मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /केस काढण्यासाठी ट्रीमरचा वापर करता? या गोष्टी तुम्हाला माहिती हव्याच

केस काढण्यासाठी ट्रीमरचा वापर करता? या गोष्टी तुम्हाला माहिती हव्याच

नको असलेले केस काढण्याचे अनेक मार्ग असले तरी लोकांना रेझर किंवा ट्रीमर वापरणे ही सर्वात सोपी, स्वस्त आणि सुरक्षित पद्धत वाटते.

नको असलेले केस काढण्याचे अनेक मार्ग असले तरी लोकांना रेझर किंवा ट्रीमर वापरणे ही सर्वात सोपी, स्वस्त आणि सुरक्षित पद्धत वाटते.

नको असलेले केस काढण्याचे अनेक मार्ग असले तरी लोकांना रेझर किंवा ट्रीमर वापरणे ही सर्वात सोपी, स्वस्त आणि सुरक्षित पद्धत वाटते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 5 फेब्रुवारी : स्त्री असो वा पुरुष, कोणालाच आपल्या शरीरावर नको असलेले केस दिसावेत असे वाटत नाही. त्यामुळे केस काढण्यासाठी बहुतेक लोकांना शेव्हिंगची मदत घेणे आवडते. नको असलेले केस काढण्याचे अनेक मार्ग असले तरी लोकांना रेझर किंवा ट्रीमर वापरणे ही सर्वात सोपी, स्वस्त आणि सुरक्षित पद्धत वाटते. पण काही लोक ते घाईघाईने शेव्हिंग करतात, ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

नको असलेले केस काढण्यासाठी तुम्हालाही शेव्हिंगची मदत घ्यायची असेल, तर जाणून घ्या शेव्हिंगमुळे आणि रेझर किंवा ट्रीमरच्या वापरामुळे आपल्याला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते आणि तसे करणे का टाळावे.

संपूर्ण पोषण हवंय? मग चुकूनही सालींशिवाय खाऊ नका ही 15 फळं

ट्रिमरचा वापर त्वचेसाठी हानिकारक असू शकतो

अंगावरील केस काढण्यासाठी मुली व्हॅक्सिंगच्या त्रासापेक्षा रेझर किंवा ट्रीमर वापरणे पसंत करतात. बर्‍याचदा ट्रिमर वापरल्याने त्वचेवर पुरळ उठते. त्यामुळे कायमी लक्षात ठेवा की ट्रिमरने केस स्वच्छ करताना जेल लावा आणि त्वचेला स्ट्रेच करा. यामुळे तुमच्या त्वचेवर जळजळ होणार नाही आणि त्वचा मऊ होते. म्हणूनच कधीही ड्राय शेव्हिंग करणे टाळा.

खाज सुटणे आणि जळजळ होणे

शेव्हिंग क्रीम, साबण किंवा जेल न लावता ड्राय शेव्हिंग केल्याने तुम्हाला खाज सुटण्याची आणि जळण्याची समस्या होऊ शकते. या समस्येपासून त्वचेला वाचवण्यासाठी ड्राय शेव्हिंग टाळावे. एवढेच नाही तर शेव्हिंग केल्यानंतरही त्वचेवर मॉइश्चरायझर किंवा कोणत्याही प्रकारचे तेल वापरणे फार महत्वाचे आहे. तुमच्याकडे शेव्हिंग क्रीम किंवा जेल नसल्यास तुम्ही शेव्हिंग करण्यापूर्वी तुमचा आंघोळीचा साबण किंवा मॉइश्चरायझर देखील वापरू शकता.

त्वचेमध्ये कोरडेपणा आणि लालसरपणा येऊ शकतो

शेव्हिंग करताना त्वचेवर कोणतेही क्रीम, जेल किंवा साबण न वापरल्यास तुमच्या त्वचेवर खूप कोरडेपणा येऊ शकतो. त्यामुळे तुमच्या त्वचेवर लालसरपणा येऊ शकतो. शेव्हिंग करण्यापूर्वी त्वचेवर कोणत्याही ओलसर पदार्थाचा वापर स्नेहक सारखे काम करतो, ज्यामुळे शेव्हिंग करताना आणि नंतर त्वचेत कोरडेपणा येत नाही आणि त्वचेवर लालसरपणा येत नाही.

फ्रीजमध्ये अन्नपदार्थ ठेवणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

त्वचेवर ओरखडे येऊ शकतात आणि रक्तही येऊ शकते

ड्राय शेव्हिंग करताना तुमच्या त्वचेवर ओरखडे येऊ शकतात, ज्यामुळे रक्तस्रावाची समस्या देखील होऊ शकते. त्वचेवर कोणत्याही प्रकारचे मॉईशचरायझर न वापरल्यामुळे रेझर थेट त्वचेच्या संपर्कात येतो आणि त्वचेवर अधिक लवकर घासले जाते. ज्यामुळे त्वचा सोलल्यावर रक्तस्त्राव होण्याची समस्या उद्भवू शकते.

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle, Skin care