बटाटे आणि भात पुन्हा गरम करून खाणे हानिकारक, का ते जाणून घ्या

बटाटे आणि भात पुन्हा गरम करून खाणे हानिकारक, का ते जाणून घ्या

मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जसे अ‍ॅल्युमिनियम फॉईल आणि प्लास्टिकमध्ये ठेवलेले अन्न खाऊ नये, त्याचप्रमाणे अशी काही खाद्यपदार्थही मायक्रोवेव्हमध्ये गरम करून खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. असे का होते ते जाणून घेऊया.

  • Last Updated: Dec 18, 2020 08:40 AM IST
  • Share this:

आरोग्याची काळजी घेणाऱ्या लोकांना गरम अन्न खाण्याची आवड असते. आधुनिक जीवनशैलीत मायक्रोवेव्हमध्ये (Microwave) अन्न गरम करण्याचा कल वाढला आहे. परंतु संशोधनातून असे दिसून आले आहे की, मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जसे अ‍ॅल्युमिनियम फॉईल आणि प्लास्टिकमध्ये ठेवलेले अन्न खाऊ नये, त्याचप्रमाणे अशी काही खाद्यपदार्थही मायक्रोवेव्हमध्ये गरम करून खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. असे का होते ते जाणून घेऊया.

मायक्रोवेव्हमध्ये भात (Rice) कधीही गरम करू नये

myupchar.com च्या मते मायक्रोवेव्हमध्ये गरम करून भात खाण्याने अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता वाढू शकते. असे केल्याने बॅसिलस सेरियस नावाचे जिवाणू भातामध्ये निर्माण होऊ लागतात. हे जीवाणू गरम झाल्यामुळे नष्ट होतात, परंतु यामुळे बीजाणू तयार होतात, जे विषारी असू शकतात. वैज्ञानिकांना असा विश्वास आहे की, एकदा भात मायक्रोवेव्हमध्ये गरम करून सामान्य तपमानावर बाहेर ठेवला गेला, तर त्यात उपस्थित बीजाणू अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढवू शकतात. म्हणून, मायक्रोवेव्हमध्ये भात गरम करून खाऊ नये. त्याऐवजी भात शिजवून त्वरित खाणे हा एक चांगला पर्याय आहे. तसेच, मातीच्या भांड्यात शिजवलेला भात खाणे अधिक फायदेशीर आहे, कारण त्याने शरीरात जास्त कर्बोदक जात नाही.

शिजलेले बटाटे (Cooked Potato) पुन्हा गरम करू नये

शिजलेला बटाटा पुन्हा गरम केल्यावर त्यातील जीवाणू गरम झाल्यावरही मरत नाहीत. याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. बटाट्यात आढळणारे जीवनसत्व बी 6, पोटॅशियम आणि जीवनसत्व सी शरीरासाठी फायदेशीर असतात, परंतु बटाटा गरम केल्यामुळे त्यातील हे आवश्यक घटक नष्ट होतात. याशिवाय बटाटा वारंवार गरम केल्याने हे बोटुलिनम तयार करू शकते, जे जीवाणूंना प्रोत्साहन देते. अ‍ॅल्युमिनियम फॉईलमध्ये बटाटे गरम करून खाणे अधिक हानिकारक असते. myupchar.com च्या नुसार भातासारखेच बटाटे देखील मायक्रोवेव्ह करु नये.

कोंबडीचे मटन (Chicken) पुन्हा गरम केल्यास हानिकारक

शिजवलेल्या कोंबडीचे मटण पुन्हा-पुन्हा गरम करून खाल्ल्यास त्यातील पोषक द्रव्य निघून जातात. याशिवाय पोटाशी संबंधित समस्या सुरू होते. याशिवाय त्यामुळे गॅस, पित्त, बद्धकोष्ठता इत्यादी होऊ शकतात.

हिरव्या पालेभाज्या (Green Vegetables) पुन्हा गरम करू नये

हिरव्या पालेभाज्यांना पुन्हा गरम केल्यावर त्यातील नायट्रेट घटक नष्ट होतो. हिरव्या पालेभाज्या वारंवार गरम केल्याने प्रतिकूल परिणाम होतो. यामुळे त्वचेवर पुरळ आणि डाग येऊ शकतात.

अंडी (Eggs) पुन्हा गरम करून खाणे आरोग्यावर परिणाम करते

अंडी पुन्हा गरम करून खाल्ल्याने शरीराला हानी पोहोचू शकते. अंडी पुन्हा गरम केल्यावर नायट्रोजनचे ऑक्सिडेशन होते, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. अंड्याची भाजी देखील पुन्हा गरम करू नका, यामुळे देखील नुकसान होऊ शकते.

myupchar.com च्या मते, भात आणि बटाटे तसेच हिरव्या पालेभाज्या, लाल मिरची आणि मशरूम यांना मायक्रोवेव्हमध्ये गरम करू नये. त्यांचे पौष्टिक घटक मारले जातात, शरीराचे नुकसान होते ते वेगळेच. त्यांना ताजे खाणे चांगले असते.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - पोटात संसर्ग: लक्षणे, कारणे...

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: December 18, 2020, 8:40 AM IST

ताज्या बातम्या