Home /News /lifestyle /

Digital युगातील लहानग्यांचा जगाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन कसा? संशोधनातून समोर आली महत्त्वाची गोष्ट

Digital युगातील लहानग्यांचा जगाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन कसा? संशोधनातून समोर आली महत्त्वाची गोष्ट

आजची पिढी लहानपणापासूनच विविध डिजिटल उपकरणं (Digital Instruments)हाताळत असते. या डिजिटल युगातील मुलांचा जगाकडं बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे (effect of digital insturments on childrens )याचा अभ्यास नुकताच करण्यात आला.

नवी दिल्ली ०४ मार्च : आजची पिढी ही टेक्नोसॅव्ही असल्याचं म्हटलं जातं. कारण अगदी बालपणापासून ही मुलं मोबाईल (Mobile), टॅब्लेट (Tablet), लॅपटॉप (Laptop) अशी विविध डिजिटल उपकरणं (Digital Instruments) हाताळतात. त्यामुळे ही अत्याधुनिक साधनं कशी प्रभावीपणे वापरायची याचं ज्ञान त्यांना लहान वयातच अवगत झालेलं असतं. अशा या डिजिटल युगातील मुलांचा जगाकडं बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे याचा अभ्यास नुकताच करण्यात आला. त्यात काही आश्चर्यकारक निष्कर्ष नोंदवण्यात आले आहेत. या संशोधनात असं आढळलं आहे की, शाळेत जाण्याच्या आधीपासून जी मुलं टॅब्लेट किंवा मोबाईल वापरतात ती मोठ्या गोष्टींकडे लक्ष केंद्रीत न करता त्यातील बारकाव्यांकडे अधिक पाहातात. परंतु सर्वसामान्यपणे लोक आधी संपूर्ण किंवा मोठ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतात मग त्यातील बारकाव्यांकडे बघतात. मुलांमध्येही असाच कल आतापर्यंत तरी दिसून येत होता. आता मात्र मोबाइल वापरत असलेल्या मुलांच्या या कौशल्यांमध्ये फरक झाल्याचं आढळून आलं आहे. ही मुलं तपशीलांवर अधिक लक्ष (Focus on Details) केंद्रित करतात आणि मोठ्या चित्राकडं कमी पाहतात, असं या नवीन अभ्यासात दिसून आलं आहे. कॉम्प्युटर्स इन ह्युमन बिहेव्हियर (Computers in Human Behavior Journal) या जर्नलमध्ये हा संशोधन अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या संशोधनाच्या लेखिका हंगेरीतील बुडापेस्ट इथल्या इओटवॉस लॉरंड युनिव्हर्सिटीमधील (ELTE) व्हेरोनिका कोनोक यांनी म्हटलं आहे की, ‘संपूर्ण जागतिक चित्रावर लक्ष केंद्रित केल्यामुळं जग म्हणजे केवळ परस्पर संबंध नसलेल्या ठिपक्यांचा समूह असं चित्र न राहता, जगाला अर्थपूर्ण, सुसंगत पद्धतीनं समजून घेण्यास मदत होते.’ केवळ तपशिलांकडे लक्ष केंद्रित करण्याचा आमचा हेतू असला तरीही आपोआपच आम्ही जागतिक पॅटर्नवर विचार केला, असंही त्यांनी सांगितलं. संशोधकांनी या अभ्यासासाठी मोबाईल वापरणारे किंवा न वापरणारे असा कोणताही निकष न लावता सरसकट प्री-स्कूलर्स मुलांचा समावेश केला. टॅब्लेटवरील छोट्या गेमच्या आधारे अल्पावधीत तपशिलांकडे लक्ष केंद्रित केलं का याचं निरीक्षण करण्यात आलं. ‘विशेष म्हणजे, सहा मिनिटं सलग बलून-शूटिंग गेम (Balloon Shooting Game) खेळणं हे तपशिलावर लक्ष केंद्रित शैली विकसित करण्यासाठी पुरेसं होतं. याउलट, डिजिटल गेम नसलेला व्हॅक-ए-मोल (Whack a Mole) हा खेळ खेळणाऱ्या मुलांनी ठराविक साचेबद्ध दृष्टीकोन दर्शवला, असं ‘ईएलटीई’मधील अ‍ॅडम मिकलोसी यांनी सांगितलं. या अभ्यासातील निरीक्षणावरून हे लक्षात आलं की, वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव मुलांसाठी महत्त्वाचे ठरतात, कारण या वयात मेंदू प्लास्टिकसारखा असतो. त्यामुळं अती लहान वयात मिळणाऱ्या डिजिटल उपकरण हाताळण्याच्या सवयीचा दीर्घकालीन प्रभाव पडतो. मोबाइल वापरणाऱ्या मुलांमधील तपशिलावर लक्ष केंद्रित करण्याची पध्दत वाईट नाही, मात्र ती नक्कीच वेगळी आहे आणि आपण त्याकडं दुर्लक्ष करू शकत नाही, असं मत या संशोधनाच्या सहलेखिका आणि ‘ईएलटीई’मधील क्रिस्तिना लिस्काइ-पेरेस यांनी व्यक्त केलं. या मुलांसाठी शैक्षणिक साहित्य नवीन पद्धतीनं सादर करण्याची आवश्यकता आहे. संशोधकांच्या मतानुसार, जे लोक तपशीलांकडे लक्ष देतात ते विश्लेषणात्मक विचारात अधिक कुशल असतात,मात्र ते सर्जनशीलता किंवा सामाजिक कौशल्यांमध्ये कमी असतात. या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही तर नवीन पिढीतील मुलांमध्ये अधिक विज्ञानवादी विचारवंत निर्माण होतील. ते कलात्मकता किंवा सामाजिक कौशल्यात कमी असतील आणि यामुळं आपण जगतो त्या जगात कदाचित बदलही होईल.
First published:

Tags: Digital services, Lifestyle, Mobile, Tech news, Technology, Wellness

पुढील बातम्या