News18 Lokmat

कलिंगड खा,कूल राहा

उन्हाळ्यात कूल राहायचं असेल तर लाल भडक कलिंगडाचं सेवन फार महत्त्वाचं आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 11, 2017 05:49 PM IST

कलिंगड खा,कूल राहा

11 एप्रिल : अंगाची लाहीलाही करणारा उन्हाळा एप्रिल महिन्यातच नकोसा वाटायला लागलाय. रणरणत्या उन्हात अगदी जीव कासावीस होतो. अशा वेळी वाढत्या उन्हाळ्यात कूल राहायचं असेल तर लाल भडक कलिंगडाचं सेवन फार महत्त्वाचं आहे. उन्हाळ्यात प्रामुख्याने कलिंगड फार मोठ्या प्रमाणत मिळतात. वाढत्या तापमानात शरीराचं संतुलन राखण्यासाठी कलिंगड कितपत उपयुक्त असतं ते आपण पाहुयात.

1. कलिंगडामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो. त्यामुळे उन्हाळ्यात कलिंगड खाल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढतं. फक्त कलिंगड खाण्याऐवजी कलिंगडाचा रस प्यायला तरी शरीरासाठी तो फायदेशीर ठरेल. शिवाय शरीराचं संतुलन राखण्यास मदतसुद्धा होते.

2. कलिंगड पिकल्यावर फार काळ टिकत नाही. त्यामुळे खेळत्या किंवा थंड हवेत कलिंगड ठेवलं तर ते 15-20 दिवस टिकतं. कलिंगड फार थंड असल्याने त्यावर मध किंवा मीठ टाकूनच खावं. तसंच ते गुणकारी असल्याने शरीराला थंडावा मिळतो.

3. कलिंगडामुळे त्यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते आणि शरीरातील उष्णतासुद्धा कमी होते.

4. उन्हाळ्यात अनेक आजारांवर कलिंगड उपायकारक ठरतं. शरीरातील सोडियम आणि पोटॅशियमचं प्रमाण वाढण्यासाठी कलिंगडाचं सेवन फार महत्त्वाचं आहे. तसंच कलिंगडात व्हिटॅमिन ए आणि सी असल्याने उन्हाळ्यात होणारी डोळ्यांची जळजळसुद्धा कलिंगडामुळे कमी होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 11, 2017 05:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...