मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /रात्रीच्या जेवणात गव्हाच्या चपातीऐवजी खा बेसन पोळी; उपाशी न राहता वजन घटवण्याचा उपाय

रात्रीच्या जेवणात गव्हाच्या चपातीऐवजी खा बेसन पोळी; उपाशी न राहता वजन घटवण्याचा उपाय

तुम्हाला वेगवेगळ्या धान्यांची चव आवडत असेल तर रात्री गव्हाच्या पिठाच्या रोटी ऐवजी (चपाती) बेसनाची रोटी (Besna Roti) खा. ही रोटी चटणी किंवा लोणच्यासोबतही खूप चवदार लागते.

तुम्हाला वेगवेगळ्या धान्यांची चव आवडत असेल तर रात्री गव्हाच्या पिठाच्या रोटी ऐवजी (चपाती) बेसनाची रोटी (Besna Roti) खा. ही रोटी चटणी किंवा लोणच्यासोबतही खूप चवदार लागते.

तुम्हाला वेगवेगळ्या धान्यांची चव आवडत असेल तर रात्री गव्हाच्या पिठाच्या रोटी ऐवजी (चपाती) बेसनाची रोटी (Besna Roti) खा. ही रोटी चटणी किंवा लोणच्यासोबतही खूप चवदार लागते.

नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी : तंदुरुस्त राहण्यासाठी आजकाल लोक वेगवेगळे प्रयत्न करतात. चुकीची जीवनशैली, खराब आहार यामुळे अनेकांना वजन वाढीचा त्रास सहन करावा लागत आहे. वजन कमी तर करायचे आहे मात्र, उपाशी राहू शकत नसाल तर खाण्यापिण्यात छोटे बदल करून तुम्ही स्वतःला मेंन्टेन ठेवू शकता. वजन नियंत्रणात (Weight control) राहिल्यानं तुम्ही स्मार्ट दिसताच पण आरोग्याच्या दृष्टीनेही ते खूप महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या डिनरमध्ये (Dinner diet for weight Loss) काही बदल करू शकता. जर तुम्हाला वेगवेगळ्या धान्यांची चव आवडत असेल तर रात्री गव्हाच्या पिठाच्या रोटी ऐवजी (चपाती) बेसनाची रोटी (Besna Roti) खा. ही रोटी चटणी किंवा लोणच्यासोबतही खूप चवदार लागते. मसूर, पनीर किंवा कोणत्याही भाजीसोबत खाल्ली तरी चव तर येईलच त्याचबरोबर रात्री कार्बोहायड्रेट खाणं टाळता (weight Loss Tips) येईल.

जास्त वेळ भूक लागत नाही

हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, वजन कमी करणारे बहुतेक लोक रात्री कार्बोहायड्रेट खाणं टाळतात. या चक्करमध्य काहीजण फक्त डाळी पिऊन किंवा हलका प्रोटीन आहार घेऊन झोपतात. मात्र, अनेकवेळा भात किंवा रोटीशिवाय पोट भरत नाही. यासाठी संध्याकाळी जेवणात बेसनाची रोटी खाऊ शकता. बेसनमध्ये प्रोटीन आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. त्याची पोळी खाल्ल्याने तुम्हाला खूप वेळ भूकही लागत नाही. अधूनमधून उपवास करणाऱ्यांसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

हे वाचा - किडनी खराब होऊ लागल्याची अशी असतात 4 लक्षणं; त्वचेवरील या बदलांकडे दुर्लक्ष नको

बेसन रोटी कशी बनवायची

बेसनमध्ये प्रथिने, फोलेट, जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर असतात. त्यात कॅलरीजही कमी असतात. यासोबतच साखरेवरही नियंत्रण राहते. बनवायला खूप सोपे आहे. बेसनात थोडे मीठ घालावे. बारीक चिरलेला कांदा, धणे, हिरवी मिरची घालून पीठ मळून घ्या. या पिठापासून रोटी बनवून त्यात तूप घालून खा. रोटी इतकी चविष्ट असते की ती तुम्ही फक्त लोणची, चटणी किंवा कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता.

हे वाचा - लसणाला कोंब आले म्हणून लगेच फेकू नका; आरोग्यासाठी त्याचे आहेत दुप्पट फायदे

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Weight, Weight loss tips