आत्म्याचं अस्तित्व सिद्ध करण्याचा डॉक्टरचा प्रयत्न; असं मोजलं आत्म्याचं वजन

अनेक धर्मांमध्ये आत्म्याचं अस्तित्व गृहित धरलेलं आहे. पण विज्ञानाने मात्र ही गोष्ट अजूनपर्यंत कधीही स्वीकारलेली नाही. अमेरिकेतल्या एका डॉक्टरने मात्र या आत्म्याचं वजन करून दाखवलं होतं...

अनेक धर्मांमध्ये आत्म्याचं अस्तित्व गृहित धरलेलं आहे. पण विज्ञानाने मात्र ही गोष्ट अजूनपर्यंत कधीही स्वीकारलेली नाही. अमेरिकेतल्या एका डॉक्टरने मात्र या आत्म्याचं वजन करून दाखवलं होतं...

  • Share this:
    बॉस्टन, 5 जुलै : अनेकदा शरीरात आत्मा असल्याचं म्हटलं जातं. अनेक धर्मांमध्ये आत्म्याचं अस्तित्व गृहित धरलेलं आहे.  धर्म भलेही आत्मा नावाच्या गोष्टीचा स्वीकार करत असेल पण विज्ञानाने मात्र ही गोष्ट  अजूनपर्यंत कधीही स्वीकारलेली नाही. अनेक वैज्ञानिकांनी आत्मा असतो का नाही हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. आज आम्ही तुम्हाला अशाच प्रयोगाबद्दल सांगणार आहोत.  अमेरिकेतील एका डॉक्टरने आत्मा असतो की नाही याचा शोध लावण्यासाठी एक विचित्र प्रयोग केला होता, तेही 113 वर्षांपूर्वी. या प्रयोगात त्याने आत्म्याचं वजनही सिद्ध केलं होतं. आत्म्याचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी प्रयोग 1907 मध्ये हेवरहिल या मसेचुसेट्स राज्यातील एक वैद्यक डंकन मॅग्डॉगल यांनी आत्मा असतो हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी त्यांच्या देखरेखीखाली मृत्यू पावणाऱ्या लोकांवर आणि काही कुत्र्यांवर प्रयोग केले. आत्म्याचं वजन हे डॉक्टर महाशय मूळात स्कॉटिश आणि नंतर अमेरिकेत राहिलेले. त्यांच्या म्हणण्यानुसार आत्माला वजन असतं आणि त्यामुळेच त्याचं वजन मोजणं महत्त्वाचं आहे आणि अवघड आहे. व्यक्ती मृत पावल्यानंतर एखाद्या जादूप्रमाणे आत्मा त्याच्या शरीरातून जातो आणि तो नेहमीसाठी स्वर्गात राहात असल्याचा दावा त्यांनी केला होता. आत्म्याचं वजन करता येतं पण आपण पीठ मोजतो तसं ते सोपं नाही. मरण पावताना व्यक्तीचं वजन  या प्रयोगामध्ये त्यांनी सर्वांत आधी मृत्युशय्येवर असलेल्या व्यक्तीचं वजन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मृत झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याचं वजन करण्याचा निर्णय घेतला. या प्रयोगामध्ये दोन्ही वजनांमध्ये फरक आढळून आल्यास कमी झालेलं वजन हे त्या आत्म्याचं वजन असण्याची शक्यता होती. यासाठी त्यांनी या प्रयोगात त्यांना मदत करू शकणाऱ्या एका स्वयंसेवकांची निवड केली. या प्रयोगामध्ये त्यांना मरण पावताना स्थिर असणाऱ्या व्यक्तीची गरज होती. सुरुवातीला अडचण   या प्रयोगामध्ये त्यांनी सुरुवातीला टीबीसारख्या आजाराने मृत पावणाऱ्या व्यक्तीची निवड केली. त्याचबरोबर यासाठी आपल्या ऑफिसमध्ये तराजूच्या आकारासारखा बेड तयार केला. पण त्यांच्या या प्रयोगामध्ये त्यांना यश आले नाही, त्यांच्या या प्रयोगाच्या सेटअप तयार करण्याआधीच मृत्युशय्येवर असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अनिश्चित निकाल यानंतर त्यांनी केलेल्या दोन प्रयोगामध्ये त्यांनी 21.3  ग्रॅम आणि 14 ग्रॅमचे अंतर आढळून आले. त्याचबरोबर तिसऱ्या प्रयोगामध्ये या दोन वजनांमधलं वजन आलं. त्यामुळे आत्मा असतो हे त्यांनी त्यांच्या प्रयोगांमधून सिद्ध केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. कुत्र्यांवर  प्रयोग मॅक्डॉगल यांनी आपल्या या प्रयोगात अचूकता आणण्यासाठी 15 कुत्र्यांवर प्रयोग केले. यासाठी त्यांना वजन मोजण्याचा मशीनवरच मारलं. आजारी कुत्र्यांवर प्रयोग करण्यात त्यांना अडचण आल्याने त्यांनी आरोग्यवान कुत्र्यांना मारून हा प्रयोग केला परंतु कुत्र्यांमध्ये आत्मा नसतो, असा निष्कर्ष त्यांनी या प्रयोगांमधून काढला. परंतु मॅक्डॉगल यांचा निष्कर्ष कधीही स्वीकारला गेला नाही. त्यांच्या प्रयोगांच्या पद्धतींवर देखील आक्षेप घेण्यात आले. त्याचबरोबर आपल्या प्रयोगात देखील काही त्रुटी असल्याचे त्यांनी मान्य केले. त्यामुळे आत्मा असतो की नाही हे सिद्ध करण्यात अखेर त्यांना अपयश आले.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published: