Home /News /lifestyle /

पावसाळ्यात रोज खा एक प्रोबायोडिक्स फूड; बद्धकोष्ठतेचा त्रास होईल कमी

पावसाळ्यात रोज खा एक प्रोबायोडिक्स फूड; बद्धकोष्ठतेचा त्रास होईल कमी

दही सर्वात महत्वाचं नॅचरल प्रोबायोटिक आहे.

दही सर्वात महत्वाचं नॅचरल प्रोबायोटिक आहे.

Probiotic Foods For Digestion : पचनासंबंधी तक्रारी असतील तर, आहारात प्रोबायोटिक पदार्थांचा समावेश करा नक्की फायदा होतो.

    नवी दिल्ली, 13 ऑगस्ट : पावसाळ्यात आहार हलका (Light Diet In Rainy Season) घ्यावा लागतो कारण, या काळात अन्न पचनाच्या समस्या  (Digestive Problems)होऊ शकतात. पावसाळ्यात बॅक्टेरिया आणि व्हायरस (Bacteria & Viruses) वाढलेले असतात. त्यामुळे खाण्यापिण्यात झालेली चूक त्रासदायक ठरते. खाण्याकडे थोडसही दुर्लक्ष केल्याने पोटदुखी किंवा अपचनाची (Indigestion) समस्या उद्भवू शकते. त्यामुळे  आपलं पोट आणि आतडं निरोगी राहिल असा आहार घेतला तर, त्रास टाळता येऊ शकतात. पचन चांगलं राहण्यासाठी पोटातील बॅड बॅक्टेरिया (Bad Bacteria) कमी करून गुड बॅक्टेरीया वाढवण्याकडे लक्ष द्यायला हवं. प्रोबायोटिक पदार्थ (Probiotic Food) आपल्या शरीरातील चांगलं जीवाणू वाढवण्याचं काम करतात. शरीरात जेव्ही गुड बॅक्टेरिया (Good Bacteria) वाढतात, तेव्हा आपली पचनसंस्था आणि इम्यूनिटी (Immunity)सुद्धा चांगली होते डिप्रेशनचा (Depression) त्रास असेल तर तोसुद्धा प्रोबायोटिक घेण्याने दूर राहतो. प्रोबायोटिक घ्यायला सुरुवात केली तर, आजारपण कमी येतात. आपण वर्षभर निरोगी राहतो. प्रोबायोटिक फूड्स म्हणून आपण कोणते पदार्थ घेऊ शकतो हे जाणून घेऊयात. (या गोष्टी मुलांपुढे चुकूनही नका करू; पालकच असतात मुलांचे पहिले गुरू) दही दही सर्वात महत्वाचं नॅचरल प्रोबायोटिक आहे. त्यामुळे रोजच्या आहारात दही घेतलं तर, आतडं निरोगी राहिल्याने पचन व्यवस्था चांगली राहते. रोज दही,ताक,लस्सी घेऊ शकता. (नको वजनाची चिंता! रोज खा ही हेल्दी खीर; वाढलेली चरबी होईल कमी) इडली आणि डोसा तांदूळ आणि डाळींपासून इडली आणि डोसा तयार केला जातो. यासाठी फर्मेन्टेशन केलं जातं. त्यामुळे त्याची पोषकता वाढते. ज्यामुळे शरीराला अधिक पोषण मिळते. (कधी हे ऐकलं होतं का? प्रत्येक अवयवासाठी असतो वेगवेगळा आहार) पनीर पनीर हा प्रोबायोटिक्सचा समृद्ध स्रोत आहे. कच्चं किंवा शिजवलेलं कोणत्याही प्रकारे पनीर खाल्लं तर ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे. फर्मंन्टेड सोयाबीन फर्मंन्टेड सोयाबीन चटणी,लोणचं स्वरूपात खाऊ शकता. फर्मंन्टेड सोयाबीन  प्रथिनांचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. (कसा असतो मृत्यू? मरणाच्या दारातून परत आलेल्यांचा थरारक अनुभव) मिसो सूप जपानी मिसो सूप हे आंबवलेल्या सोयाबीन पेस्टपासून तयार केलं जातं. त्यात भरपूर पोषक घटक आहेत. मिसो सूप खूप चांगलं मानलं जातं. मिसो सूप ऑनलाईन सहज खरेदी करू शकतो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle, Superfood

    पुढील बातम्या