मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /वजन कमी करण्यासाठी नाश्तात अंडी का खावीत? जाणकारांनी दिलं उत्तर

वजन कमी करण्यासाठी नाश्तात अंडी का खावीत? जाणकारांनी दिलं उत्तर

अंडी - 
मुलाला रोज एक अंडे खायला दिले तर त्याच्या शरीरातील प्रथिनांचे प्रमाण चांगले राहील आणि अनेक आजार दूर राहतील. मुलाला उकडलेले अंडे अधिक फायदेशीर होईल.

अंडी - मुलाला रोज एक अंडे खायला दिले तर त्याच्या शरीरातील प्रथिनांचे प्रमाण चांगले राहील आणि अनेक आजार दूर राहतील. मुलाला उकडलेले अंडे अधिक फायदेशीर होईल.

Weight loss diet: तुम्ही अंडी (Eggs) खाऊनसुद्धा तुमचं वजन कमी करू शकता. नाश्त्यात अंडी खाणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. 2008 मध्ये लठ्ठ व्यक्तींवर एक अभ्यास करण्यात आला होता.

    नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी : आजकालच्या धावत्या जीवनशैलीचा सगळ्यात आधी परिणाम होतो तो आपल्या वजनावर. वाढलेलं वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी जिमला जाणं, घरीच व्यायाम करणं यांसारखे उपाय केले तरी वजन काही कमी होत नाही. काही जण तर यासाठी डाएट प्लॅनही (Diet Plan) बनवतात, मात्र तो प्लॅन जास्त दिवस फॉलो केला जात नाही. तुम्हाला माहीत आहे का, की तुम्ही अंडी (Eggs) खाऊनसुद्धा तुमचं वजन कमी करू शकता.

    बरेच जण नाश्त्यामध्ये हाय कार्ब पदार्थांचा (High Carb Foods) समावेश करतात. त्यामुळे लठ्ठपणासह टाइप - 2 मधुमेहाचा धोका वाढतो. तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर नाश्त्यात अंडी खाणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. 2008 मध्ये लठ्ठ व्यक्तींवर एक अभ्यास करण्यात आला होता. त्यामध्ये 25 ते 60 वयोगटातल्या व्यक्तींचा समावेश होता. या व्यक्तींचे दोन गट तयार करण्यात आले. एका गटाला रोज सकाळी नाश्त्यासाठी अंडी दिली जात होती, तर दुसऱ्या गटाला सकाळी बेगल अर्थात डोनटच्या आकाराचा ब्रेड दिला जात होता.

    दोन्ही प्रकारच्या नाश्त्यामध्ये समान प्रमाणात कॅलरीज असतात. ज्या व्यक्ती रोज सकाळी अंडी खात होत्या, त्यांच्या बॉडी मास इंडेक्समध्ये (BMI) आठ आठवड्यांनंतर 61 टक्के आणि वजनात 65 टक्के घट झाली होती.

    हे वाचा - तुम्हीही फ्रिजमधील शिळं अन्न खात असाल तर सावधान; कापावा लागला युवकाचा पाय

    आहारतज्ज्ञ काय सांगतात?

    अंड्यांमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. उच्च दर्जाचे प्रोटीन अंड्यांमध्ये आढळतात. तसंच व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी आणि फोलेट यांसारखी पोषक तत्त्वंही त्यामध्ये असतात. न्यूयॉर्कमधल्या नतालिया रिझो नावाच्या आहारतज्ज्ञ सांगतात, की 'गर्भवती महिला आणि त्यांच्या मुलांसाठी अत्यंत आवश्यक मानलं जाणारं कोलीन अंड्यांमध्ये आढळतं. अंड्याच्या पांढऱ्या आणि पिवळ्या अशा दोन्ही भागांमध्ये प्रोटीनचं प्रमाण आढळतं. अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये फॅट, व्हिटॅमिन आणि मिनरल्स यांचं प्रमाण जास्त आढळतं. एका अंड्यामध्ये 71.5 कॅलरीज, फॅट 4.8 ग्रॅम, व्हिटॅमिन ए 160 एमसीजी, कॅल्शियम 56 मिलिग्रॅम, व्हिटॅमिन डी 2 एमसीजी, रायबोफ्लेवीन 475 मिलिग्रॅम, तसंच 89 एमसीजी व्हिटॅमिन बी12, फोलेट 47 एमसीजी, व्हिटॅमिन ई 1.05 मिलिग्रॅम, नियासिन 0.075 मिलिग्रॅम, लोह 1.75 मिलिग्रॅम आढळतं.

    रिझो यांच्या मते, दररोज सकाळी नाश्त्यात अंडी खाणं हा आरोग्यदायी पर्याय असू शकतो. नाश्ता संतुलित करण्यासाठी, तुम्ही त्यात फळं, Whole Grains आणि दुग्धजन्य पदार्थदेखील समाविष्ट करू शकता.

    हे वाचा - तुमच्याही बॉडीवर येताहेत का स्ट्रेच मार्क्स; हे घरगुती उपाय आहेत त्यावर फायदेशीर

    वजन कमी करण्यासाठी अनेकांच्या मनात पहिली गोष्ट येते ती म्हणजे डाएटिंग. वजन कमी करण्यासाठी अनेक जण वेगवेगळं डाएट फॉलो करतात. अशा परिस्थितीत ज्या व्यक्ती डाएटिंग करतात त्यांना आपल्या दिवसाची सुरुवात कोणत्या आरोग्यदायी गोष्टीने करावी किंवा सकाळी नाश्त्यात काय खावं, या समस्येचा सामना करावा लागतो. तुम्हालाही लवकर वजन कमी करायचं असेल, तर तुम्ही नाश्त्यात अंडी खाऊ शकता. वजन कमी करण्यासाठी अंडी खूप फायदेशीर मानली जातात. अंडी खाल्ल्याने पचनक्रिया, तसंच फॅट विरघळण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होते. त्यामुळे इतर काही जंकफूड खाण्यापेक्षा अंडी खाणं केव्हाही चांगलं.

    First published:

    Tags: Health Tips, Weight loss, Weight loss tips