Home /News /lifestyle /

आणखी एक जग आहे, जिथे कालचक्र उलटं फिरतं! शास्त्रज्ञांनाही पटतेय खात्री

आणखी एक जग आहे, जिथे कालचक्र उलटं फिरतं! शास्त्रज्ञांनाही पटतेय खात्री

आपण राहतो त्या ब्रह्मांडापेक्षा उलटं चालणारं एक वेगळं जग अस्तित्वात आहे, यावर आता शास्त्रज्ञांचा विश्वास बसू लागला आहे. Anti Universe च्या अस्तित्वाची ही आहेत कारणं..

  दिल्ली, 24 मार्च: आपण ज्या ब्रह्मांडात (Universe) राहतो, त्याबद्दल आपल्याला कदाचित फारच कमी माहिती आहे. जसजसं विज्ञान प्रगती करत आहे, तसतशी ब्रह्मांडाची नवनवीन रहस्यं (Mystery of Parallel Universe) उलगडत आहेत. दरम्यान, एक विरोधाभासी ब्रह्मांड म्हणजे उलटं विश्व अस्तित्वात असण्याबाबत शास्त्रज्ञांचा (Scientists believe in an Anti Universe) विश्वास आहे. शास्त्रज्ञांना आपल्या विश्वाबाबत बरीच माहिती आहे; पण त्यांना या उलट्या विश्वाबद्दलही खात्री पटत आहे. हे नवं जग आपल्या जगापासून पूर्णपणे  वेगळं असल्याचं म्हटलं जातंय. त्याला शास्त्रज्ञांनी अँटी युनिव्हर्स (Anti Universe) असं म्हटलं आहे. हे जग आपल्या पृथ्वीजवळच असू शकतं. शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार, हे समांतर जग भौतिकशास्त्राच्या नियमांमध्ये आपल्या जगाच्या पूर्णपणे विरुद्ध असेल. उदाहरणार्थ, आपण ज्या पद्धतीने वेळेची गणना करतो, त्याउलट तेथे वेळ अगदी उलट चालत असेल.

  हे वाचा -  बापरे! अमेरिकेत एका महिन्यात 270000 मुलं कोरोना पॉझिटिव्ह, जाणून घ्या जगाची स्थिती

   शास्त्रज्ञ या रहस्यमय समांतर जगाबद्दल अधिक संशोधन करत आहेत. कारण त्यांचा अँटी युनिव्हर्स सिद्धांतावरही विश्वास आहे.
  अँटी-युनिव्हर्स किंवा उलटं जग म्हणजे काय? शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे, की अँटी-युनिव्हर्स (Anti Universe) सिद्धांत फंडामेंटल सिमेट्रीजवर अवलंबून आहे. याच प्रक्रियेवर ब्रह्मांडातल्या बहुतेकशा क्रिया अवलंबून असतात. भौतिकशास्त्राच्या शास्त्रज्ञांना सममितीच्या तीन नियमांशिवाय दुसरं काहीही सापडलेलं नाही; मात्र आता आपल्या जगासारखं दुसरं जग असण्याची शक्यता आहे, जिथे भौतिकशास्त्राचे नियम उलटे चालतात आणि काळ पुढे जाण्याऐवजी मागे जातो. आता या सिद्धांतावर काम करून डार्क मॅटरची (dark matter) नेमकी व्याख्या केली जाऊ शकते. शास्त्रज्ञांच्या मते, अशा जगात सिमेट्रीजची गरज भासणार नाही आणि न्यूट्रॉन उजव्या बाजूने फिरत असतील. शास्त्रज्ञ समांतर जग सिद्ध करण्याच्या प्रयत्नात समांतर जगाचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी, शास्त्रज्ञ मास न्यूट्रॉनची तपासणी आणि चाचण्यांमध्ये (testing and Investigation of mass neutrons) गुंतले आहेत. त्यात ते यशस्वी झाले तर दुसऱ्या जगाची गोष्ट सिद्ध होईल. या सिद्धांतानुसार, गुरुत्वाकर्षण शक्ती (The force of gravity) आपल्या जगाप्रमाणे समांतर जगात सापडली नसेल म्हणूनच तिथं सगळं उलटं चालतं. तिथं सर्वकाही आपल्या जगाच्या विरोधी असेल. त्या जगाच्या नजरेतून आपलं जग त्यांच्या पूर्णपणे उलट असेल आणि आपण विरोधी जग आहोत, असं त्यांना वाटेल. दरम्यान, शास्त्रज्ञ त्यांच्या अंदाजानुसार या विरोधाभास असणाऱ्या जगाची माहिती मिळवत आहेत. त्यामुळे हे जग कसं आहे आणि ते खरंच उलटं आहे का, हे संशोधकांच्या संशोधनातून पुढे येईल.
  First published:

  Tags: Science

  पुढील बातम्या