मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /High Blood Pressure: उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी रोज दही खा; जाणून घ्या ही पद्धत

High Blood Pressure: उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी रोज दही खा; जाणून घ्या ही पद्धत

Curd/Yogurt For High BP : रोजच्या आहारात दह्याचा समावेश केल्यास उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. हे संशोधन युनिव्हर्सिटी ऑफ साउथ ऑस्ट्रेलिया आणि यूएसए युनिव्हर्सिटी ऑफ मेनच्या शास्त्रज्ञांनी संयुक्तपणे केलं आहे. यामध्ये, रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित जोखीम घटकांवर दही खाण्याचा परिणाम तपासण्यात आला.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 09 डिसेंबर : आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत उच्च रक्तदाब ही एक सामान्य समस्या बनली आहे. भारताबद्दलच बोलायचे झाल्यास 2020 मध्ये सुमारे 15 टक्के लोकांना उच्च रक्तदाब असल्याचे समोर आले. एका अहवालानुसार, गेल्या 4 वर्षांत उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सुमारे 35 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबात हा आजार सुरू आहे. याविषयीच्या एका नव्या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, रोजच्या आहारात दह्याचा समावेश केल्यास उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. हे संशोधन युनिव्हर्सिटी ऑफ साउथ ऑस्ट्रेलिया आणि यूएसए युनिव्हर्सिटी ऑफ मेनच्या शास्त्रज्ञांनी संयुक्तपणे केलं आहे. यामध्ये, रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित जोखीम घटकांवर दही खाण्याचा परिणाम तपासण्यात आला. ज्यामध्ये संशोधकांना असे आढळून आले आहे की, उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी रोज दही खाल्ल्यास बीपी कमी करण्यास मदत होते. या अभ्यासाचे निष्कर्ष 'इंटरनॅशनल डेअरी जर्नल'मध्ये प्रसिद्ध झाले (Eat Curd/Yogurt To Control High Blood Pressure) आहेत.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार, जगभरातील एक अब्जाहून अधिक लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, ज्यामुळे त्यांना हृदयाशी संबंधित समस्या म्हणजे CVD, जसे की हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका जास्त असतो. CVD हे जगभरातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे. यामुळे, अमेरिकेत दर 36 सेकंदाला एका व्यक्तीचा CVD मुळे मृत्यू होतो. ऑस्ट्रेलियामध्ये हा दर 12 मिनिटांचा आहे.

हे वाचा - बिपीन रावत यांच्या निधनानं निर्माण झाली पोकळी, पुढच्या 7 दिवसांत होऊ शकते नव्या CDS ची नियुक्ती

तज्ज्ञ काय म्हणतात

संशोधक डॉ. अलेक्झांड्रा वेड म्हणाल्या, 'उच्च रक्तदाब असलेल्या लोकांमध्ये बीपी नियंत्रणासाठी दही उपयुक्त ठरू शकते. उच्च रक्तदाब हा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा सर्वात महत्वाचा जोखीम घटक आहे, म्हणून आपण ते कमी करण्याचे आणि नियंत्रित करण्याचे मार्ग शोधत राहणे महत्त्वाचे आहे.

डॉ. अलेक्झांड्रा वेड पुढे म्हणाल्या, 'दुग्धजन्य पदार्थ, विशेषत: दही बीपी कमी करण्यासाठी उपयोगी आहे. याचे कारण म्हणजे दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसह अनेक सूक्ष्म पोषक घटक असतात, जे बीपी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. ते म्हणाले की दही अधिक प्रभावी आहे कारण त्यात बॅक्टेरिया देखील असतात, ज्यामुळे रक्तदाब कमी होतो.

हे वाचा - Health News : प्लास्टिकमुळे गंभीर हृदयविकार होऊ शकतात, नवीन संशोधनातील माहिती

संशोधन कसे झाले?

संशोधकांनी या अभ्यासात 915 लोकांचा समावेश केला. अभ्यासात असे दिसून आले की जे लोक नियमितपणे दही खातात, त्यांचा रक्तदाब दही न खाणाऱ्या लोकांपेक्षा सुमारे 7 पॉईंटने कमी होता. संशोधकांनी सांगितले की, जोखीम घटक असलेल्या लोकांवर दहीचे संभाव्य फायदे तपासण्यासाठी भविष्यात अधिक अभ्यास करणे आवश्यक आहे.

First published:

Tags: Health, Health Tips