मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Pregnancy Test : गर्भातील बाळावरही करता येतात उपचार; फीटल मेडिसीनबाबत तुम्हाला माहिती आहे का?

Pregnancy Test : गर्भातील बाळावरही करता येतात उपचार; फीटल मेडिसीनबाबत तुम्हाला माहिती आहे का?

तज्ज्ञांनी दिली फीटल मेडिसिनची माहिती

तज्ज्ञांनी दिली फीटल मेडिसिनची माहिती

रिनॅटोलॉजी ही ऑब्स्टेट्रिक्स अर्थात प्रसूतिशास्त्राची छोटी शाखा आहे. ही शाखा गर्भाची काळजी घेण्याशी आणि अति जोखमीच्या गुंतागुंतीच्या प्रेगन्सीशी निगडित आहे. पेरिनॅटोलॉजीला मॅटर्नल-फीटल मेडिसीन असंही म्हणतात.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 25 जानेवारी : पेरिनॅटोलॉजी ही ऑब्स्टेट्रिक्स अर्थात प्रसूतिशास्त्राची छोटी शाखा आहे. ही शाखा गर्भाची काळजी घेण्याशी आणि अति जोखमीच्या गुंतागुंतीच्या प्रेगन्सीशी निगडित आहे. पेरिनॅटोलॉजीला मॅटर्नल-फीटल मेडिसीन असंही म्हणतात. डॉ. चित्रा गणेश, विभागप्रमुख आणि सीनिअर कन्सल्टंट, डिपार्टमेंट ऑफ फीटल मेडिसीन, मां कावेरी, कावेरी हॉस्पिटलचा विभाग, इलेक्ट्रॉनिक सिटी, बेंगळुरू यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

फीटल मेडिसीन (Fetal Medicine) ही पेरिनॅटोलॉजीची एक शाखा आहे. त्यामध्ये खालील बाबी पाहिल्या जातात.

- गर्भाच्या वाढीवर लक्ष ठेवणं आणि मूल्यमापन, त्याचं स्वास्थ, तसंच डिलिव्हरीनंतर असलेल्या जोखमी

- गर्भाच्या आरोग्याचं व्यवस्थापन

- गर्भाचे आजार आणि अ‍ॅबनॉरमॅलिटीज

बाळाच्या आईने प्रेग्नन्सीमध्ये उपलब्ध केलेल्या वातावरणाच्या निकषांच्या आधारे वरील गोष्टी केल्या जातात. वरच्या प्रत्येक गोष्टीचं महत्त्व आईवर अवलंबून असतं. कारण तिच्याच पोटात गर्भ वाढत असतो. गर्भधारणा होण्यासाठी ART चा वापर वाढत असल्याने एकापेक्षा अधिक गर्भ असणं आता सर्वसाधारण आहे. त्यामुळे या बाबीला अधिक महत्त्व आहे.

फीटल मेडिसीनचा महत्त्वाचा भाग असलेल्या सेवा

- अल्ट्रासाउंड स्कॅन्स - यामध्ये गर्भधारणा झाल्यापासून डिलिव्हरी होईपर्यंत केल्या जाणाऱ्या 2D आणि 3D अल्ट्रासाउंड स्कॅन्सचा समावेश आहे. त्यात

- अर्ली प्रेग्नन्सी स्कॅन : गर्भधारणा नेमकी कुठे झाली आहे, हे यातून कळतं. गर्भ युटेरसच्या (गर्भाशय) आतल्या बाजूला आहे, की बाहेरच्या बाजूला हे यातून पाहिलं जातं. गर्भधारणा युटेरसच्या बाहेर झाली असेल हे अगोदर कळलं नाही आणि तो गर्भ काढून टाकण्यात आला नाही, तर आईच्या जिवाला मोठा धोका असतो. प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या काळातल्या महत्त्वाच्या इमर्जन्सीजपैकी ही एक इमर्जन्सी अर्थात आणीबाणीची परिस्थिती असू शकते.

पहिल्या तिमाहीचा स्कॅन (तिसऱ्या महिन्याचा स्कॅन) : बाळामध्ये काही जनुकीय अ‍ॅबनॉरमॅलिटी आणि खासकरून डाउन्स सिंड्रोम होण्याची जोखीम आहे का हे तपासण्यासाठी हा स्कॅन केला जातो. डाउन्स सिंड्रोम असलेल्या बाळांना मानसिक आणि शारीरिक समस्या असतात. तसंच त्यांचं आयुर्मान बऱ्यापैकी चांगलं असल्याने आई-वडिलांना या 'स्पेशल' मुलांची काळजी घ्यावी लागते. आता या स्कॅनसोबतच Nuchal Translucency अर्थात NT scan आणि ब्लड टेस्ट, डबल मार्कर टेस्टही करण्याचा सल्ला दिला जातो. त्यातून बाळाला डाउन सिंड्रोम होण्याची जोखीम तपासता येते. त्यातून कन्फर्मेटरी टेस्ट केल्यानंतर बाळाला तो विकार झाला असल्याची किंवा नसल्याची खात्री करता येते, जेणेकरून आई-वडिलांना प्रेग्नन्सी कायम ठेवायची आहे की नाही, याचा निर्णय घेता येतो.

