तुम्हीदेखील भाज्यांच्या साली काढता का? या 5 भाज्या सालीसकट खाणं आरोग्यासाठी उत्तम

तुम्हीदेखील भाज्यांच्या साली काढता का? या 5 भाज्या सालीसकट खाणं आरोग्यासाठी उत्तम

भाज्यांच्या (vegetable) सालींमध्येही बरेच पोषक घटक असतात.

  • Last Updated: Jul 17, 2020 03:23 PM IST
  • Share this:

भाज्या खाल्ल्याने उत्तम पोषण मिळते. भाज्या खाल्ल्याने शरीराला चांगले पोषक द्रव्य मिळतात. पण काही भाज्या आपण त्यांच्या साली काढून खात असतो, ज्यामुळे त्यातील पोषक द्रव्यच नष्ट होतात. इथे अशा पाच भाज्यांविषयी सांगत आहोत ज्यांचे सेवन सालीसकट करायला हवे, जेणेकरून आपल्याला योग्य पोषण मिळेल

बीट रूट : myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांचे सांगणे आहे की बिटामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. बीट कच्चा खाऊ शकता, त्याचं सूप, ज्युस बनवून तुम्ही पिऊ शकता किंवा कोशिंबिरीत वापरू शकता. बिटामध्ये तंतुमय पदार्थ तर आहेतच सोबत जीवनसत्व बी9, पोटॅशियम, लोह आणि जीवनसत्व सी भरपूर प्रमाणात असतात. हे रक्तप्रवाह आणि रक्तदाब सुधारण्यास मदत करतात. बिटाची सालही खूप आरोग्यदायी आहे. त्यामध्ये पचन सुधारणारे द्रव्य असतात. म्हणून त्याची साल काढायची गरज नाही. बीट स्वच्छ धुवून घ्यावा.

गाजर : गाजराच्या वेगवेगळ्या थरात बीटा-केरोटीन, तंतुमय पदार्थ, जीवनसत्व के, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंटसारखे पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. गाजर खाणे वजन कमी करण्यास मदत करते. ते कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहे. पण जर त्याची साल काढून टाकली तर मात्र आपण त्यातले तंतुमय पौष्टिक तत्व घालवून टाकतो. म्हणून पूर्ण साल काढण्याऐवजी वरवर थोडं चमच्याने खरवडून घ्या आणि मग खा.

काकडी : काकडीच्या बिया आणि साल अतिशय पौष्टिक आहे. काकडीच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट, अनेक रोगांशी लढण्यासाठी एंजाइम, असतात. म्हणून काकडीतील सर्व पोषक गुणांचा फायदा हवा असेल तर साल न काढता ती फक्त धुवून खावी. काही अभ्यासात आढळले आहे की काकडी मधुमेह रोखण्यास मदत करते. डॉक्टर नेहमीच काकडी खायला सांगतात कारण ती शरीरातील साखर नियंत्रणात ठेवायला मदत करते.

बटाटा : लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच बटाटा खायला आवडतो. जगात सगळ्यात जास्त आवडीने खाल्ली जाणारी भाजी कोणती असेल तर ती बटाट्याची भाजी आहे. बरेचसे लोक त्याच्या साली काढून बटाटा खातात. बटाट्याच्या सालीत जीवनसत्व, तंतुमय पदार्थ, क्षार भरपूर प्रमाणात असतात. बद्धकोष्ठता असणाऱ्यांनी सालीसह बटाटा खायला हवा.

पडवळ : myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांच्या मतानुसार पडवळ हे जीवनसत्व ए, बी1, बी2 यांनी समृद्ध असलेली भाजी आहे. यात अत्यंत कमी कॅलरी असतात आणि ते कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते. पडवळाच्या सालीत मेग्निशिय, पोटेशियम, फॉसस्फरस भरपूर असते.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - सकस आहार

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: July 17, 2020, 3:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading