मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /फ्रीजमध्ये अन्नपदार्थ ठेवणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

फ्रीजमध्ये अन्नपदार्थ ठेवणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

फ्रीजमध्ये अन्न ठेवताना काळजी घेतली पाहिजे. कारण, काही पदार्थ फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर खराब होतात, तर काही दीर्घकाळ टिकतात. फ्रीजमध्ये अन्न, खाद्यपदार्थ ठेवणं योग्य की अयोग्य, असा प्रश्नही अनेकांना पडतो.

फ्रीजमध्ये अन्न ठेवताना काळजी घेतली पाहिजे. कारण, काही पदार्थ फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर खराब होतात, तर काही दीर्घकाळ टिकतात. फ्रीजमध्ये अन्न, खाद्यपदार्थ ठेवणं योग्य की अयोग्य, असा प्रश्नही अनेकांना पडतो.

फ्रीजमध्ये अन्न ठेवताना काळजी घेतली पाहिजे. कारण, काही पदार्थ फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर खराब होतात, तर काही दीर्घकाळ टिकतात. फ्रीजमध्ये अन्न, खाद्यपदार्थ ठेवणं योग्य की अयोग्य, असा प्रश्नही अनेकांना पडतो.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 4 फेब्रुवारी : शिजवलेलं अन्न आणि खाद्यपदार्थ खराब होऊ नयेत, म्हणून ते आपण फ्रीजमध्ये ठेवतो. पण बऱ्याचदा नेमकं कोणतं अन्न फ्रीजमध्ये ठेवावं, याबाबत संभ्रम असतो. खरं तरं फ्रीजमध्ये अन्न ठेवताना काळजी घेतली पाहिजे. कारण, काही पदार्थ फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर खराब होतात, तर काही दीर्घकाळ टिकतात. फ्रीजमध्ये अन्न, खाद्यपदार्थ ठेवणं योग्य की अयोग्य, असा प्रश्नही अनेकांना पडतो.

    बऱ्याचदा यावरून गोंधळही उडतो. मात्र, आज आम्ही तुम्हाला याबाबत महत्त्वपूर्ण माहिती देणार आहोत. जी समजल्यानंतर फ्रीजमध्ये अन्न ठेवणं योग्य की अयोग्य, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिलंय. आजच्या वेगवान जीवनशैलीमुळे, बहुतेक लोकांना दररोज ताजं अन्न शिजवणं खूप कठीण झालंय. अनेकजण एकाचवेळी मोठ्या प्रमाणात अन्न शिजवतात आणि ते नंतर खाता यावं, यासाठी फ्रीजमध्ये ठेवतात.

    World Cancer Day: किडनी कॅन्सर कसा ओळखावा? डॉक्टरांनी सांगितली 10 लक्षणे

    मात्र बहुतांश आरोग्यतज्ज्ञ शिजलेलं अन्न जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेऊ नये, असा सल्ला देतात. चला तर फ्रीजमध्ये जास्त काळ ठेवलेल्या अन्नाचे काय दुष्परिणाम आहेत आणि ते किती वेळ साठवून ठेवणं योग्य आहे, ते जाणून घेऊ.

    पोषणतज्ज्ञ म्हणतात...

    फ्रीजमध्ये अन्न, खाद्यपदार्थ ठेवल्यानं वेळ वाचतो. पण आरोग्यासाठी ते किती सुरक्षित आहे? या प्रश्नाचं उत्तर देताना पोषणतज्ज्ञ म्हणतात, ‘मांस, पोल्ट्री, मासं, दुग्धजन्य पदार्थ आणि अंडी यांसारखे नाशवंत पदार्थ फ्रीजमध्ये ठेवलं, तर ते पदार्थ एक आठवड्याच्या आत खाण्यासाठी वापरावेत. त्यापेक्षा जास्त काळ ते फ्रीजमध्ये ठेऊ नये. पण जे अन्नपदार्थ लवकर खराब होत नाहीत, जसं की फळं आणि भाज्या आदी ते जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवता येतात.

    तज्ज्ञांच्या मते, फ्रीजमध्ये ठेवलेल्या अन्नामध्ये तीन ते चार दिवसांनी बॅक्टेरिया वाढू लागतात. तसेच दीर्घकाळ ठेवलेल्या अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढतो. बॅक्टेरिया सहसा अन्नाची चव, वास किंवा रंग बदलत नाहीत. यामुळे अन्न खाण्यासाठी योग्य आहे की नाही? हे जाणून घेणं कठीण असते.

    म्हणून वाढतो बॅक्टेरिया

    आपल्यापैकी कोणीही अन्न शिजवल्यानंतर लगेच ते फ्रीजमध्ये ठेवत नाही. अन्न प्रथम खाण्यासाठी बाहेर ठेवलं जातं, त्यानंतर उरलेलं अन्न थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवलं जातं. या स्थितीत बॅक्टेरियाला अन्न पट्कन दूषित करण्याची संधी मिळते.