पाचव्या महिन्याचा स्कॅन (अ‍ॅनोमॅली स्कॅन) : बाळाच्या शरीराच्या रचनेत काही दोष नाहीत ना, हे तपासण्यासाठी केला जाणारा हा महत्त्वाचा स्कॅन आहे. दाम्पत्याला केवळ एकाच स्कॅनचा खर्च परवडणार असेल, तर हाच स्कॅन सर्वांना करायला सांगणं गरजेचं आहे. बाळाच्या शरीररचनेत काही दोष असल्याची शक्यता आढळल्यास किंवा तसं कन्फर्म झाल्यास त्याबद्दल दाम्पत्याशी चर्चा केली जाते. बाळाच्या जन्मानंतर ही परिस्थिती कशी हाताळता येईल, याचा सल्लाही देता येऊ शकतो. शरीररचनेतला दोष प्राणघातक ठरणार असेल, तर प्रेग्नन्सी कायम न ठेवण्याचा सल्ला देता येऊ शकतो. जेणेकरून गर्भारपणाचा सर्व काळ बाळाला पोटात सांभाळून नंतर त्याला गमावण्याचं दुःख दाम्पत्याला सहन करावं लागत नाही.

- फीटल इको कार्डिओग्राफी

- वाढीचं मूल्यमापन

- फीटल डॉपलर असेसमेंट (रक्तप्रवाहाचं मूल्यमापन)

- मल्टिपल प्रेग्नन्सी स्कॅनिंग आणि सर्व्हेलन्स (एकापेक्षा जास्त गर्भ असल्याची/नसल्याची तपासणी)

- गुंतागुंतीच्या आयडेंटिकल ट्विन्स प्रेग्नन्सीसाठी थेरपी. अशा प्रेग्नन्सीजना मोनोकोरिऑनिक प्रेग्नन्सीज असं म्हणतात. त्यात दोन्ही बाळांची प्लासेंटा अर्थात वार एकच असते.

- ट्विन टू ट्विन ट्रान्सफ्युजनसाठी इंट्रा फीटल लेसर फोटोकोअ‍ॅग्युलेशन

- रेडिओफ्रिक्वेन्सी अ‍ॅब्लेशन

- बायपोलर कॉर्ड कोअ‍ॅग्युलेशन

- जनुकीयदृष्ट्या बाळ नॉर्मल आहे की नाही, हे तपासण्यासाठी फीटल इन्व्हॅझिव प्रोसीजर केल्या जातात. त्यात

- कोरिऑनिक व्हिलस सॅम्पलिंग (CVS)

- अ‍ॅम्निओसेंटेसिस

- फीटल ब्लड सॅम्पलिंग

यांचा समावेश असतो.

- फीटल थेरपी

- फीटल अ‍ॅनिमिया असल्यास इंट्रा युटेराइन ट्रान्स्फ्युजन

- मल्टिफीटल प्रेग्नन्सीचं प्रमाण कमी करणं

प्रेग्नन्सीपूर्वी जेनेटिक कौन्सिलिंग करणं : जेव्हा दाम्पत्याने नात्यामध्ये लग्न केलेलं असतं किंवा ज्यांना आधीची मुलं अ‍ॅबनॉर्मल झालेली असतात, अशांसाठी...

पेरिनॅटल पॅथॉलॉजी (फीटल ऑटोप्सी) :

गर्भांवर लक्ष ठेवणं, त्यांच्याबद्दल निदान करणं आदींविषयीची आपली क्षमता तंत्रज्ञानामुळे वाढली आहे. त्यामुळे फीटल मेडिसीन स्पेशालिस्ट्सना सुरक्षित प्रसूतीसाठी ऑब्स्टेट्रिशियन्स, निओनॅटोलॉजिस्ट्स, पेडिअ‍ॅट्रिकल कार्डिऑलॉजिस्ट्स, पेडिअ‍ॅट्रिक सर्जन्स अशा अन्य स्पेशालिस्ट्ससह काम करता येतं. संपूर्ण शरीराचा रिसर्च डेटा उपलब्ध झाल्याने प्रेग्नन्सी अ‍ॅसेसमेंटच्या दृष्टीने माहिती मिळते. त्यामुळे गर्भ आरोग्यपूर्ण आहे की नाही याचं मूल्यमापन करता येतं. तसंच गुंतागुंतीच्या प्रेग्नन्सीमध्ये सुरक्षित प्रसूती होण्यासाठी आवश्यक ती तयारी करता येते.

फीटल मेडिसीन या विशेष शाखेमुळे गर्भ म्हणजेच जन्मालाही न आलेल्या पेशंटला स्वतंत्र व्यक्तीप्रमाणे तपासता येतं, उपचार करता येतात. त्यामुळे या सगळ्या स्पेशालिटीज एकत्र आल्या आहेत. त्यामुळे बाळांच्या आई-वडिलांना उत्तम परिणाम मिळतात, जेणेकरून बाळ या जगात आल्यानंतर मनसोक्त रडू शकतं.

आईसह पेडिअ‍ॅट्रिक्स, निओनॅटोलॉजी डिसिप्लिन्सना फीटल मेडिसीन ही शाखा एकत्र आणते. जेणेकरून नव्याने आई-वडील होणाऱ्यांना उत्तम परिणाम मिळतात. हे स्पेशालिस्ट्स अखंडपणे काम करत राहिल्यानंतर नॉर्मल आणि जोखमीच्या प्रेग्नन्सीचं व्यवस्थापन करण्याची क्षमता वाढेल. गुंतागुंतीच्या प्रेग्नन्सीमध्ये यामुळे बाळाची शक्य तेवढी काळजी घेता येते आणि आईला वर्ल्ड-क्लास पेशंटप्रमाणे अनुभव येतो.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle, Pregnancy