल्ली, 17 सप्टेंबर : अनेकांना डोळे सजवणे अथवा डोळ्यांचा मेकअप करणे फार आवडते. डोळे आकर्षक दिसावेत यासाठी काजळ किंवा आयलायनर अशा गोष्टींचा वापर केला जातो. त्यावेळी आपले डोळे (
Safety Tips While Doing Eye Makeup) सुंदर यावी यासाठी ते मेकअप (
Makeup) किटचाच वापर करतात. त्यामुळे आपण आपल्या डोळ्यांना सुंदरता आणण्यासाठी जो काही प्रयत्न करतो, त्याच काही प्रयत्नांमुळे आपल्या डोळ्यांनाही हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे आता आपल्या डोळ्यांची काळजी घेताना नेमकं काय करायला हवं, यासाठी आपण काही टिप्स जाणून घेणार आहोत.
डोळ्यांचा मेकअप करत असताना आपल्याला हायजीन मेंटेन करणे फार आवश्यक असते. त्यासाठी आपल्याला आपले हाथ आणि चेहरा (
Eye Makeup) आधी स्वच्छ धुवावा लागेल. त्यानंतर कुणाच्याही संपर्कात न येता आपण आपल्या मेकअप किट ही आपल्यासाठीच वापरावी. ती कुणासोबतही शेयर करू नये. कारण त्यापासून संक्रमणाचा मोठा धोका आपल्याला होण्याची शक्यता असते. कारण बॅक्टीरियाचा धोका त्यावेळी असल्याने आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागते.
तुम्हीही 'या' पद्धतीनं जेवण करत असाल तर व्हाल कर्जबाजारी; 5 गोष्टींची घ्या काळजी
आपण फार फार तर एखाद्या विशिष्ट कार्यक्रमावेळी आपल्या चेहऱ्याचे आणि डोळ्यांचे मेकअप करतो. त्यामुळे आपले काम किंवा कार्यक्रम संपतात, त्यावेळी आपण रात्री आपल्या चेहऱ्यावरील आणि डोळ्यांवरील मेकअप काढून घ्यायला हवा. त्यामुळे होणारे संभावित धोके टाळता येतील. कारण अशा वेळी त्याचे साईड इफेक्ट्स होण्याची शक्यता असते.
मेकअप काढताना चांगल्या क्वालिटीचं मेकअप रिमूव्हर वापरा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून अॅस्ट्रिंजंट लावावं. ते लावताना डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी.
मेकअप प्रॉडक्टमधल्या रसायनांची अलर्जी असेल तर डोळ्यासारख्या नाजूक भागाचा मेकअप करणं टाळावं. खोबरेल तेल वापरून मेकअप काढणं सुरक्षित असतं आणि स्वस्तही.
(Disclaimer - ही माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.) मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.