'एनर्जी ड्रिंक' पिण्याची सवय पडू शकते महाग; तुम्हाला होऊ शकतो हा आजार

'एनर्जी ड्रिंक' पिण्याची सवय पडू शकते महाग; तुम्हाला होऊ शकतो हा आजार

तुम्हाला एनर्जी ड्रिंक पिण्याची सवय पडू शकते महाग. तुम्ही देत आहात या आजाराला निमंत्रण

  • Share this:

नवी दिल्ली, 15 जुलै: कॉलेज लाईफमध्ये आपण मजेमजेत घेत असलेलं 'एनर्जी ड्रिंक' आपली कधी सवय होते ते आपल्याला कळत नाही. जागरण, नाईट आऊट पार्टी किंवा मजा म्हणून घेतलेलं एनर्जी ड्रिंक नंतर आपली सवय होऊन जाते आणि हीच सवय आपल्याला महागतही पडू शकते.

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. त्यामुळे एनर्जी ड्रिंकची सवय किंंवा अतिरेक हा आपल्या मेंदूवर आणि शरीरावर दीर्घकाळ परिणाम करू शकतो. एका संशोधनातून असं समोर आलं आहे की एनर्जी ड्रिंक पिण्याची सवय असलेल्या व्यक्तीच्या मेंदूवर गंभीर परिणाम होतो.  कदाचित नैराश्य येणं, वेड लागणं इतकच नाही तर तुमचा स्वत: वरील ताबाही काही वेळा सुटू शकतो.

(वाचा : पावसाळ्यात या 10 ठिकाणी जायलाच हवं; फोटो बघून तुम्हीही म्हणाल हेच!)

एनर्जी ड्रिंकमध्ये नेमकं असं काय असतं ज्यामुळे गंभीर परिणाम होतो? पाहुया

ब्रिटनमधील एका कॉलेजमध्ये झालेल्या एका संशोधनात एनर्जी ड्रिंकमुळे शरीरातील कॅफीनचं प्रमाण वाढतं आणि झोप येत नाही. आपल्या मेंदू आणि शरीराला किमान 6 ते 8 तास शांत झोपेची आवश्यकता असते. एनर्जी ड्रिंकमधील कॅफीनमुळे तुम्हाला झोप येत नाही. असं सतत होत राहिलं तर नैराश्य येतं आणि त्याचं रूपांतर पुढे मनोरूग्णामध्ये होतं. काही वेळा नशा किंवा ड्रग्सकडे आकर्षित होतात.

(वाचा :सावधान ! आंघोळ करताना करताय का 'या' चुका? तुमचं होतंय मोठं नुकसान)

कॅफीनयुक्त एनर्जी ड्रिग्स ही फक्त मनावर आणि मेंदूवरच नाही तर शरीरावरही परिणाम करणारी आहेत. एनर्जी ड्रिंग्सच्या अधिक सेवानामुळे वजन वाढतं, शरीरातील फॅटचं प्रमाण वाढतं. मानसिक संतुलन आणि आरोग्य सांभाळण्यासाठी कॅफीनयुक्त एनर्जी ड्रिग्सचं सेवन टाळा. एनर्जी ड्रिक मजा म्हणून घेणं आणि सवय म्हणून घेणं यात फरक आहे. शक्य असेल तर दोन्ही गोष्टी करणं टाळावं ज्यामुळे आपलं शरीर, मन निरोगी राहील.

(वाचा :पाऊस, गरमी आणि प्रदूषणापासून वाचायचं असेल तर या ठिकाणी नक्कीच जा)

VIDEO: सलमान खानने केलं 'Bottle Cap Challenge'; सगळ्यांची बोलती झाली बंद!

First published: April 7, 2019, 7:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading