मांस ताजं की शिळं? वास घेऊन एका क्षणात ओळखणार Electronic Nose

मांस ताजं की शिळं? वास घेऊन एका क्षणात ओळखणार Electronic Nose

Electronic Nose मुळे मांस (meat) खरेदीत ग्राहकांची फसवणूकही होणार नाही.

  • Share this:

सिंगापूर, 15 नोव्हेंबर : मांस (meat) घेताना ते ताजं की शिळं हे एकतर आपण वासावरून ओळखतो किंवा त्याच्या रंगावरून. बऱ्याच वेळा हे मांस अशा पद्धतीनं स्टोअर केलेलं असतं ज्यामुळे असे बदल होत नाहीत किंवा ते आपल्याला पटकन समजून येत नाहीत. मात्र आता हे काम अगदी सोप्पं झालं आहे. मांस ताजं की शिळं हे ओळखण्यासाठी Electronic Nose तयार करण्यात आलं आहे.

सध्या बऱ्याच प्रकारची इलेक्ट्रॉनिक उपरकरणं येत आहेत जी आपली बरीच कामं सोपी बनवत आहेत. त्यापैकीच Electronic Nose हे एक उपकरण, जे मांसाचा फक्त वास घेऊन ते ताजं आहे की शिळं याची माहिती तुम्हाला देणार. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीनं हे  उपकरण बनवण्यात आलं आहे.

सिंगापूरच्या नानयांग टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्युटच्या शास्त्रज्ञांच्या पथकानं इलेक्ट्रॉनिक नोज किंवा ई-नोज तयार केलं आहे, जे  प्राण्यांच्या नाकासारखं कार्य करतं.

हे वाचा - हिवाळ्यात स्वस्त झाला कोंबडा, मात्र कोंबडीचे भाव का बरं वाढतायेत? वाचा सविस्तर

यामध्ये बारकोडचा वापर करण्यात आला आहे. मांस मशीनमध्ये टाकल्यानंतर त्याचा वास घेऊनच मांस ताजे आहे की शिळं हे उपकरण लगेच ओळखतं. मांस शिळं व्हायला लागलं की त्यातून बाहेर पडणाऱ्या वायूच्या वासावरून हे उपकरण बारकोडवरील रंगांत बदल करतं त्यावरून मांस शिळं झाल्याचं लक्षात येतं. मांसाच्या रंगावरूनदेखील हे उपकरण ताजेपणा आणि शिळेपणा ओळखू शकतं. प्रयोगात या उपकरणानं 98.5 टक्के अचूक अंदाज लावला आहे.

या अभ्यासातील संशोधक चेन जियओडोंग म्हणाले, "आम्ही प्रूफ ऑफ कन्सेप्ट आर्टिफिशियल ऑलफॅक्टरी सिस्टीमच प्रत्यक्ष परीक्षण केलं आहे. हे पॅकेजिंगसाठी वापरता येऊ शकतं. या बारकोडमुळे ग्राहकांचे पैसे वाचतील. हा बारकोड विषारी नाही, बायोडिग्रेडेबल आहे"

हे वाचा - Liquid Window; ऊर्जेची बचत करणारी स्मार्ट खिडकी

ऑस्ट्रेलियामधील मोनाएश युनिव्हर्सिटी, चीनमधील जिआंगनान युनिव्हर्सिटी, एनटीयू सिंगापूरच्या शास्त्रज्ञांच्या पथकानं सांगितलं की, ई-नोजच्या वापरामुळे अन्नाची नासाडी रोखण्यास मदत होईल. ग्राहकांना मांस विकत घेतानाच ताजं मांस आणि शिळं मांस कुठलं हेदेखील लगेचच कळेल. त्यामुळे त्यांची फसवणूक देखील होणार नाही. बेस्ट बिफोर या लेबलपेक्षा हा पर्याय अधिक चांगला आहे.

Published by: Priya Lad
First published: November 15, 2020, 1:33 PM IST

ताज्या बातम्या