अश्विनीने तिच्या अमेरिकेतील घराभोवती सुंदर फुलांची तसेच फळभाज्यांची बाग फुलवली आहे. स्वत:च्या बागेतील फुलवलेल्या भाज्या खाण्यात वेगळा आनंद असतो असं अश्विनी म्हणते.View this post on Instagram
अश्विनी आता चित्रपटांत दिसत नसली तरीही तिच्या जुन्या हिंदी, मराठी चित्रपटांचे असंख्य चाहते आहेत. हेना, परंपरा, कायदा कानून, जखमी दिल (Jakhmi dil) , एक राजा राणी, पुरुष, जुर्माना अशा अनेक हिंदी चित्रपटांत तिने काम केलं आहे.View this post on Instagram
तर मराठीत अशी ही बनवा बनवी (Ashi hi banva banvi), धडाकेबाज (Dhadakebaaz) , शाब्बास सुनबाई (shabbas sunbai), सरकारनामा (sarkarnama), हळद रुसली कुंकू हसलं (halad rusli kunku hasla), एक रात्र मंतरलेली अशा सुपरहिट चित्रपटांत तिने काम केलं आहे. मराठी, हिंदी खेरीज काही कन्नड चित्रपटांतही तिने काम केलं आहे. ‘शरवेगडा सरदारा’, ‘विष्णू विजाया’, ‘Rangenahalliyage Rangada Rangegowda’ या कन्नड चित्रपटांत ती दिसली होती.View this post on Instagram
कादर खान यांच्या मुलाचं निधन; एअरपोर्टवर करत होता सिक्युरिटीचं काम
अश्विनीने उद्योजक किशोर बोपार्डीकर Kishore Bopardikar यांच्याशी विवाह केला असून त्यांना दोन मुलं आहेत. सध्या ती कुटुंबासोबतच संपूर्ण वेळ घालवते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Marathi actress