उभं राहून जेवताय? सावधान! आरोग्याला आहे घातक

आजकाल तुम्ही पाहिलं असेल अनेक पार्टी, आणि लग्न कार्यक्रमात लोक उभं राहून जेवतात. पण त्याने आपलं काय नुकसान होतं हे कोणालाच माहीत नसतं.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Nov 20, 2017 07:02 PM IST

उभं राहून जेवताय? सावधान! आरोग्याला आहे घातक

20 नोव्हेंबर : मंडळी एक असा काळ होता जेव्हा लोक जमिनीवर बसून जेवायचे, पण हळूहळू हो काळ बदलत गेला. कालांतराने लोक टेबल-खुर्चीवर बसून जेवायला लागले. मग नंतरचा काळ असा काही बदलला की लोक आता उभं राहून जेवतात. आजकाल तुम्ही पाहिलं असेल अनेक पार्टी, आणि लग्न कार्यक्रमात लोक उभं राहून जेवतात. पण त्याने आपलं काय नुकसान होतं हे कोणालाच माहीत नसतं.

उभं राहून जेवल्यानं आरोग्याचं नुकसान

- उभं राहून जेवल्याने अपचन, लठ्ठपणा असे आजार उद्भवतात. असं म्हटलं जातं की उभं राहून खाल्ल्याने आपल्या शरीरातील आतड्या आकसल्या जातात आणि त्यामुळे खाल्लेलं पचायला त्रास होतो.

- उभं राहून जेवताना आपल्या पायात बूट किंवा चप्पल असते ज्यामुळे आपले पाय गरम पडतात. आयुर्वेदानुसार जेव्हा आपण जेवतो तेव्हा आपले पाय थंड असणं महत्त्वाचं आहे.

- बुफेमध्ये सारखं सारखं जाऊन जेवण घेण्यापेक्षा एकदाच काय ते जास्त ताटात वाढून घेतात. त्यामुळे काही वेळा आपण जास्त खातो आणि त्यामुळे अॅसिडिटी आणि लठ्ठपणासारखे त्रास होतात.

Loading...

- बसून जेवल्याने आपलं मन शांत आणि एकाग्र राहतं. पण उभं राहून जेवल्याने ती एकाग्रता राहत नाही.

- उभं राहून जेवताना अनेकदा आपण खूप घाईत जेवतो. त्यामुळे ठसका लागणे, किंवा नाकात घास जाण्यासारखे प्रकार होतात.

- खरं तर उभं राहून खाल्याने आपल्या शरीराला योग्य ते पोषक घटकही मिळत नाहीत.

त्यामुळे नेहमी प्रयत्न करा की तुम्ही जमिनीवर बसून जेवाल. तेच आरोग्यदायी असतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 20, 2017 07:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...