चेन्नई, 02 डिसेंबर : आतापर्यंत प्राण्यांच्या (Animal) शिकारीचे, फायटिंगचे व्हिडीओ तुम्ही पाहिले आहेत. पण एखादा प्राणी जखमी झाला तर त्यावेळी इतर प्राणी काय करतात हे तुम्ही क्वचितच पाहिलं असेल. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आपला साथीदार जखमी आहे, वेदनेनं व्याकूळ होतो आहे, हे पाहताच दुसरी हत्ती त्याच्यावर उपचार करण्यासाठी सरसावले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (social media viral) झाला आहे.
तामिळनाडूतल्या (tamilnadu) नीलगिरी जिल्ह्यातील हा व्हिडीओ आहे. एका नर हत्तीच्या पाठीला जखम झाली. जंगलातील कर्मचारी या जखमी हत्तीवर उपचार करत आहेत. फक्त कर्मचारीच नाही तर हत्तीचे इतर साथीही त्याच्यावर उपचार करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुसांता नंदा यांनी आपल्या ट्टिवटरवर शेअर केला आहे.
Angels at job🙏 A team of forest and veterinarians treating a male wild elephant with a back injury in Nilgiri districts today morning. pic.twitter.com/vKZCl3iKla
— Susanta Nanda IFS (@susantananda3) December 30, 2020
व्हिडीओत पाहू शकता. जखमी हत्तीवर नीट उपचार करता यावे, तो एका जागी नीट उभा राहावा म्हणून त्याच्या पायांना बांधण्यात आलं आहे. प्राण्यांचा एक डॉक्टर दुसऱ्या एका हत्तीवर बसला आहे आणि जखमी हत्तीवर उपचार करत आहे.
हे वाचा - नडला त्याला भिडला! कांगारूला दगड मारत होता तरुण; काय झालं पाहा VIDEO
तर दुसऱ्या बाजूला आणखी एक हत्ती उभा आहे, तोदेखील या उपचारात मदत करतो आहे. आपली जवळची व्यक्ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी माणसं जशी धडपडतात तशीच धडपड या मुक्या जीवांमध्येही दिसून येते आहे. आपला मित्र लवकर बरा व्हावा यासाठी आपल्याला जमेल तितकी मदत करण्याचा प्रयत्न ते करत आहेत.
हे वाचा - VIDEO: मासे पकडण्यासाठी गळ टाकला, पण माशाबरोबर बाहेर असं काही आलं की...
कित्येक वेळा तर माणसंदेखील अशी वागत नाही. रस्त्यावर एखादी जखमी किंवा वेदनेनं व्याकूळ झालेली व्यक्ती दिसली की इतर माणसं तिच्याकडे दुर्लक्षच करतात. पण प्राण्यांच्याबाबतीत मात्र तसं नाही. संकटाच्या काळात हे प्राणी एकमेकांसाठी कसे उभे राहतात, याचाच प्रत्यक देणारा हा व्हिडीओ.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media, Social media viral, Viral