Home /News /lifestyle /

ऐतिहासिक यश! सर्व रुग्णांचा कॅन्सर काही दिवसांतच पूर्णपणे 'गायब'; फक्त एका औषधानेच केला चमत्कार

ऐतिहासिक यश! सर्व रुग्णांचा कॅन्सर काही दिवसांतच पूर्णपणे 'गायब'; फक्त एका औषधानेच केला चमत्कार

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

कॅन्सर रुग्णांवर पहिल्याच टप्प्यात औषधाच्या चाचणीचं ट्रायल 100 टक्के यशस्वी झालं आहे. औषधाचा परिणाम पाहून रुग्णांसह डॉक्टरही हैराण झाले.

    वॉशिंग्टन, 07 जून : कॅन्सर म्हटलं की तरी फक्त नाव ऐकूनच धडकी भरते. कॅन्सर रुग्णांना बऱ्याच उपचारांना सामोरं जावं लागतं. तरी कॅन्सर पूर्णपणे बरा होत नाही किंवा तो पुन्हा पुन्हा डोकं वर काढतो. पण आता कॅन्सर उपचारात शास्त्रज्ञांना ऐतिहासिक यश मिळालं आहे. शास्त्रज्ञांनी कॅन्सरविरोधात असं औषध तयार केले आहे, ज्यामुळे कॅन्सर काही दिवसातच गायब होतो. या औषधाची रुग्णांवरील चाचणी 100 टक्के यशस्वी ठरली आहे. याचा रिझल्ट पाहून डॉक्टरही हैराण झाले आहेत (Cancer patient cure completly). अगदी छोट्या स्तरावर कॅन्सर रुग्णांवर डोस्टारलिमॅब (Dostarlimab) औषधाचं ट्रायल घेण्यात आलं. 12 रुग्णांना हे औषध देण्यात आलं. एका मर्यादित कालावधीपर्यंत हे औषध दिल्यानंतर या रुग्णांची चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या शरीरात कॅन्सर नसल्याचं निदान झालं. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. ग्लॅक्सोस्मिथक्लाइन कंपनीने तयार केले ं हे औषध आहे. रेक्टल कॅन्सरच्या रुग्णांवर या औषधाची यशस्वी चाचणी झाली आहे. ज्याचे परिणाम हैराण करणारे आहेत. हे वाचा - पुरुषांच्या वंध्यत्वावर उपाय सापडला; एका छोट्याशा चिपमुळे झाली Sperm ची निर्मिती यूएसमधील मेमोरियअल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरचे डॉ. लुइस ए डियाज जुनियर यांनी द न्यूयॉर्क टाइम्सशी बोलताना सांगितलं की, माझ्या मते कॅन्सरच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं आहे. या रुग्णांनी सहा महिने दर तीन आठवडे हे औषध घेतलं. सर्व रुग्ण कॅन्सरच्या सारख्या टप्प्यात होते. संशोधनाच्या सहलेखिका डॉ. एंड्रिया सेर्सेक ज्या मेमोरियअल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरमध्ये ऑन्कोलॉजिस्ट आहेत. यांनी टाइम्सशी बोलताना सांगितलं की, जेव्हा परिणाम समोर आले तेव्हा त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. सर्सेक म्हणाल्या, या संशोधनानंतर आनंदी झालेल्या रुग्णांचे बरेच ई-मेल आले. जे वाचून माझ्या डोळ्यात अश्रू आले.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Cancer, Health, Lifestyle

    पुढील बातम्या