मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तेलकट खाणं टाळताय; पण तेलापेक्षाही साखर आहे जास्त घातक!

तेलकट खाणं टाळताय; पण तेलापेक्षाही साखर आहे जास्त घातक!

आज बरेच डॉक्टर, शास्त्रज्ञ आणि वैद्यकीय आहारात चरबी समाविष्ट करण्याबद्दल आणि कार्बोहायड्रेट्स वगळण्याबद्दल बोलतात. तसंच आता वैद्यकीय शास्त्र हे मानू लागलंय की, साखर ही आरोग्यासाठी सर्वात घातक आहे.

आज बरेच डॉक्टर, शास्त्रज्ञ आणि वैद्यकीय आहारात चरबी समाविष्ट करण्याबद्दल आणि कार्बोहायड्रेट्स वगळण्याबद्दल बोलतात. तसंच आता वैद्यकीय शास्त्र हे मानू लागलंय की, साखर ही आरोग्यासाठी सर्वात घातक आहे.

आज बरेच डॉक्टर, शास्त्रज्ञ आणि वैद्यकीय आहारात चरबी समाविष्ट करण्याबद्दल आणि कार्बोहायड्रेट्स वगळण्याबद्दल बोलतात. तसंच आता वैद्यकीय शास्त्र हे मानू लागलंय की, साखर ही आरोग्यासाठी सर्वात घातक आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 05 नोव्हेंबर : सकस आहारात स्निग्ध पदार्थांचं प्रमाण किती असावं यावर अनेकांचं मत वेगवेगळं असू शकतं. अनेकजण तेल, तूप, लोणी इत्यादी कोणत्याही प्रकारचे स्निग्ध पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक आहेत, असंही सांगतील. मात्र, कर्बोदकं, साखर (Sugar) यांचा कोणी फारसा विचार करत नाही. शरीरातील चरबी वाढल्यामुळं हृदयविकाराचा झटका (Heart attack) आणि यकृताच्या आजारांचा धोका वाढतो.

अनेक दशकांपासून वैद्यकीय संघटना, अन्न नियंत्रण अधिकारी स्निग्ध पदार्थ आरोग्यसाठी चांगले नसल्याचं सांगत आहेत. मात्र, याविषयी जगभरातील वैद्यकीय शास्त्राचं मत आता बदलत आहे. आज बरेच डॉक्टर, शास्त्रज्ञ आणि वैद्यकीय आहारात चरबी समाविष्ट करण्याबद्दल आणि कार्बोहायड्रेट्स वगळण्याबद्दल बोलतात. तसंच आता वैद्यकीय शास्त्र हे मानू लागलंय की, साखर ही आरोग्यासाठी सर्वात घातक (sugar is more dangerous than oily food) आहे.

अमेरिकन डॉक्टर आणि डॉ. एरिक बर्ग गेल्या 30 वर्षांपासून केटो फूडवर संशोधन करत आहेत आणि त्याचा प्रचार करत आहेत. त्यांनी साखर निकोटीन आणि कॅफीन सारखीच व्यसन लावणारी असल्याचं म्हटलंय. हे आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे.

हे वाचा - Electric Vehicle मालकांचं टेन्शन कमी होणार; BPCL 7000 पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन उभारणार

कोणत्याही औषधांच्या मदतीशिवाय अमेरिकेत टाईप 2 मधुमेहावर उपचार करणाऱ्या अमेरिकेतील पहिल्या क्लिनिकच्या संचालिका डॉ. सारा हॉलबर्ग यांचंही हेच मत आहे. डॉ. सारा सांगतात की, इतक्या वर्षांपासून आपल्याला सांगितलं जातंय की, चरबी शरीरासाठी घातक आहे. तेल कमी खावं. नैसर्गिक स्निग्ध पदार्थांबाबत डॉक्टरांचंही मत फारसं चांगलं नव्हतं. अशी एक कल्पना आहे, जी अनेक वर्षांपासून आपल्याला अशीच सांगितली जात आहे आणि आज काय घडतंय ते पहा. आज अमेरिकेची 70 टक्के लोकसंख्या लठ्ठपणानं ग्रस्त आहे आणि 33 टक्के लोक मधुमेही आहेत.

यामागचं कारण दुसरं काही नसून ती चुकीची माहिती आणि आपली चुकीची जीवनशैली आहे, जी योग्य आणि वैज्ञानिक असल्याचं सांगून आपल्यावर वर्षानुवर्षे लादली जात आहे.

हे वाचा - Career Tips: कोणतीही जॉब ऑफर स्वीकारण्याआधी ‘या’ गोष्टी एकदा नक्की बघा; भविष्यात व्हाल यशस्वी

डॉ. एरिक बर्ग म्हणतात की, शरीरासाठी आवश्यक असणारे घटक दोनच प्रकारचे आहेत - प्रथिनं आणि चरबी. याशिवाय, आवश्यक जीवनसत्त्वं, खनिजं आणि पोषक तत्त्वं. परंतु, आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी आवश्यक असलेले कार्बोहायड्रेट असं कोणतंही नसतं. जर एखाद्या व्यक्तीनं आयुष्यात कधीही कार्बोहायड्रेट्सचं सेवन केले नाही तर, त्याच्या शरीरात कोणत्याही आवश्यक घटकाची कमतरता भासणार नाही.

आपण थोडं खोलवर जाऊन समजून घेतलं पाहिजे की, आपण जी चरबी आपल्यासाठी वाईट मानतो ती केवळ फायदेशीरच नाही तर, खूप महत्त्वाची आहे आणि जी साखर आपण आपल्या जीवनाचा एक भाग बनवली आहे, ती खरोखर धोकादायक आहे. त्यामुळं जीवनातून आजपासून कार्बोहायड्रेट आणि साखर या दोन्हींचा निरोप घ्या.

First published:

Tags: Health Tips, Sugar