    बॅक्टेरिया वाढण्यापासून कसा रोखाल?

    अन्नामध्ये बॅक्टेरिया वाढू नये, यासाठी सर्वप्रथम नाशवंत अन्न लवकर खावे. यानंतर, उरलेले अन्न झाकण असलेल्या भांड्यात झाकून ठेवा. हे उरलेले अन्न फ्रीजच्या वरच्या रॅकमध्ये ठेवा, जेणेकरून त्याला अधिक हवा आणि थंडपणा मिळेल. शिळे अन्न हे फ्रीजच्या पुढच्या बाजूला आणि ताजे मागे ठेवा.

    अन्न साठवण्यासाठी आणि खाण्यायोग्य आहे किंवा नाही, हे तपासण्यासाठी ही साधी मार्गदर्शक तत्त्वे आहेत. अन्न बघून, वास घेऊन आणि स्पर्श करून ते खाण्यासाठी अजूनही योग्य आहे की नाही, हे तपासणे केव्हाही चांगल. जर तुम्हाला अन्न खाण्या योग्य आहे किंवा नाही, याबाबत शंका असेल, तर जास्त विचार न करता ते फेकून द्या. याशिवाय प्रत्येकानं शक्यतो ताजे शिजवलेलं अन्न खावे. जास्तकाळ फ्रीजमध्ये ठेवलेले अन्नाचे सेवन आरोग्यासाठी चांगले नाही.

    दुसरीकडे, याबाबत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर क्रिश अशोक म्हणतात, ‘लोकांमध्ये हा गैरसमज आहे की, फ्रीजमध्ये अन्न ठेवल्यास अन्नातील पोषक घटक नष्ट होतात. प्रत्यक्षात मात्र स्वयंपाक करताना अन्नातील अनेक पोषक तत्वे नष्ट होतात.’

    फ्रीजमध्ये अन्न ठेवणं योग्य की अयोग्य?

    क्रिश अशोक हे सातत्यानं सोशल मीडियावर अशा मुद्द्यांवरील समज-गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करून माहितीपूर्ण व्हिडिओ पोस्ट करीत असतात. ते पुढे म्हणतात, ‘पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्वे हे सर्वात अस्थिर आणि सहज गमावले जाणारे पोषक असतात. परंतु त्यातील बहुतेक नुकसान केवळ स्वयंपाक करताना होते. फ्रीजमध्ये ठेवल्यानं नाही. खरं तर उष्णता जीवनसत्त्वे नष्ट करते, थंड वातावरण नाही. हवाबंद डब्यात शिजवलेलं अन्न किमान दोन ते तीन दिवस टिकू शकते, आणि बऱ्याचवेळा एक आठवड्यापर्यंत. फ्रीझरमध्ये ठेवलेले अनेक खाद्यपदार्थ सहा महिने टिकू शकतात. अर्थात त्यासाठी फ्रीजचा विद्युत प्रवाह खंडीत होणार नाही, याची काळजी घ्यावी. सर्व जैविक क्रिया तापमानासह मंदावतात, त्यामुळे अन्न खराब होण्याची शक्यता कमी असते.’

    काही पदार्थ होतात लवकर खराब

    क्रिश अशोक यांनी पुढं बोलताना सांगितलं की, ‘मात्र, फ्रीजमध्ये जास्त काळ ठेवण्यासाठी काही अन्नपदार्थ हे अपवाद आहेत. कधीकधी बॅक्टेरिया साध्या शिजवलेल्या, उकडलेल्या तांदळात वाढू शकतात, जे कमी तापमानातही तग धरू शकतात. म्हणूनच फ्रीजमध्ये ठेवलेल्या अशा पदार्थ्यांचे एक किंवा दोन दिवसात सेवन करणं चांगलं आहे. याशिवाय भारतीय खाद्यपदार्थांमध्ये मसाले, खारट आणि आंबटपणा असल्याने ते फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी योग्य असतात.’

     लघवीचा 'हा' रंगही असू शकतो मधुमेहाचे लक्षण, दिसल्यास त्वरित घ्या डॉक्टरांचा सल्ला

    दरम्यान, फ्रीज आता ही घरातील सर्वात महत्त्वाची वस्तू झाली आहे. पण याच फ्रीजमध्ये कोणते अन्न, खाद्यपदार्थ ठेवावेत, हे देखील समजून घेणं महत्त्वाच झालं आहे. अन्यथा फ्रीजमध्ये ठेवलेल्या अन्नपदार्थ स्वतःच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकता, हे देखील प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे. बऱ्याचदा फ्रीज खरेदी केल्यानंतर त्यासोबत येणाऱ्या मॅन्युअलमध्येही याबाबत माहिती दिलेली असते. हे मॅन्युअल वाचणेही फायद्याचं ठरेल.

    First published:

    Tags: Food, Health, Health Tips, Lifestyle