सरकारच्या नाकावर टिच्चून पॉर्न साइटचं कमबॅक! अजब शक्कल लढवत बंदीनंतरही भारतात केली एण्ट्री

सरकारच्या नाकावर टिच्चून पॉर्न साइटचं कमबॅक! अजब शक्कल लढवत बंदीनंतरही भारतात केली एण्ट्री

माहिती प्रसारक विभागानं लावलेल्या बंदीनंतरही या दोन प्रसिद्ध पॉर्न वेबसाइटनं भारतात एण्ट्री केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : केंद्र सरकारनं पॉर्न वेबसाइटवर लावलेल्या बंदीनंतरही अजब शक्कल लढवत या वेबसाइटनं भारतात पुनरागमन केले आहे. त्यामुळं देशभरात स्मार्टफोन आता पुन्हा पॉर्नोग्राफी पाहिली जाणार आहे. याआधी माहिती आणि प्रसारक विभागानं सर्व इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपनींवर बंदी घातली होती. माहिती प्रसारक विभागानं माहिती तंत्रज्ञान कायदा 2000, कलम 79(3) (ब)च्या तरतुदीनुसार पॉर्न वेबसाइटवर बंदी लावली होती.

या कलमानुसार याआधी 875 वेबसाईटवर अनैतिक आणि असभ्य व्हिडीओ दाखवत असल्याचे आरोप करत बंदी घालण्यात आली होती. यात सर्वात मोठ्या रेडट्युब आणि पॉर्नहब या दोन पॉर्न वेबसाइटचा समावेश होता. मात्र या दोन्ही वेबसाइटनं पुन्हा एकदा भारतात पुनरागमन केले आहे. या दोन्ही वेबसाइटनं कारवाईनंतर आपले डोमेन नाव बदलले आहे. रेडट्युब आणि पॉर्नहब यांनी व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क (VPN), ब्राउझर, प्रॉक्सी आणि अन्य उपायांचा वापर करत भारतात शिरकाव केला आहे.

वाचा-दररोज आंघोळ केल्यास तुमची ही ताकद होते कमी

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये माहिती प्रसारक विभागानं जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन यांसारख्या टेलिकॉम ऑपरेटरवरही पॉर्न किंवा चाईल्ड पॉर्नोग्राफी संबंधित मजकूर दाखवण्यावर बंदी घालण्यात आली होती.

वाचा-पुरुषांच्या या 5 गोष्टींवर जीव ओततात मुली, तुम्हीही घ्या जाणून!

दरम्यान, या सगळ्याबाबत सायबर लॉचे विश्लेषक पवन दिग्गुल यांनी आपलं मत व्यक्त करत, “बंदीनंतरही पॉर्न पाहणाऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. पॉर्नवर बंदीपेक्षा सक्त कायदे आणण्याची खरी गरज आहे. यामध्ये आता स्त्रीयाही तितक्याच प्रमाणात सामील आहेत. पॉर्न पाहणे ही काही वाईट गोष्ट नाही, मात्र ते प्रमाणात पाहणे गरजेचे आहे. पॉर्न बघून केलेल्या अत्याचाराची अनेक उदाहरणे आपण पाहिली असतील. अशी कृत्ये ही विकृती आहे, जी पॉर्न पाहण्याच्या आहारी गेलेल्या व्यक्तीमध्ये निर्माण होते”. यामुळं पॉर्न साइटवर आळा घालण्यासाठी पुढे काय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

वाचा-फ्लर्ट करण्यात या राशींच्या मुली असतात Expert, मुलांना वाटतं आहे प्रेम

VIDEO: राष्ट्रावादीसोबत फॉर्म्युला ठरला; मित्रपक्षांसोबत अजूनही सस्पेन्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 29, 2019 07:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading