मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Rice with Roti : तुम्हीही जेवणात चपाती आणि भात एकत्र खाता का? असा होऊ शकतो त्रास

Rice with Roti : तुम्हीही जेवणात चपाती आणि भात एकत्र खाता का? असा होऊ शकतो त्रास

रोज दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात भात चपातीसोबत खाल्ल्याने तुमच्या कॅलरीजचे प्रमाण वाढते. यामुळे लठ्ठपणाची समस्याही उद्भवू शकते. काही लोक चपाती खाऊनही त्यावर भात मोठ्या प्रमाणात खातात. यामुळे अपचन आणि गॅसचा त्रास होऊ शकतो.

नवी दिल्ली, 03 डिसेंबर : दुपारचे जेवण असो किंवा रात्रीचे जेवण, बहुतेक लोकांना जेवताना चपाती आणि भात एकत्र खायला आवडतो. परंतु आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या जेवणाच्या सवयीचे काही तोटे देखील आहेत. चपाती आणि भात एकत्र खाल्ल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो त्याबद्दल (Rice with Roti) जाणून घेऊया.

'झी न्यूज'ने दिलेल्या हेल्थ बातमीनुसार, चपाती आणि भात एकत्र खाल्ल्याने पोटात जडपणा जाणवू शकतो आणि झोपही नीट लागत नाही. तज्ज्ञांच्या मते, तुम्ही भात खात असाल तर फक्त भात खा आणि जर तुम्ही चपाती खात असाल तर फक्त चपातीच खा.

हे वाचा - Health Tips: तुम्हाला माहीत आहे का? या गोष्टी शिजवून खाणं आरोग्यासाठी असतं अपायकारक

रोज दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात भात चपातीसोबत खाल्ल्याने तुमच्या कॅलरीजचे प्रमाण वाढते. यामुळे लठ्ठपणाची समस्याही उद्भवू शकते. काही लोक चपाती खाऊनही त्यावर भात मोठ्या प्रमाणात खातात. यामुळे अपचन आणि गॅसचा त्रास होऊ शकतो. खाण्याचे प्रमाण लक्षात घ्यावे.

हे वाचा - तुम्हीही प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात खाता ना? मग या गोष्टी तुम्हाला माहीत असाव्यात

रात्री भात खाण्यापेक्षा फक्त चपाती खाणे फायदेशीर आहे. दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्याने पोटाचे विकार होऊ शकतात. रात्री पचनक्रिया मंद असते, त्यामुळे हलके अन्न खावे. रात्री पचनासाठी चपाती योग्य ठरते. भात जास्त प्रमाणात खाल्ल्याने लठ्ठपणा आणि साखरेची समस्या उद्भवू शकते. यामुळे भविष्यात हृदय आणि किडनीशी संबंधित आजार होऊ शकतात.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही)

First published:

Tags: Health, Health Tips