मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

नियमित मशरूम खाण्याचे आहेत अनेक फायदे; नैराश्य, चिंता कमी करण्यात गुणकारी

नियमित मशरूम खाण्याचे आहेत अनेक फायदे; नैराश्य, चिंता कमी करण्यात गुणकारी

मशरूम - मशरूमचे खाद्यपदार्थ दुसऱ्या दिवशी पुन्हा गरम करून खाऊ नयेत. मशरूम हे प्रथिनांचे चांगले स्त्रोत आहेत. त्यामध्ये खनिजे देखील आढळतात. परंतु मशरूम पुन्हा गरम केल्याने त्यातील प्रथिने निघून जातात आणि विषारी घटक तयार होतात, ज्यामुळे आपल्या पचनसंस्थेला हानी पोहोचते.

मशरूम - मशरूमचे खाद्यपदार्थ दुसऱ्या दिवशी पुन्हा गरम करून खाऊ नयेत. मशरूम हे प्रथिनांचे चांगले स्त्रोत आहेत. त्यामध्ये खनिजे देखील आढळतात. परंतु मशरूम पुन्हा गरम केल्याने त्यातील प्रथिने निघून जातात आणि विषारी घटक तयार होतात, ज्यामुळे आपल्या पचनसंस्थेला हानी पोहोचते.

संशोधकांनी 2400 लोकांच्या अन्न आणि आरोग्य डेटाच्या विश्लेषणाच्या आधारे हे सिद्ध केलं आहे की, जे लोक मशरूम खातात त्यांच्यामध्ये नैराश्यासारख्या (depression) आजाराची (mushrooms can lower depression) लक्षणं खूप कमी दिसतात.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : मशरूम खाण्यास अतिशय चवदार असतात. अनेकजण ते मटणासारखे बनवून खातात. मशरूम खाण्यास चवदार तर आहेच, पण अनेक रोगांच्या उपचारांमध्येही याचा वापर केला जातो. डेलीमेलच्या बातमीनुसार, मशरूमच्या खाण्यामुळे नैराश्यग्रस्त होण्याची शक्यता बरीच कमी होते. पेन स्टेट कॉलेज ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी हा दावा केला आहे. संशोधकांनी 2400 लोकांच्या अन्न आणि आरोग्य डेटाच्या विश्लेषणाच्या आधारे हे सिद्ध केलं आहे की, जे लोक मशरूम खातात त्यांच्यामध्ये नैराश्यासारख्या (depression) आजाराची (mushrooms can lower depression) लक्षणं खूप कमी दिसतात. जवळपास एक दशकाच्या संशोधनातून हे निष्कर्ष समोर आले आहेत.

दाहक-विरोधी गुणधर्म

आघाडीचे संशोधक डॉ. जोशुआ मस्कॅट (Dr. Joshua Muscat) म्हणाले की, मशरूम खाण्याचे इतर अनेक आरोग्य फायदे आहेत. त्यांनी सांगितले की मशरूममध्ये दाहक-विरोधी अमीनो अ‌ॅसिड आढळतात. या कारणास्तव, मशरूम आरोग्यासाठी फायदेशीर आहे. संशोधक डॉ. जिब्रिल बा यांनी सांगितले की, एर्गोथिओनिन (ergothioneine) मशरूममध्ये आढळते. हा असा दाहक-विरोधी घटक आहे जो मानव बनवू शकत नाही. म्हणजेच, हा अमीनो आम्ल मानवी शरीरात बनलेला नाही. हे फक्त मशरूममध्ये आढळते. एर्गोथिओनिनची उच्च पातळी ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करते.

हे वाचा - Mumbai: राज ठाकरेंच्या नावाखाली खंडणी मागणारी टोळी गजाआड, सिनेसृष्टीतील तिघांना ठोकल्या बेड्या

न्यूरॉन-ब्रेन कनेक्टिव्हिटीला गती देतं

पूर्वीच्या अभ्यासात असेही आढळले आहे की, मशरूमच्या सेवनाने स्किझोफ्रेनियाचा धोकाही कमी होतो. या व्यतिरिक्त, बायपोलर डिसऑर्डर आणि नैराश्याचा धोका कमी करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे. पांढऱ्या मशरूममध्ये अतिरिक्त पोटॅशियम आढळते, जे चिंता दूर करते. तथापि, संशोधकांनी नैराश्य टाळण्यासाठी कोणत्या प्रकारचे मशरूम खावे हे सांगितलेले नाही. एका अभ्यासात असे आढळून आले की मशरूममध्ये psilocybin नावाचे एक संयुग आढळते, ज्यामुळे मेंदूमध्ये न्यूरॉन कनेक्टिव्हिटीची सक्रियता 10 टक्के वाढते.

हे वाचा - ‘सोनाही सोना होगा…’ बप्पी लहरींच्या नातवामध्येही त्यांचीच छबी, गाण्याच्या VIDEO वर 24 लाखांपेक्षा जास्त Views

कर्करोगाशी लढण्यासाठी प्रभावी

मशरूममध्ये सेलेनियम आणि एर्गोथिओनिन नावाचे घटक रोग प्रतिकारशक्ती वाढवतात. याशिवाय मशरूममध्ये अ, ब आणि क जीवनसत्वे मुबलक असतात, ज्यामुळे रोगांशी लढण्याची क्षमता वाढते. मशरूममध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे शरीराला हानिकारक मुक्त रॅडिकल्सपासून वाचवतात. मुक्त रॅडिकल्स हे कर्करोगाचे सर्वात मोठे कारण आहे.

First published:

Tags: Health, Health Tips