• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Electricity saving Tips: फॅनची स्पीड कमी केल्यामुळे विजेची होते बचत? नक्की काय आहे तथ्य? वाचा

Electricity saving Tips: फॅनची स्पीड कमी केल्यामुळे विजेची होते बचत? नक्की काय आहे तथ्य? वाचा

कमी वेगात पंखा वापरल्यामुळे विजेची (Speed of Fan and Electricity) बचत होऊ शकते का? याबाबतच आज आपण माहिती घेणार आहोत.

 • Share this:
  वीजबचतीसाठी आपण विविध प्रकारचे उपाय करून पाहतो. यासाठीच आम्ही आज एक अत्यंत भन्नाट असा उपाय (Electricity Saving tips) तुम्हाला सांगणार आहोत. आपल्या सर्वांच्याच घरात पंखे असतात. या पंख्यांचा वेग आपण आपल्या सोयीनुसार कमी-जास्त करू शकतो; पण मग कमी वेगात पंखा वापरल्यामुळे विजेची (Speed of Fan and Electricity) बचत होऊ शकते का? याबाबतच आज आपण माहिती घेणार आहोत. आपल्या सर्वांच्या घरात सीलिंग फॅन किंवा टेबल फॅन असतात. सीलिंग फॅनचा वेग कमी-जास्त करण्यासाठी वेगळा असा रेग्युलेटर बसवण्यात आलेला असतो. टेबल फॅन आणि तत्सम पंख्यांमध्ये इन-बिल्ट स्पीड कंट्रोलर देण्यात आलेला असतो. पंख्याच्या वेगानुसार खरोखरच विजेचा कमी-जास्त (Does low speed of fan saves electricity) वापर होतो का, हे पाहण्यासाठी आपल्याला आधी रेग्युलेटर्सबाबत माहिती घ्यावी लागेल. पंख्यांचा वेग कमी-जास्त करण्यासाठी दोन प्रकारचे रेग्युलेटर्स (Types of Fan regulator) उपलब्ध असतात. एक म्हणजे इलेक्ट्रिकल रेग्युलेटर (Electrical regulator) आणि दुसरा इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर. या दोन्हीचं नाव जरी थोडंफार सारखं वाटत असलं, तरीही यांच्या कामामध्ये मोठा फरक आहे. इलेक्ट्रिकल रेग्युलेटर (Electrical regulator working) बऱ्याच काळापासून वापरण्यात येत आहेत. हे नव्या रेग्युलेटर्सच्या तुलनेत स्वस्त असतात. हे रेग्युलेटर पंख्याला पुरवण्यात आलेल्या व्होल्टेजला कमी करून, त्याचा वेग कमी करतात. यामुळे पंख्यापर्यंत पोहोचणारी वीज कमी होते. मात्र, या रेग्युलेटरमध्ये असलेल्या रेझिस्टर्समध्ये ही वीज खर्च होते. म्हणजेच, इलेक्ट्रिकल रेग्युलेटरच्या मदतीने पंख्याचा वेग कमी (Electrical regulators not helpful to save electricity) केला, तरी खर्च होणारी ऊर्जा ही जवळपास तेवढीच राहते. हे वाचा- Navaratri 2021: अबब! इथे दुर्गापूजेनिमित्त चक्क बुर्ज खलिफाच उभा केलाया की! पाहा याउलट नव्या दमाचे इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर (Electronic regulators) हे खऱ्या अर्थाने वीज वाचवतात. या इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर्सच्या मदतीने पंख्याचा सर्वाधिक वेग आणि सर्वांत कमी वेग यादरम्यान सुमारे 30 ते 40 टक्के वीजेची बचत होते. कारण, यामध्ये पंख्याच्या वेगानुसार (Electronic regulators for saving electricity) वीज पुढे ढकलली जाते. तसंच, इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटरप्रमाणे थांबवण्यात आलेली वीज वायाही जात नाही. सध्या बाजारात 60 वॉटचे पंखे उपलब्ध असतात. हा एक पंखा दिवसाचे 18 तास सुरू राहिला, तर तब्बल 1080 वॉट वीजेचा वापर हा एकटा पंखा करतो. हे झालं एका पंख्याचं. आपल्या घरात सुमारे तीन-चार पंखे तर असतातच. म्हणजेच, हे सगळे पंखे मिळून दिवसाला साधारणपणे पाच युनिट विजेचा वापर करतात. एकूण गणित पाहिलं तर, पंख्याचा वेग कमी-जास्त करून तुम्ही दिवसाची साधारणपणे एक ते दीड युनिट वीज वाचवू शकता. म्हणजेच, इलेक्ट्रिकल रेग्युलेटरऐवजी इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर वापरल्यास महिन्याला तुमची तीस ते चाळीस युनिट (Change fan speed to save electricity) वीज वाचू शकते. त्यामुळे तुमच्या घरातही इलेक्ट्रिकल रेग्युलेटर असतील, तर तातडीने ते बदलून घेण्याची गरज आहे. सध्या देशावर कोळसा टंचाईचं सावट आहे. अवघ्या काही दिवसांचा कोळसा साठा शिल्लक असल्याचं बातम्यांमधून सांगण्यात येत आहे. अशात आपलं कर्तव्य आहे, की आपण विजेची शक्य तितकी बचत करण्याचा प्रयत्न करायला हवा.
  First published: