बिल गेट्सना मागे टाकत एलन मस्क जगातील दुसरे सर्वांत श्रीमंत व्यक्ती; ट्विटरवर मीम्सचा पाऊस

बिल गेट्सना मागे टाकत एलन मस्क जगातील दुसरे सर्वांत श्रीमंत व्यक्ती; ट्विटरवर मीम्सचा पाऊस

जगातली सर्वांत श्रीमंत व्यक्ती एके काळी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) होते. आता ते तिसऱ्या स्थानावर गेले आहेत.

  • Share this:

न्यूयॉर्क, 24 नोव्हेंबर : जगातली सर्वांत श्रीमंत व्यक्ती एके काळी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) होते. त्यानंतर गेली काही वर्षं Amazon चे मालक जेफ बेझॉस यांनी त्यांची जागा घेतली आणि गेट्स दुसऱ्या स्थानावर गेले. आता बिल गेट्स यांचं दुसरं स्थानही गेलं आहे आणि ती जागा घेतली आहे. टेस्लाच्या प्रमुखांनी. 2020 हे वर्ष Tesla आणि स्पेसएक्स (SpaceX) कंपनीचे प्रमुख एलन मस्क यांच्यासाठी अत्यंत लाभदायी ठरलं आहे. सोमवारी टेस्लाच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाल्यानं एलन मस्क मायक्रोसॉफ्टचे प्रमुख बिल गेट्स यांना मागे टाकत जगातील दुसरी सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

2017 मध्ये अॅमेझॉनचे मालक जेफ बेझोस पहिल्या स्थानावर आल्यानंतर बिल गेट्स दुसऱ्या स्थानावर गेले. ब्लूमबर्ग बिलिनियर्स यादीत जेफ बेझोस प्रथम क्रमांकावर आहेत.

ब्लूमबर्गने दिलेल्या अहवालानुसार, मस्क यांच्या संपत्तीत 7.2 अब्ज डॉलर्सची वाढ झाली असून, त्यांची एकूण संपत्ती 127.9 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. 2020 या एका वर्षात मस्क यांच्या संपत्तीत 100.3 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. टेस्ला कंपनीचे सध्याचे बाजारमूल्य 500 अब्ज डॉलर्स आहे.

ब्लूमबर्ग बिलियनर्सच्या यादीतील कोणत्याही व्यक्तीच्या संपत्तीत इतकी वाढ झालेली नाही. टेस्लाच्या शेअर्सच्या किंमतीत मोठी वाढ झाल्यामुळे एलन मस्क यांच्या संपत्तीत झालेली वाढ त्यांच्या स्पेस एक्समधील हिश्श्यापेक्षा चौपट असून, मस्क यांच्या एकूण संपत्तीतील तीन चतुर्थांश हिस्सा हा टेस्लाचा आहे.

काही दिवसांपूर्वीच फेसबुकच्या मार्क झुकेरबर्ग यांना मागे टाकत एलन मस्क जगातील तिसरे सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनले होते. या वर्षी जानेवारी महिन्यात ते जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत ३५ व्या क्रमांकावर होते. एका वर्षाच्या आत ते जगातील दुसरे सर्वांत श्रीमंत व्यक्ती झाले आहेत.

या बातमीमुळे ट्विटरवर लोकांनी विनोदी मिम्सचा पाऊस पाडला आहे.

एकाने सलमान खानच्या एका चित्रपटातील गाण्याचे दृश्य टाकून  “ऐसा पहिली बार हुआ है सतरा अठरा सालों में’ अशी कमेंट टाकली आहे.

एकाने “काल माझे ५४ रुपये कोणीतरी चोरले आणि आज एलन मस्क जगताला दुसरा सर्वांत श्रीमंत व्यक्ती झाला” असे म्हटले आहे.

एकाने नवाझुद्दिन सिद्दीकीचे वेबसिरीजमधील दृश्याचा फोटो ट्विट केलाय त्यावर नवाझचा डायलॉग लिहिलाय “चाँद पे है आपून.’ तर एकाने बिल गेट्स बंदूक हातात घेऊन शिकार करत आहेत, आणि एलन मस्क वाघाच्या रुपात त्यांच्याकडे पहात आहे, असे फोटो टाकले आहेत. तारक मेहताचा फोटो टाकून ‘तेरा तो कुछ करना पडेगा बेटा’ अशी कमेंट केली आहे.

सोमवारी एका गुंतवणूकदाराने प्रथमच टेस्लाचा शेअर ५०० डॉलर्सच्या वर बंद झाल्याबद्दल कंपनीचे अभिनंदन केले होते. त्याला उत्तर देताना मस्क यांनी फक्त ‘वाव’ अशी प्रतिक्रिया दिली होती.

First published: November 24, 2020, 10:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading