मुंबई, 08 जानेवारी : थंडीत (Winter) बाहेर जाऊन व्यायाम करायला कंटाळा येतो. त्यामुळे घरी बसून बसून वजन वाढतं (Weight Gain). तुमचं वजनही वाढलं आहे किंवा पोटावरील चरबी वाढली आहे? मग हे पाच व्यायाम (Exercises) करा आणि वजन कमी करा. हे व्यायाम करण्यासाठी तुम्हाला घराबाहेर पडण्याचीही गरज नाही. अगदी घरच्या घरी तुम्ही सहजपणे एक्सरसाइज करू करू शकता.
यामुळे तुमचं वजन कमी होईल. विशेषतः पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होईल.
माउंटन क्लाईम्बर : या व्यायामानं पोटावरील चरबी कमी होतेच पण कॅलरीज (Calories)जाळण्यासाठी आणि दंडाचे स्नायू बळकट करण्यासाठी मदत होते.
असा करा हा व्यायाम :
प्रथम जमिनीवर गुडघे टेका, दोन्ही हात समोर लांब ठेवा. दोन्ही पाय सरळ मागे करा. दोन्ही हात आणि दोन्ही पाय यांच्यामध्ये खांद्याच्या रुंदी इतके अंतर ठेवा. उजव्या पाय गुडघ्यातून वाकवून छातीजवळ आणा. पुन्हा सरळ करून मागे न्या. आता डावा पाय गुडघ्यातून वाकवून छातीजवळ आणा, आणि नंतर सरळ करून मागे न्या. हिप्स सरळ ठेवून उजवा आणि डावा पाय आत बाहेर घेण्याची ही क्रिया करत रहा. पाय आत घेताना श्वास घ्या बाहेर नेताना श्वास बाहेर सोडा. किमान 15 वेळा हा व्यायाम करा.
सायकलिंग : सायकलिंगमुळे हिप्सचे स्नायू मजबूत होतात. पोटाच्या वरच्या भागाचे स्नायू कार्यक्षम होतात आणि मांड्या टोन होण्यास मदत होते.
असा करा हा व्यायाम :
यासाठी मॅटवर पाठीवर झोपा. हात शरीराच्या बाजूला किंवा डोक्याखाली ठेवा. दोन्ही पाय उचलून गुडघ्यातून वाकवा. उजव्या पायाचा गुडघा छातीजवळ आणा, डावा पाय दूर ठेवा. नंतर डावा पाय छातीजवळ आणा. तुम्ही सायकल चालवत आहात अशी ही क्रिया किमान 15 वेळा करा.
हे वाचा - पायांची काळजी घेण्यासाठी ब्युटी पार्लर हवंच कशाला? घरच्या घरी असं करा Pedicure
रिव्हर्स क्रंचेस : या व्यायामाने महत्त्वाचे स्नायू कार्यक्षम होतात. पोटाच्या खालच्या भागातील स्नायू टोन करण्यासाठी हा उत्तम व्यायाम आहे. रोज हा व्यायाम केल्यास काहीच दिवसात पोटावरील चरबी कमी होईल.
असा करा हा व्यायाम :
यासाठी पाठीवर झोपा आणि पाय 90 अंशाच्या कोनात उचला. हात जमिनीवर ठेवा. गुडघ्यांना छातीजवळ आणून पाय आणि हिप्स छताच्या दिशेनं उचला. पुन्हा हळू हळू नॉर्मल स्थितीत या. ही क्रिया 15 वेळा करा.
लंजेस विथ फ्रंट किक्स : या व्यायामामुळं हार्ट बीटस सुधारतात. लवचिकपणा वाढतो आणि स्न्यायू मजबूत होण्यास मदत मिळते.
असा करा हा व्यायाम :
आपल्या दोन्ही पायांपासून सुरुवात करा. लंजेस पूर्ण करण्यासाठी एक पाय उचलून पुन्हा जमिनीवर ठेवा. पुन्हा मूळ स्थितीत या आणि पाय उचला. एक किक पूर्ण करा आणि पुन्हा पहिल्या स्थितीत परत या. हा व्यायामही 15 वेळा करा.
हे वाचा - जगातली 8 ठिकाणं, जिथे हिवाळ्यातही नसते थंडी आणि तरीही वर्षभर असते मस्त हवा
फ्लटर किक्स : या व्यायामानं अतिरिक्त कॅलरीज जाळण्यास मदत होते. कार्डीओव्हस्क्युलर व्यायाम वाढवण्यासाठी, सहनशक्ती वाढवण्यासाठी, पोटावरील चरबी दूर करण्यास मदत होते.
असा करा हा व्यायाम :
यासाठी मॅटवर झोपा. दोन्ही पाय एकत्र समोर ठेवा आणि नंतर ते समोर पसरा. पोट आत घ्या. पाय जमिनीवरून उचलून वरच्या दिशेने न्या आणि मग हळूहळू खाली आणा. अशी क्रिया 15 वेळा करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fitness, Lifestyle, Weight gain, Weight loss