कधीतरी नाही तर दररोज जेवल्यानंतर खावी बडीशेप; फक्त एक-दोन नाही बरेच आहेत फायदे

कधीतरी नाही तर दररोज जेवल्यानंतर खावी बडीशेप; फक्त एक-दोन नाही बरेच आहेत फायदे

सामान्यपणे जेवल्यानंतर तोंडाला येणारा वास दूर करण्यासाठी अनेक जण बडीशेप (fennel) खातात. पण त्याचे आरोग्यासाठी खूप फायदे आहेत.

  • Last Updated: Sep 29, 2020 10:09 PM IST
  • Share this:

भारतातील कित्येक घरांमध्ये जेवणानंतर थोडी बडीशेप खाल्ली जाते. सामान्यपणे जेवल्यानंतर तोंडाला येणार वास दूर करावा हा यामागील हेतू असतो. माऊथ फ्रेशनर म्हणून बडीशेपचा वापर केला जातो. मात्र खरंतर बडीशेप फक्त तोंडाची दुर्गंधीच दूर करत नाही तर त्याचे आरोग्यासाठी बरेच फायदे आहेत.

बडीशेपमध्ये तांबे, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅगनीज, सेलेनियम, झिंक आणि मॅग्नेशियमसारखे क्षार आणि धातू असतात. बडीशेपमुळे पोटासंबंधी अनेक समस्या दूर होतात.

श्वासातील दुर्गंधी दूर करतं

बडीशेप एक उत्कृष्ट असा मुखवास आहे. यामुळे तोंडातील दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. तोंडातील लाळेचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे तोंडात अडकलेले अन्न कण लाळेबरोबर निघतात. तसंच बडीशेपचे अँटिबॅक्टेरिअल आणि अँटिइन्फ्लेमेटरी घटकही फायदेशीर ठरतात.

अपचन, बद्धकोष्ठता आणि सूज कमी होते

myupchar.com चे डॉ लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने अपचन, पोटात सूज येणं, पोट फुगणं, आंबट ढेकर येणं यासारख्या समस्यांपासून मुक्तता मिळते. जेवणानंतर एक चमचा बडीशेप खाल्ल्यानेही पोटदुखीपासून मुक्तता मिळते. अपचन झाल्यासारखं वाटत असेल तर बडीशेपचा चहा बनवून पिऊ शकता. पोटातील गंभीर समस्या दूर करण्यात त्याचे अँटिस्पास्मोडिक आणि कॅमेनेटिव्ह गुणधर्म फायदेशीर आहेत. अँटिस्पास्मोडिक म्हणजे पोट आणि आतड्यांसंबंधी अंगाचा आणि कॅमेनेटिव्ह म्हणजे असं औषध जे पोट फुगणं आणि गॅस यापासून आराम देतं.

वजन कमी करण्यात मदत करतं

बडीशेपमध्ये लघवीचं प्रमाण वाढवणारे गुणधर्म असतात. शिवाय यामुळे पचनही सुधारतं. चयापचय प्रक्रियेचा वेग वाढतो. वजन कमी करण्याचा हा एक नैसर्गिक मार्ग आहे. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर बडीशेप भाजून ठेवा आणि ती बारीक वाटून त्याची पूड दिवसभरात गरम पाण्यातून दोनदा घ्या.

रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी

बडीशेप हृदयाशी संबंधित समस्यांसाठीही फायदेशीर आहे. बडीशेपमध्ये उच्च रक्तदाब नियंत्रित करण्याची आणि वाढलेला रक्तदाब कमी करण्याची क्षमता असते. यामध्ये पोटॅशियमदेखील आहे, जे हृदयासाठी फायदेशीर असतं.

लाल रक्तपेशी वाढतात

बडीशेपमध्ये लोह, तांबे आणि हिस्टिडाइन भरपूर असते. लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी हे तिन्ही घटक आवश्यक असतात. बडीशेप खाल्ल्याने शरीरात लोह वाढण्यास मदत होते, ज्यामुळे हिमोग्लोबिनची निर्मिती होण्यास मदत होते. त्यामुळे विशेषतः गर्भवती महिलांसाठी बडीशेप चांगली मानली जाते.

कॅल्शियम वाढवण्यात उपयुक्त

बडीशेप खाल्ल्याने कॅल्शियम वाढण्यास मदत होते, ज्यामुळे हाडं मजबूत होतात. कॅल्शियम व्यतिरिक्त त्यात फॉस्फरस, मॅग्नेशियम, जीवनसत्त्वंही आहेत.

त्वचा निरोगी राहते

अँटीबॅक्टेरिअल आणि अँटीऑक्सिडंटने परिपूर्ण बडीशेप निरोगी त्वचेसाठी देखील खूप चांगली आहे. हा उपाय वापरल्याने मुरुम जाण्यात मदत होते आणि त्यातील अँटिऑक्सिडंट गुणधर्म ऑक्सिडेटिव्ह तणावाच्या दुष्परिणामांपासून मुक्त होण्यास मदत करतात.

अधिक माहिती सठी वाचा आमचा लेख - आरोग्यदायी आहार

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: September 29, 2020, 10:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading