मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Liquid Window; ऊर्जेची बचत करणारी स्मार्ट खिडकी

Liquid Window; ऊर्जेची बचत करणारी स्मार्ट खिडकी

फोटौ सौजन्य - Pixabay

फोटौ सौजन्य - Pixabay

ही खिडकी (window) सूर्यप्रकाशापासून मिळणारी ऊर्जा साठवून ठेवते आणि गरज पडल्यास उत्सर्जित करते.

    सिंगापूर, 07 नोव्हेंबर : सध्याच्या काळात जगात अशा इमारती बांधण्यावर भर दिला जात आहे. ज्यामध्ये वीज आणि इतर ऊर्जेचा वापर कमी केला जाऊ शकतो. इमारतींचं डिझाईन करताना इमारतीतील प्रत्येक घरातील कानाकोपऱ्यात सूर्यप्रकाश पोहोचेल, याची काळजी घेतली जाते. याशिवाय घरात व्हेंटिलेशनदेखील असं असेल ज्यामुळे दिवसा विजेची उपकरणं वापरण्याची गरजच पडणार नाही किंवा ती खूप कमी वापरावी लागतील. याच दिशेनं विचार करत वैज्ञानिकांनी एक विशेष 'लिक्विड विंडो' (liquid window) तयार केली आहे जी ऊर्जेला साठवून ठेवते आणि वेळ आली की तिचं उत्सर्जन करते. खिडकी (window) ही इमारतीच्या डिझाईनचा एक मुख्य घटक असते.‌ पारंपरिक खिडक्या ऊर्जेची कमी बचत करतात. संयुक्त राष्ट्राच्या 2009 च्या अहवालानुसार जागतिक स्तरावर इमारतींमध्ये 40 टक्के उर्जा खर्च होते ज्यात निम्मी उर्जा खिडक्यांमुळे खर्च होते. सिंगापूरच्या नानयांग टेक्नोलॉजी युनिव्हर्सिटीच्या (एनटीयु) वैज्ञानिकांनी ही विंडो तयार केली आहे, जी पारंपरिक खिडक्यांच्या काचांच्या तुलनेत या खिडकीची काच 45 टक्के ऊर्जा खर्चाची बचत करते. ही खिडकी म्हणजे लिक्विड विंडो. ही खिडकी सूर्यापासून येणारी ऊर्जा रोखू आणि नियंत्रित करू शकते. ती ऊर्जा साठवून ती दिवसा आणि रात्री उत्सर्जित करते त्यामुळे इमारतीमधील ऊर्जेचा वापर कमी करण्यास उपयुक्त ठरते. हे वाचा - एक सकारात्मक संशोधन; ज्वालामुखी उद्रेकाचा आधीच अंदाज देणार हा विशेष ड्रोन, वाचा सविस्तर एनटीयूमधील संशोधकांनी त्यांच्या स्मार्ट विंडोजच्या पॅनलमध्ये हायड्रोजेल आधारित लिक्विड वापरलं आहे. मायक्रो हायड्रोजेल, पाणी आणि स्टॅबिलायझरचा वापर केला. त्यांच्यावर केलेल्या प्रयोग आणि सिम्युलेशनमुळे त्यांना असे आढळले की हे मिश्रण वेगवेगळ्या हवामानात उर्जाचा कमी वापर करतं. त्यामुळे बदललेल्या तापमानात प्रतिक्रिया देण्याची क्षमता त्यात आहे. हायड्रोजेलमुळे उष्णतेच्यासमोर हे लिक्विड अपारदर्शक बनतं ज्यामुळे सूर्यप्रकाशाला रोखू शकतं. परंतु थंड झाल्यावर ते आपल्या मूळ पारदर्शक अवस्थेत परत येतं. हे वाचा - निसर्गरम्य परिसर आणि हॉट मॉडेल्स; Kingfisher Calendar 2021 ची झलक ही विंडो कमी खर्चात तयार होते आणि त्याच वेळी ती बाजारात उपलब्ध असलेल्या कमी एमिस्सिव्हिटीच्या काचेपेक्षा 30 टक्के अधिक प्रभावीदेखील आहे. लिक्विडपासून तयार झालेल्या उर्जा बचत करणाऱ्या स्मार्ट विंडोबाबत एका विज्ञानविषयक जर्नलमध्ये पहिल्यांदाच छापून आलं आहे.लिक्विड विंडो ऑफिस इमारतींसाठी अधिकच उपयुक्त आहे. यात वापरलं जाणारं मिश्रण हे दोन काचांच्यामध्ये टाकलं जातं. यामुळेच बाहेरून येणारा सूर्यप्रकाश आणि बाहेरचा आवाज रोखला जातो.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Research

    पुढील बातम्या