Home /News /lifestyle /

झोपण्याआधी गूळ खा, पळून जातील हे आजार

झोपण्याआधी गूळ खा, पळून जातील हे आजार

गूळ खाल्ल्याने अनेक आजार बरे होतात. औषध म्हणून गूळ कसा खावा आणि कुठले आजार त्याने बरे होतात? जाणून घ्या

  • myupchar
  • Last Updated :
    स्वयंपाकघरातील गूळ अनेक पदार्थ बनवण्यासाठी उपयोगी आहे, पण तो औषधीही आहे. साखरेपेक्षा गूळ अधिक चविष्ट आणि पौष्टिक आहे. गूळ खाल्ल्याने अनेक आजार बरे होतात. तर चला माहिती घेऊ औषध म्हणून गूळ कसा खावा आणि कुठले आजार त्याने बरे होतात. - गुळाने पचन चांगले होते. गुळात तंतूमय पदार्थ जास्त असतात. त्याने पचनक्रिया चांगली होते. अनेकदा घरातील ज्येष्ठांकडून ऐकले असेल की जेवणानंतर गूळ खाल्ल्याने जेवण लवकर पचते. म्हणून गुळ खावा. रात्री झोपतांना पण जर गूळ खाल्ला तर पचन चांगले होते आणि सकाळी बद्धकोष्ठतेचा, अपचनाचा त्रास होत नाही. गुळाने रक्तक्षय दूर होतो शरीरातील लोहाचे प्रमाण कमी झाले कि रक्तक्षय होतो. महिलांमधे ही समस्या जास्त दिसते, कारण पाळीच्या काळात रक्तस्त्राव होतो, आणि लाल रक्तपेशी कमी होतात. त्यांनी गुळ खाल्ल्याने त्यांना फायदा होतो. गुळात लोह जास्त प्रमाणात असते. रक्तक्षय असणाऱ्यांनी गुळासोबत चणे खावे त्याने लोहाचे प्रमाण लवकर वाढते. myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांच्यानुसार , दूध आणि गुळ खाल्ला तरी रक्तक्षय दूर होतो. रोग प्रतिकारशक्ती वाढवतो गुळ शरीरातील रोग प्रतिकारकशक्ती कुठल्याही आजारापासून वाचवते, जर ती कमजोर असेल तर शरीर जीवाणू-विषाणूमुळे होणार्या आजारांपासून स्वतःला वाचवू शकत नाही. गुळात झिंक आणि जीवनसत्व सी या सोबत अनेक पोषक द्रव्ये असतात, ते हंगामी आजारांपासून आपल्याला वाचवतात. वजन घटवण्यासाठी उपयुक्त जर वजन कमी करायचे असेल तर गुळाचे पाणी उपयुक्त आहे. अनेक डाइटिशियन लठ्ठपणा कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्यापोटी गुळाचे पाणी प्यायचा सल्ला देतात, त्याने शरीराची चरबी कमी होते. रक्तदाब संतुलित ठेवतो myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांच्यानुसार, अनियमित दिनचर्या आणि अयोग्य खानपान याने लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते. गुळात पोटेशियम असल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. गुळाने किडनी स्टोन आणि ऑस्टियोपोरोसिसची समस्यापण ठीक होते. यकृत साफ राहते यकृत शरीराचे सगळ्यात महत्वपूर्ण अंग आहे. त्याची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. ते एकप्रकारचे शरीराचे पॉवर हाउस आहे. यकृतात थोडा जरी बिघाड झाला, तर अन्य अवयवांवर त्याचा परिणाम होतो. यकृताला चांगले ठेवण्यासाठी रात्री गुळ गरम पाण्यासोबत घ्यावा, त्याने फायदा होतो. यकृत कमजोर होण्याची समस्या कधीच होणार नाही. अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - पोट, यकृत, तोंड आणि पचनाशी संबंधित आजार न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
    First published:

    Tags: Health

    पुढील बातम्या