Home /News /lifestyle /

OMG! चक्क डोक्यावर ठेवली 735 अंडी; VIDEO पाहून तोंडात घालाल बोटं

OMG! चक्क डोक्यावर ठेवली 735 अंडी; VIDEO पाहून तोंडात घालाल बोटं

डोक्यावर सर्वाधिक अंडी बॅलेन्स करण्याचा विश्वविक्रम या व्यक्तीने केला आहे.

  वॉशिंग्टन, 13 ऑक्टोबर : एका अंड्यावर दुसरं अंड ठेवून ते साधं हातावर बॅलेन्स (Eggs balancing) करणंही आपल्यासाठी कठीण आहे. विचार करा अशी अंडी डोक्यावर बॅलेन्स (Eggs balancing on head) करायची असतील तर... हे अशक्यच आहे असं आपण म्हणू. पण तुम्हा आम्हाला अशक्य वाटणारी ही गोष्ट एका व्यक्तीने मात्र शक्य करून दाखवली आहे. त्याने दोन-तीन नव्हे, दहा नव्हे, शंभर नव्हे तर तब्बल सातशेहून अधिक अंडी डोक्यावर बॅलेन्स करून दाखवली आहेत (Eggs balancing on head video). डोक्यावर सर्वाधिक अंडी बॅलेन्स करण्याचा एका व्यक्तीने विश्वविक्रम केला आहे. गिनीज बुकमध्ये या व्यक्तीची नोंद झाली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा (Guinness World Records) हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) होतो आहे. ग्रेगरी डा सिल्वा (Gregory Da Silva) नावाच्या या व्यक्तीने हा हटके विक्रम केला आहे. के ग्रेगरी हा पश्चिम आफ्रिकेतील आहे. त्याने आपल्या डोक्यावर चक्क 735 अंडी ठेवून रेकॉर्ड केला आहे.
  गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.  ग्रेगरी डा सिल्वाने एका टोपीवर सर्वात जास्त 735 अंडी ठेवण्याचा रेकॉर्ड केल्याचं या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे. पश्चिम आफ्रिकेच्या बेनिनमध्ये राहणाऱ्या ग्रेगरीने चीनमध्ये सीसीटीव्ही चॅनेलवर जीडब्ल्यूआर स्पेशल शोमध्ये आपल्या हॅटवर अंडी ठेवून तीन दिवस घालवले. हे वाचा - OMG! अंड्यावर अंडी; तरुणाने ही कमाल केली तरी कशी पाहा VIDEO ग्रेगरी डा सिल्वाला एगमॅन म्हणूनही ओळखलं जातं. आपलं हे बॅलेन्सिंग एग्सचं टॅलेंट त्यांनी जगाला दाखवलं आहे. काही देशांमध्ये जाऊन किंवा काही टीव्ही शोमध्ये त्यांनी हे आपलं टॅलेंट दाखवून दिलं. याआधी एका तरुणानेही अंड्याचा एक वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. ज्यात त्याने एकावर एक अंडी रचली होती. एखाद्या ठोकळ्याप्रमाणे अंड्यांवर अंडी रचणं म्हणजे अशक्यच आहे. पण येमेनमधील 20 वर्षीय तरुणाने चक्क अंड्याचा टॉवर (egg tower) तयार केला होता.
  मोहम्मद मुकबेलने (Mohammed muqbel) एकावर एक अशी तीन अंडी उभी केलीत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या डोळ्यावरही विश्वास बसणार नाही. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही (Guinness World Records) largest stack of eggs म्हणून याची नोंद झाली आहे. तुम्ही याआधी असं कधी पाहिलं आहे का? अशी कॅप्शन गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करताना दिली आहे. हे वाचा - पार्टीबहाद्दर डॉगी! प्रत्येक पार्टीत झोडतो स्वतःचं फेव्हरेट Drink मुकबेलला अंड्यांचा सेंटर ऑफ मास्क समजतं आणि त्यामुळेच तो अंड्यांची अशी बिल्डिंग तयार करू शकतो. जे सर्वसामान्य व्यक्तीसाठी अशक्य आहे. यासाठी खूप संयम आणि सरावाची गरज आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Record, Viral, Viral videos, World record

  पुढील बातम्या