अबब! ही तर 'गजानन एक्स्प्रेस'; ट्रेनऐवजी रेल्वे ट्रॅकवर आला हत्ती, पुढे काय घडलं तुम्हीच पाहा VIDEO

अबब! ही तर 'गजानन एक्स्प्रेस'; ट्रेनऐवजी रेल्वे ट्रॅकवर आला हत्ती, पुढे काय घडलं तुम्हीच पाहा VIDEO

रेल्वे ट्रॅकवर आलेल्या हत्तीचा (Elephant on railway track) हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

  • Share this:

मुंबई, 22 एप्रिल  : 'प्रवाशांनो कृपया लक्ष द्या... गजानन एक्स्प्रेस काही वेळातच प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरून जाईल. आपाआपले कॅमेरे बाहेर काढा आणि सुरक्षित अंतर ठेवा', आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा (Dıpanshu kabra) यांनी आपल्या ट्विटवर केलेल्या रेल्वे स्टेशनवरील अनाऊसमेंटची ही विचित्र पोस्ट. ही अशी अनाऊसमेंट का हे त्यांनी यासोबत शेअर केलला व्हिडीओ पाहिल्यानंतरच समजेल.

गजानन एक्स्प्रेस ही कोणती नवी एक्स्प्रेस बरं? आणि त्यासाठी कॅमेरा का बाहेर काढायला हवेत? असे बरेच प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर ही गजानन एक्स्प्रेस म्हणजे चक्क तुमचा आमचा लाडका जम्बो अर्थातच हत्ती.

हो बरोबर रेल्वे ट्रॅकवर एक्स्प्रेसच्याऐवजी चक्क हत्तीची स्वारी आली हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.

हे वाचा - Man Vs Dog : अनोख्या Volleyball मॅचमध्ये खरा खिलाडी कोण? VIDEO पाहून सांगा

व्हिडीओत पाहू शकता. वेळ रात्रीची आहे. तसं स्टेशनवर कुणीच नाही. स्टेशन अगदी सुनसान झालं आहे. तिथून रेल्वे ट्रॅकवरून अचानक एक हत्ती डुलत येताना दिसतो. रेल्वे ट्रॅकवरून तो छान ऐटीत चालताना दिसतो. जणू काही हा रेल्वे ट्रॅक कोणत्या रेल्वेचा नाही तर त्याच्याच मार्ग आहे. त्याच्यासाठीच तो बांधण्यात आला आहे. हत्ती एका दिशेने येतो आणि दुसऱ्या दिशेला शांतपणे चालत जातो. हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत.

Published by: Priya Lad
First published: April 22, 2021, 11:13 PM IST

ताज्या बातम्या