मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

मोठा धक्का! कोरोनाने घेतला पंतप्रधानांचा बळी; महिनाभराची झुंज ठरली अपयशी

मोठा धक्का! कोरोनाने घेतला पंतप्रधानांचा बळी; महिनाभराची झुंज ठरली अपयशी

फोटो सौजन्य - रॉयटर्स

फोटो सौजन्य - रॉयटर्स

चार आठवड्यांपूर्वी पंतप्रधानांना कोरोनाची लागण झाली होती.

    जोहान्सबर्ग, 14 डिसेंबर : जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनामुळे (coronavirus) कित्येक प्रसिद्ध व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. भारतानं कोरोनामुळे अनेक नेत्यांना गमावलं आहे. आता आफ्रिका (africa) खंडातील एका देशात पंतप्रधानांचाच कोरोनानं जीव घेतला आहे. इस्वाटिनी देशाचे पंतप्रधान एम्बोरोसे डलामिनी (Prime Minister Ambrose Dlamini) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तब्बल महिनाभर त्यांनी कोरोनाशी झुंज दिली. मात्र त्यांचा हा लढा अपयशी ठरला. 52 वर्षांचे एम्बोरोसे दालमिनी यांना चार आठवड्यांपूर्वीच कोरोनानं विळखा घातला होता. त्यांना चांगले उपचार मिळून त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी म्हणून त्यांना दक्षिण आफ्रिकेतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. एक डिसेंबरपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण त्यांचा हा लढा ते हरले. रुग्णालयातच रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इस्वाटिनीचे उपपंतप्रधान थेंबा मसुकू यांनी त्यांच्या निधनाचं वृत्त दिलं आहे. दक्षिण आफ्रिकेतील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली. रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार थेंबा मुसकू यांनी सांगितलं, पंतप्रधान एम्बोरोसे डलामिनी यांच्या निधनाची वार्ता नागरिकांना देण्याच्या सूचना राजपरिवाराकडून मिळाल्या आहेत.  रविवारी दुपारी दक्षिण आफ्रिकेतील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. हे वाचा - धक्कादायक! प्लाझ्मा चढवताच कोरोना रुग्णाचा मृत्यू; पोस्टमॉर्टेममध्ये मोठा खुलासा एक डिसेंबरला डालमिनी यांना जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत होते. मात्र त्यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. नोव्हेंबर 2018 मध्ये दालमिनी यांच इ्स्वाटिनीच्या पंतप्रधानपदी निवड झाली होती. त्यांनी बँकिंग क्षेत्रातही अठरा वर्षांपेक्षा अधिक काळ काम केलं आहे. इ्स्वाटिनी नेडबँक लिमिटेडमध्ये ते व्यवस्थापकीय संचालक होते. इस्वाटिनी हा दक्षिण आफ्रिकेतील छोटासा देश आहे.  1.2 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील या देशात 6,768 कोरोना रुग्ण आहेत. 127 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे वाचा - IIT झालं कोरोनाचं हॉटस्पॉट, ‘मेस’मुळे 71 जणांना COVIDची लागण झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप भारतामध्ये काही नेत्यांचा कोरोनावर उपचार घेताना प्रकृती गंभीर झाल्यानंतर तर काही जणांनी कोरोनावर मात केल्यानंतरही गुंतागुत निर्माण झाल्यानं म्हणजेच  POST COVID COMPLICATION मुळे आपला जीव गमावला. यामध्ये  माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, आसामचं मुख्यमंत्रिपद भूषवणारे काँग्रेस नेते तरुण गोगोई, शरद पवार यांच्या जवळचे मानले जाणारे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार  भारत भालके, गायक एसपी बालासुब्रमण्यम यांचा समावेश आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona, Coronavirus

    पुढील बातम्या