Home /News /lifestyle /

Sankashti chaturthi: गुरुवार, 19 मे रोजी आहे एकदंत संकष्टी चतुर्थी, चंद्रोदयाची वेळ माहीत आहे का?

Sankashti chaturthi: गुरुवार, 19 मे रोजी आहे एकदंत संकष्टी चतुर्थी, चंद्रोदयाची वेळ माहीत आहे का?

महाराष्ट्रात संकष्टी चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ महत्त्वाची असते. अनेक गणेशभक्त या दिवशी उपवास धरतात आणि तो चंद्रोदयाला संकल्पपूर्वक सोडला जातो. पण उत्तर भारतात या वेळी एकदंत संकष्ट चतुर्थीचं व्रत करतात. त्याविषयी माहीत आहे का?

दिल्ली, 18 मे: देशाच्या उत्तरेकडच्या भागांत प्रचलित हिंदू पंचांगानुसार सध्या ज्येष्ठ महिना सुरू असून, त्या महिन्यातल्या संकष्ट चतुर्थीला एकदंत संकष्ट चतुर्थी (Sankashti Chaturthi) असं म्हटलं जातं. भारतात दक्षिण भागात वेगळं हिंदू पंचांग वापरलं जातं आणि त्यानुसार सण, व्रतवैकल्य केली जातात. महाराष्ट्रात वापरल्या जाणाऱ्या हिंदू पंचांगानुसार सध्या वैशाख महिना सुरू असून, आपल्याकडे त्याच दिवशी वैशाख महिन्यातली संकष्ट चतुर्थी आली आहे. 19 मे रोजी एकदंत संकष्ट चतुर्थी (Sankashti Chaturthi 2022) साजरी केली जाणार आहे. त्या दिवसाची पूजा ही चंद्राशिवाय अपूर्ण मानली जाते. या दिवशी मनोभावे गणपतीची पूजा केली जाते. तसंच ज्या दाम्पत्याला मूलबाळ व्हावं अशी इच्छा आहे ते आज निर्जळी उपवासही करतात. या वेळी चतुर्थीच्या दिवशी सकाळपासून साध्‍ययोग तयार होत असून, तो दुपारी 2.58 मिनिटांपर्यंत चालू राहील. त्यानंतर शुभ योग सुरू होईल. पंचांगानुसार हे दोन्ही योग पूजेसाठी अतिशय शुभ मानले जातात. त्या दिवशी मनोभावे गणपतीची पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात, तसंच जीवनात यश (Success) प्राप्त होतं, असं मानलं जातं. त्यामुळे या संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. या संदर्भात वेबदुनिया डॉट कॉमने वृत्त दिलंय. एकदंत संकष्ट चतुर्थी पूजेचा शुभ मुहूर्त संकष्ट चतुर्थी 19 मे 2022, दिवस बुधवार. वैशाख कृष्ण चतुर्थीचा या वेळचा चंद्रोदयाचा मुहूर्त आहे रात्री 10.47 वाजता. यापूर्वी पूजा करावी आणि चंद्रोदयानंतर संकल्प सोडावा अशी प्रथा आहे. अनेक जण संकष्टीचा उपवास धरतात. ते चंद्रोदयानंतर उपवास सोडू शकतात. उत्तर भारतातही संकष्टीचं व्रत असतं. ते महाराष्ट्रापेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने केलं जातं याबद्दल माहीत आहे का? विक्रम संवताप्रमाणे ज्येष्ठ कृष्ण चतुर्थीला हे व्रत केलं जातं एकदंत संकष्ट चतुर्थी असं त्याला म्हणतात. एकदंत संकष्ट चतुर्थीचं व्रत बुधवार, 18 मे 2022 रोजी रात्री 11.36 मिनिटांनी एकदंत संकष्टी चतुर्थीला सुरुवात होईल. तर चतुर्थी तिथीची समाप्ती 19 मे 2022, गुरुवारी रात्री 08.23 मिनिटांनी होईल. उदयतिथीनुसार गुरुवार 19 मे 2022 रोजी एकदंत संकष्ट चतुर्थीचे व्रत करता येईल. एकदंत संकष्ट चतुर्थीच्या पूजेची (Sankashti Chaturthi Pooja) पद्धत - एकदंत संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी स्नान करावं. - स्वच्छ केलेल्या चौरंगावर श्री गणेशाच्या मूर्तीला प्रतिष्ठित करावं.

