Home /News /lifestyle /

अल्पवयीन मुलांमध्ये Facebook, Instagram मुळे येतेय नकारात्मकता, संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

अल्पवयीन मुलांमध्ये Facebook, Instagram मुळे येतेय नकारात्मकता, संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

Social Media Negative Effects: सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे आपण अधिक चिंताग्रस्त आणि रागिट झालो आहोत का? आपल्या सभोवतालच्या नकारात्मकतेमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची भूमिका काय आहे? त्यांचा आपल्यावर कसा परिणाम होतो. या सगळ्याचं सत्य जाणून घेऊया.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 12 एप्रिल : फेसबुक (Facebook) इन्स्टाग्राम (Instagram), ट्विटर (Twitter) आणि सर्व सोशल मीडिया (Social Media Apps) अ‍ॅप्सचं एक वेगळंच जग निर्माण झालं आहे. कधीकाळी दिवसभरातून काही काळ या अ‍ॅप्सचा वापर करण्यासाठी खर्च करावा लागत होता. परंतु, आता ही सर्व अ‍ॅप्स आपल्या लाइफस्टाइलचा भागच झाली आहेत. या अ‍ॅप्सचा इतका विपरित परिणाम झाला आहे, की माणसामधली नकारात्मकता, भीती आणि नैराश्य वाढण्यामागे हिच अ‍ॅप्स कारणीभूत आहेत. यासंबंधीच्या माहितीचं वृत्त 'आज तक'नं दिलं आहे. एकमेकांशी कनेक्ट होण्यासाठी तयार करण्यात आलेली ही अ‍ॅप्स एकमेकांना दूर लोटणारी कधी झाली हे कळालंच नाही. कधी काळी मैदानी खेळ खेळणारी मुलं आता रात्रं-दिवस या अ‍ॅप्सच्या आहारी गेली आहेत. 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांवर विशेषतः त्यांच्या मानसिक आरोग्यावर या अ‍ॅप्सचा विपरित परिणाम होत आहे, असं गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या द वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. द वॉल स्ट्रीटचा रिपोर्ट फेसबुकच्या इंटर्नल रिसर्चवर आधारित आहे. त्यामध्ये इन्स्टाग्राम अ‍ॅपच्या वापराचा अल्पवयीन मुलांवर नकारात्मक परिणाम होत असल्याचं म्हटलं आहे. इन्स्टाग्रामसारख्या अ‍ॅप्समुळे अल्पवयीन मुलींमध्ये बॉडी इमेज इश्यू निर्माण झाले आहेत. प्रत्येक तीनपैकी एका मुलीमध्ये ही समस्या आढळून येत आहे. सर्वेक्षणात भाग घेणाऱ्या 13 टक्के ब्रिटिश आणि 6 टक्के अमेरिकी अल्पवयीन मुलांनी यासारख्या अ‍ॅप्समुळे आत्महत्या करण्याचे विचार मनात येत असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, ‘आमचा इंटर्नल रिसर्चच्या माध्यमातून प्लॅटफॉर्मवरच्या वाईट गोष्टी कमी करून चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. कंपनीने इंटर्नल रिसर्चमध्ये गुंतवणूक करून त्याचा रिपोर्ट तयार करण्यामागे कंपनीचा हाच उद्देश आहे की, आमच्या कमतरता शोधून त्या दुरुस्त करणं. म्हणजे आम्ही अधिक चांगली सेवा ग्राहकांना देऊ शकू ,’ असं म्हणत फेसबुकचे व्हाईस प्रेसिडेंट आणि हेड ऑफ रिसर्च प्रतिति रायचौधरी (Pratiti Raychoudhury) यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. 2019 मध्ये प्रसिद्ध झालेल्या जोहानन हॅरी (Johann Hari) यांच्या Lost Connection : Why You are Depressed and How to find Hope पुस्तकातही या विषयाचा उल्लेख आढळतो. The Diary of A CEO with Steven Bartlett अ‍ॅपल पॉडकास्टवरच्या या पॉप्युलर शोमध्ये सुद्धा हॅरी यांनी या मुद्द्यावर चर्चा केली होती. ते म्हणतात, ‘लोकांनी कॉम्प्युटरवर किंवा स्मार्टफोनवर स्क्रोल करत रहावं यासाठीच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची मॉडेल्स तयार करण्यात आली आहेत. प्लॅटफॉर्म तुम्ही स्क्रोल करणं बंद केलं की त्यांची कमाईही बंद होणार आहे. तुम्ही स्क्रोल करतच राहावं असंच या प्लॅटफॉर्मचं अल्गोरिदम तयार केलं जातं ज्यातून एआयच्या माध्यमातून कंपन्या तुमच्या आवडी-निवडी जाणून घेतात आणि त्यानुरूप तुम्हाला गुंतवून ठेवण्यासाठी अधिक प्रयत्न करतात. ‘सोशल मीडिया प्लॅटफॉर्म निगेटिव्ह बायस थेअरीवर काम करतात. याचाच अर्थ असा की ते निगेटिव्ह गोष्टीच आपल्यासमोर मांडून त्याच पाहण्यास किंवा वाचण्यास आपल्याला भाग पाडतात. त्यामुळेच अल्पवयीन मुलांनी, मोठ्यांनी ज्यांना नकारात्मकतेपासून दूर रहायचं आहे त्यांनी सोशल मीडियापासून दूर रहायला हवं आणि रील लाइफपेक्षा रिअल लाइफवर जास्त फोकस करावं,’ असंही हॅरी यांनी सांगितलं. त्यामुळे आपण स्वत: आणि आपली मुलंही नकारात्मकतेकडे जात नाहीत ना हे पाहणं आपलंच कर्तव्य आहे.
    First published:

    Tags: Facebook, Instagram

    पुढील बातम्या