दिल्ली, 27 मे : आजकाल बदलेल्या लाईफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या सर्वसामान्य बनलेली आहे. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. वेगवेगळी औषधं, व्यायाम किंवा डायटिंग या उपायाने वजन कमी (Weight loss tips) करण्याचा प्रयत्न केला जातो. डायटिंग करणारं काही लोक सर्वातआधी आपल्या आहारातून कर्ब्स काढून टाकतात. त्यासाठी चपाती (Chapati) आणि भात (Rice) वर्ज्य करतात. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी कोर्बोहायड्रेट घेण टाळावं लागतं हे खरं आहे. त्यामुळे वजन झपाट्याने कमी व्हायला लागतं. पण, त्यामुळे चपातीमधून मिळणारे पोषक घटकही कमी होतात.
एखाद्या नॉर्मल आकाराच्या चपातीमध्ये 4 ग्रॅम प्रोटीन, 17 ग्रॅम फायबर, 20-25 ग्रॅम कार्बोहाइड्रेट असतात. चपाती खाणं बंद केल्यास ते आपल्याला मिळत नाहीत.
याउलट काही लोकांना रोजच्या जेवणातून चपाती काढणं जड जातं. चपाती खाल्ली नाही तर, जेवणच केलं नाही असं वाटणारे आपल्याच आजूबाजूला असतील. अशा वेळेस वजन कमी करणारी चपातीही खाता येऊ शकते. गव्हाच्या चपातीला भाकरी हा पर्याय होऊ शकतो. गव्हापेक्षा इतर पिठांची भाकरी खाता येऊ शकते.
Long Working Hours : कामाचे अधिक तास ठरतायेत जीवघेणे; WHO चा धक्कादायक रिपोर्ट
बाजरीची भाकरी
बाजरीचं पिठ वजन कमी करण्यासाठी उपयोगी येऊ शकतं. यात मोठ्या प्रमाणात फायबर असतं. शिवाय हे ग्लूटन-फ्री असंत ज्यामुळे वेट लॉसला तर फायदा होतोच.पण, यातील सीलिएक डिजीज (Celiac Disease) पोटाच्या विकारातही फायदेशीर आहे. यात मॅग्नेसिअम आणि व्हिटॅमीन असतात. शिवाय हा प्रोटीनचा मोठा स्त्रोत आहे.
(Diabetes पेशंट आजच सोडा गाईचं दुध पिणं; शुगर होईल अनियंत्रीत)
ओट्स
वेट लॉससाठी ओट्स फायदेशीर आहे. लवकर वजन कमी करायचं असेल तर, रोजच्या जेवणात ओट्सच्या पीठच्या चपातीचा वापर करा. ओट्स खुप हेल्दी आहेत. यातील व्हिटॅमिन-बी आणि फायबर मुळे आपलं वजन अजिबात वाढणार नाहीत.
बदामाचं पिठ
बदाम हे फायबरचा मोठा स्त्रोत आहेत. केटो डाएट फॉलो करणारे लोक आपल्या आहारात बदामाच्या पीठाचा वापर करू शकतात. वजन कमी करण्यात फायबरची भूमिका खूप महत्वाची असते. बदामात फायबरचं प्रमाण जास्त असतं आणि कार्बोहायड्रेट कमी असतात. यातील हेल्दी फॅट आणि प्रोटीन आपल्या शरीराला पोषक द्रव्य तर देतात त्याबरोबर आपलं पोट बराच वेळ भरलेल राहतं. याव्यतिरिक्त, बदामांमध्ये फायटिक ऍसिडचं प्रमाण अगदी कमी असतं,ज्यामुळे ते लवकर पचतं.
( 16 तास अंघोळ करत राहिली, तरुणीची झाली भयंकर अवस्था; VIDEO पाहून नेटिझन्सही शॉक)
ज्वारी भाकरी
ज्वारीच्या पिठामध्ये मिनरल्स आणि व्हिटॅमीन असतात. यामध्ये व्हिटॅमिन बी,मॅग्नेशियम,आयर्न,झिंक यासारखे महत्त्वाचे पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात. यामध्ये प्रोटीन आणि फायबर देखील असतं,ज्यामुळे वजन कमी करण्यात मदत मिळते. ज्वारीच्या पिठाची भाकरीचे गव्हाच्या चपातीपेक्षा लवकर पचते.
रागी
लॉस डायटमध्ये रागी महत्वाची आहे त्यामुळे आपलं पोट बराच काळ भरलेलं राहतं. रागीत फायबर, आयर्न आणि कॅल्शियम असतं. ज्यामुळे आपलं वजन सहजपणे कमी होतं आणि हाडंही मजबूत होतात. याशिवाय गव्हाच्या पिठाच्या चपातीपेक्षा रागीच्या पिठाची भाकरीही लवकर पचते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Weight loss, Weight loss tips