Vastu Tips: घरात सकारात्मकता, संपन्नता राहण्यासाठी 'या' दिशेला लावावं निशिगंधाचं झाड

पूजेच्या वेळी आपला चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेकडे ठेवावा. - लाल वस्त्रं परिधान करून श्री गणेशाची पूजा करावी. - श्री गणेशाच्या पूजेसाठी शेंदूर, कुंकू दुर्वा, गंध, अक्षत, अबीर, गुलाल, फुलं, जानवं, सुपारी, विड्याची पानं, फळं हे साहित्य वापरावं. तसंच लाडू किंवा तीळापासून तयार केलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. - गणपतीसमोर उदबत्ती, दिवा लावून आरती करावी. - पूजेनंतर 'ओम गणेशाय नमः' या मंत्राचा जप करून गणपतीची पूजा करावी. - संध्याकाळी व्रताची कथा वाचावी आणि चंद्रदर्शनावेळी रात्री चंद्राला (Moon) अर्घ्य अर्पण करूनच उपवास सोडावा. चतुर्थीला चंद्राचं दर्शन घेणं खूप शुभं मानलं जातं. सूर्योदयापासून सुरू होणारं हे व्रत चंद्रदर्शन आणि चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर समाप्त होतं. - आपलं व्रत पूर्ण केल्यानंतर दान करण्यास विसरू नका. - विशेष मनोकामनेसाठी गणपतीला मोदक (Modak) किंवा लाडूंचा नैवेद्य दाखवा. - चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने आपल्या आयुष्यात अडथळे आणि संकटं येत नाहीत. आपण जीवनात यशस्वी होतो आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. - श्री गणेशाच्या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीचे नशीब उजळते आणि प्रत्येक काम पूर्ण होऊ लागतं. त्यामुळे या दिवशी गणेश गायत्री मंत्र आणि श्री गणेशाच्या (Shree Ganesh Mantra) आवडत्या मंत्राचा जप करायला विसरू नका. श्री गणेशाचा मंत्र - 'ॐ वक्रतुण्डाय हुं।' - एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्।। - 'ॐ श्रीं ह्रीं क्लीं ग्लौं गं गणपतये वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा।' - महाकर्णाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्।। - 'ॐ नमो हेरम्ब मद मोहित मम् संकटान निवारय-निवारय स्वाहा।' - गजाननाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्।। श्री गणेशाच्या आवडत्या 'ॐ गं गणपते नमः' मंत्राचा सर्वात जास्त जप करावा. तसंच श्री गणेश चालिसाचं पठण करावं. गणपतीची संत रामदासांनी लिहिलेली मराठी आरती आपण सगळेच म्हणतो. सुखकर्ता दुखहर्ता.. ही आरती पाठ असेलच. आता त्याच्या जोडीला ही एक हिंदी आरतीही देत आहोत. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जाकी पार्वती पिता महादेवा ॥धृ|| एक दंत दयावंत चार भुजा धारी। माथे सिंदूर सोहे मूसे की सवारी ॥ जय... अंधन को आँख देत, कोढ़िन को काया। बांझन को पुत्र देत, निर्धन को माया ॥ जय... हार चढ़े, फूल चढ़े और चढ़े मेवा। लड्डुअन का भोग लगे संत करें सेवा ॥ जय... दीनन की लाज रखो, शंभु सुतकारी। कामना को पूर्ण करो जाऊं बलिहारी॥ जय... अशा रितीने तुम्ही संकष्ट चतुर्थीला गणपतीची पूजा करू शकता.
First published:

Tags: Religion

पुढील बातम्या