मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Diet Tips: पिझ्झासह 'हे' पदार्थ खाल्ल्यानं माणसाचं आयुष्य होतं इतक्या मिनिटांनी कमी; संशोधन अहवालात मोठा खुलासा

Diet Tips: पिझ्झासह 'हे' पदार्थ खाल्ल्यानं माणसाचं आयुष्य होतं इतक्या मिनिटांनी कमी; संशोधन अहवालात मोठा खुलासा

फास्ट फूडमुळे अनेक गंभीर आजार होत असल्याचं दिसत आहे. अनहेल्दी पदार्थ खाल्ल्यानं माणसाचं आयुष्य कमी होत आहे, असा दावा अभ्यासकांनी केला आहे.

फास्ट फूडमुळे अनेक गंभीर आजार होत असल्याचं दिसत आहे. अनहेल्दी पदार्थ खाल्ल्यानं माणसाचं आयुष्य कमी होत आहे, असा दावा अभ्यासकांनी केला आहे.

फास्ट फूडमुळे अनेक गंभीर आजार होत असल्याचं दिसत आहे. अनहेल्दी पदार्थ खाल्ल्यानं माणसाचं आयुष्य कमी होत आहे, असा दावा अभ्यासकांनी केला आहे.

मुंबई, 12 ऑगस्ट:  आहार आणि आरोग्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. योग्य आणि पोषक आहारामुळे आरोग्य चांगलं राहतं. परंतु, गेल्या काही वर्षांत आहाराचा पॅटर्न बदलला आहे. पिझ्झा, बर्गर, चिप्ससारखे पदार्थ खाण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. यामुळे साहजिकच आरोग्यविषयक तक्रारी वाढू लागल्या आहेत. फास्ट फूडमुळे अनेक गंभीर आजार होत असल्याचं दिसत आहे. तसंच या पदार्थांमुळे माणसाच्या एकूण आयुर्मानावर परिणाम झाल्याचंदेखील एका संशोधनात दिसून आलं आहे. अनहेल्दी पदार्थ खाल्ल्यानं माणसाचं आयुष्य कमी होत आहे, असा दावा अभ्यासकांनी केला आहे. आज तकने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. आपल्याला दीर्घायुष्य लाभावं असं प्रत्येकाला वाटतं; मात्र त्यासाठी पोषक आणि योग्य आहार गरजेचा असतो. ज्या व्यक्ती अनहेल्दी पदार्थ किंवा फास्ट फूड सेवन करतात त्यांच्या आयुर्मानावर परिणाम होऊ शकतो, असं संशोधकांचं मत आहे. 'वर्ल्ड लाइफ एक्स्पेक्टन्सी'ने  दिलेल्या माहितीनुसार, भारतात पुरुषांचं सरासरी आयुर्मान 69.5 वर्षं, तर महिलांचं सरासरी आयुर्मान 72.2 वर्षं आहे. हृदयविकार, फुफ्फुसाचे आजार, स्ट्रोक, डायबेटीस यांसह सुमारे 50 आजार अकाली मृत्यूसाठी कारणीभूत ठरतात. हेही वाचा - Healthy kids : ऋतु कोणताही असो, निरोगी आरोग्यासाठी मुलांच्या आहारात या गोष्टी हव्याच द टेलिग्राफच्या वृत्तानुसार, मिशिगन विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी काही अन्नपदार्थ आणि त्यांचा आरोग्यावर होणारा परिणाम याविषयी एक संशोधन केलं. मानवी आरोग्य आणि पर्यावरणावर होणारा अन्नाचा प्रभाव पाहणं हा संशोधनाचा प्रमुख उद्देश होता. नेचर फूड या नियतकालिकात प्रकाशित झालेला हा अभ्यास व्यक्तीच्या जीवनाच्या चांगल्या गुणवत्तेवर आधारित होता. संशोधकांनी सुमारे 6 हजार वेगवेगळ्या गोष्टींवर (नाश्ता, लंच आणि ड्रिंक) संशोधन केलं. एखादी व्यक्ती प्रक्रिया केलेलं मांस खात असेल तर त्याच्या आयुष्यात रोज 48 अतिरिक्त मिनिटं वाढू शकतात, असं त्यांना आढळून आलं. याचाच अर्थ काही पदार्थांच्या सेवनानं तुमचं आयुष्य काही मिनिटांनी वाढू शकतं, तर काही पदार्थांच्या सेवनानं तुमचं आयुष्य काही मिनिटांनी कमी होऊ शकतं. एखाद्या व्यक्तीनं नट्स सेवन केले तर त्याचं आयुष्य 26 मिनिटांनी वाढू शकतं. परंतु, कोणी हॉटडॉग सेवन केलं तर त्याचं आयुष्य 36 मिनिटांनी कमी होतं. याशिवाय पीनट बटर आणि जॅम सँडविचमुळे कोणाचंही आयुष्य अर्ध्या तासानं वाढू शकतं. साल्मन फिशमध्ये भरपूर पोषणमूल्यं असतात. त्यामुळे तुम्ही एकदा या माशांचं सेवन केलं तर तुमचं आयुष्य 16 मिनिटांनी वाढू शकतं, असं संशोधकांना दिसून आलं. हेही वाचा - Sweet For Rakshabandhan : अवघ्या 15 मिनिटात तयार होते ही मिठाई, रक्षाबंधनाला नक्की ट्राय करा द टेलिग्राफच्या माहितीनुसार, बेक्ड साल्मन मासे खाल्ल्यास आयुष्य 13.5 मिनिटांनी वाढतं. केळी खाल्ल्यानं 13.5 मिनिटांनी, टोमॅटो खाल्ल्याने 3.8 मिनिटांनी, तर अ‍ॅव्होकॅडोच्या सेवनानं 1.5 मिनिटाने आयुष्य वाढतं. पिझ्झा खाल्ल्यानं आयुष्य 7.8 मिनिटांनी कमी होतं. सॉफ्ट ड्रिंकमुळे 12.4 मिनिटं, चीज बर्गरमुळे 8.8 मिनिटं तर प्रोसेस्ड मीटमुळं (बेकॉन) आयुष्य 26 मिनिटांनी कमी होतं, असं संशोधनात दिसून आलं. संशोधनातून समोर आलेले निष्कर्ष नागरिकांचं आरोग्य आणि पर्यावरण सुधारण्यास मदत करतील. मानवी आरोग्य आणि पर्यावरण सुधारण्यासाठी नागरिकांनी आपल्या आहारात बदल केला पाहिजे,` असं संशोधकात पथकात सहभागी प्राध्यापक ओलिव्हियर जोलियट यांनी सांगितलं.
First published:

Tags: Health Tips, Lifestyle

पुढील बातम्या