रेड मीट खाल्याने महिलांमध्ये वाढतो ब्रेस्ट कॅन्सरचा धोका!

रेड मीट खाल्याने महिलांमध्ये वाढतो ब्रेस्ट कॅन्सरचा धोका!

नॅशनल कॅन्सर इन्स्टीट्यूटकडून करण्यात आलेल्या संशोधनात 42 हजार महिलांच्या आहारावर आठ वर्ष संशोधन करण्यात आलं.

  • Share this:

अनेक संशोधन आणि अभ्यासातून हे समोर आलं आहे की, बीफ, पोर्क, प्रोसेस्ड मीट किंवा लँब मीट खाणं टाळलं पाहिजे. कारण यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. याऐवजी चिकन खाऊन आरोग्य सुदृढ ठेवता येतं. नुकतंच नॅशनल कॅन्सर इन्स्टीट्यूटकडून करण्यात आलेल्या संशोधनात 42 हजार महिलांच्या आहारावर आठ वर्ष संशोधन करण्यात आलं. या संशोधनात जे समोर आलं ते फारच धक्कादाय आहे.ज्या महिलांनी जास्त मटण खालं, त्यांच्यात स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका चौपट वाढतो. तर ज्या महिलांनी चिकन, टर्की (एक प्रकारची पक्षी), बदक यांचं मांस खातात त्यांच्यात स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका 28 टक्क्यांनी कमी होतो.

मटण खाल्याने टाइप- 2 मधुमेह होण्याचा धोकाही वाढतो. संशोधनात हे सिद्ध झालं आहे की, मटणात मोठ्या प्रमाणात फॅट असतात. याशिवाय सॅच्युरेटड फॅटचं प्रमाणही जास्त असतं. हे सॅच्युरेटेड फॅट शरीरातलं कोलेस्ट्रॉल वाढवण्याचं काम करतात. यामुळे लठ्ठपणा वाढतो. हा लठ्ठपणा आणि कोलेस्ट्रॉल पुरुषांमध्ये टाइप- 2 डायबेटिसचा आजार निर्माण करतं.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

...म्हणून बुद्धाने शिष्याला खराब झऱ्यातून पाणी आणायला सांगितलं, ही गोष्ट वाचाच!

डायबेटिस नियंत्रणात राखण्यासाठी करा ही पाच योगासनं!

तुम्हाला विसरण्याची सवय आहे का, मग हे पाच पदार्थ खा!

VIDEO: आगमनाआधीच बाप्पा पाण्यात, मनाला चटका लावणारं गणपती कारखान्याचं दृष्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 11, 2019 02:42 PM IST

ताज्या बातम्या