रोजच्या कामातून 'असा' करा व्यायाम

रोजच्या कामातून 'असा' करा व्यायाम

पण या जीवनशैलीत स्वत:च्या शरीराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पण तरीही आता आपण स्वत:ला फिट ठेवु शकतो. त्यासाठी हे आहेत काही खास उपाय

  • Share this:

12 नोव्हेंबर: सध्याच्या या प्रेझेंटेबल जीवनामध्ये आपण निटनेटके राहण्याबरोबर आपल्या शरीराच्या फिटनेसकडेही लक्ष देणं तितकच महत्त्वाचं आहे. आपण रोज कंप्युटरसमोर बसून काम करतो. रोजच्या या कामामुळे आपल्याला व्यायाम करण्यास किंवा जिम जाण्यास आपल्या पुरेसा वेळ मिळतं नाही. पण या जीवनशैलीत स्वत:च्या शरीराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पण तरीही आता आपण स्वत:ला फिट ठेवु शकतो. त्यासाठी हे आहेत काही खास उपाय

1) आपण दररोज थोडं तरी चाललं पाहिजे. चालणं हा एक उत्तम व्यायाम आहे. एक मिनीटभर चाला आणि एका मिनीटापर्यंत धावा. याने आपलं वजन कमी होण्यास मदत होईल.

2) तुम्ही जर रोज स्विमिंग करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी ते अतिउत्तम आहे. स्विमिंग केल्यानेही वजन कमी होण्यास मदत होते. त्याने आपली सहनशीलता वाढते.

3) रोज थोड्यावेळ तरी सायकल चालवा. त्याने तुमच वजन नियंत्रणात राहील. सायकल चालवणं सगळ्यात उत्तम व्यायाम आहे.

4) रोज आपल्या आवडत्या गाण्यावर डांन्स करा. त्याने शरीरावरील चरबी कमी होण्यास मदत होते. डान्स केल्याने आपलं मनही प्रसन्न राहतं.

5) रोज काही वेळासाठी ध्यानसाधना करा. त्याने तुमच्या शरीरातील संतुलन साधता येईल. ध्यानसाधनेने वाढलेलं वजन कमी करण्यास आणि कमी वजन वाढवण्यासही मदत होते.

6) सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले स्वत:ची काळजी घ्यायला शिका. आवडेल त्या गोष्टी प्रमाणात करा.स्वत:वर प्रेम करा. त्याने तुम्ही खूप प्रसन्न राहाल आणि नेहमी आनंदी राहाल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 12, 2017 12:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading