वॉशिंग्टन, 12 नोव्हेंबर : अनेकांना स्पायसी, झणझणीत, मसालेदार पदार्थ खायला आवडतात. मात्र असे पदार्थ खाणं चांगलं नाही यामुळे आरोग्याला त्रास होऊ शकतो, असे कित्येक जण सांगतात. मात्र नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार मिरची (chilli) किंवा काळी मिरी (pepper) असं काही तिखट खाल्ल्यानं आयुष्य वाढू शकतं. हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोग किंवा कर्करोगाने अकाली मृत्यू होण्याचा धोका कमी होतो. हे गंभीर आजार बळावण्याचा धोका जवळजवळ एक चतुर्थांश कमी होतो.
शास्त्रज्ञ या आश्चर्यकारक वैशिष्ट्याचं श्रेय मिरच्यांमधील कॅप्सिसिनच्या अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मांना देतात. हा घटक मिरच्यांना तिखट चव देतं. हा घटक ट्युमर आणि उष्णतेशी लढा देत रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतं.
जगभरातील सुमारे 5,70,000 लोकांच्या आरोग्य आणि आहाराच्या रेकॉर्ड्सचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासाचे डिटेल्स चीन, इराण, इटली आणि अमेरिकेत झालेल्या काही जुन्या अभ्यासांमधून घेण्यात आले. संशोधकांनी सांगितलं की, जेवणात ताजी किंवा वाळलेली मिरची, काळी मिरी घालून त्याची फक्त चवच वाढत नाही तर मिठाचा वापरही कमी होते. जास्त प्रमाणात मिठाचे सेवन केल्याने रक्तदाब आणि हृदयविकार होऊ शकतो. मात्र तिखट काहीतरी खायचं म्हणून रेडिमेड चिली सॉस आणि स्पाईस मिक्स किंवा स्पाईस रब्सपासून दूर राहण्याचा सल्लाही शास्त्रज्ञांनी दिला आहे. कारण त्याच्यामध्ये सोडियमचं प्रमाण खूप जास्त असू शकतं.
हे वाचा - तुमच्या स्वयंपाकघरातच आहे प्रदूषणापासून होणारे आजार टाळण्याचं रहस्य !
लॉकडाऊनमुळे बरेच लोक घरी स्वयंपाक करत आहेत. हृदय तज्ज्ञांचं मत आहे की, मसाले आणि मिरची यांच्यावर प्रयोग करून निरोगी खाण्याच्या सवयी लावून घेण्याची ही चांगली वेळ आहे.
ओहायोमधील क्लेव्हलँड क्लिनिकचे बो झू या अभ्यासाचे प्रमुख अभ्यासक आहेत. त्यांनी सांगितलं, "हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधीचे सर्व आजार आणि कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी करण्यात घट आणण्यासाठी दररोज मिरची व मिरपूडीचं सेवन कारणं फायद्याचं ठरतं. मात्र याचा अर्थ मिरची खाल्ल्याने तुम्हाला दीर्घायुष्य लाभेल किंवा मृत्युचं प्रमाण कमी होईल असा काढू नका. याकडे फक्त कॅप्सॅसिनमधील चांगला गुणधर्म आणि आरोग्यासंदर्भातील सल्ला म्हणून पाहावं"
हे वाचा - नवऱ्यासाठी सावित्रीची धडपड; स्ट्रेचर न मिळाल्यानं पत्नीनं पतीला घेतलं पाठीवर
दरम्यान या अभ्यासाचे निकाल स्पष्ट किंवा ठोस नाहीत. तसंच कोणती मिरची अशा पद्धतीचं संरक्षण देते किंवा किती प्रमाणात सेवन केल्यावर ती फायद्याची ठरू शकते हे जाणून घेण्यासाठी अधिक अभ्यास करणं आवश्यक असल्याचंही संशोधक म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.