Home /News /lifestyle /

पावसाळ्यात नक्की खा 'भुट्टा'; इम्युनिटी आणि त्वचेची चमक वाढवण्यासोबत होतात अनेक फायदे

पावसाळ्यात नक्की खा 'भुट्टा'; इम्युनिटी आणि त्वचेची चमक वाढवण्यासोबत होतात अनेक फायदे

जर तुम्हीही पावसाळ्यात तळलेले पदार्थ खाण्याचे शौकीन असाल तर तुम्ही कॉर्न जरूर खावे. तोंडाची चव वाढवण्यासोबतच हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कॉर्न खाल्ल्याने किती फायदे होतात याबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

  'मुंबई, 05 ऑगस्ट : पावसाळ्यात काहीतरी गरमागरम खायला आवडतं. या हंगामात मला पहिली गोष्ट आठवते ती म्हणजे मक्याचे कणीस याला कॉर्न किंवा भुट्टादेखील म्हणतात. पावसाच्या सरींचा आनंद घेताना गरमागरम भाजलेल्या कॉर्नची चव क्वचितच कुणाला आवडत नसेल. पण कॉर्न चवीसोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. आज आम्ही तुम्हाला कॉर्न खाल्ल्याने तुमच्या आरोग्यासाठी कोणते फायदे होतात याबद्दल माहिती देणार आहोत. चांगली पचनक्रिया कॉर्न खाल्ल्याने शरीराची पचनक्रिया मजबूत होते. ज्या लोकांना पचनाची समस्या आहे, त्यांनी मक्याचे सेवन नक्कीच करावे. कॉर्नमध्ये भरपूर फायबर असते. जे पचनक्रिया मजबूत करण्यास मदत करते. डोळ्यांसाठी फायदेशीर कॉर्न डोळ्यांसाठीही फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए असल्यामुळे ते दृष्टी वाढवते. यासोबतच त्यामध्ये असलेले कॅरोटीनॉइड्सही डोळ्यांसाठी चांगले असतात. Excess Of Salt: जेवणात तुम्ही पण वरून मीठ घेताय का? या आरोग्य समस्या वेगात वाढतील त्वचेची चमक वाढवते कॉर्नमधील अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण त्वचा सुधारण्यास मदत करते. भरपूर कॉर्न खाल्ल्याने त्वचेचे रंगद्रव्य म्हणजेच पिगमेंटेशनही दूर होते. रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते कॉर्नमध्ये लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी इत्यादी मुबलक प्रमाणात आढळतात. जे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करण्याचे काम करतात. जे लोक नियमितपणे कॉर्नचे सेवन करतात. त्यांची रोगप्रतिकारशक्ती खूप मजबूत असते. हाडे मजबूत होतात हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शियमची गरज असते. हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता असल्यास हाडे कमकुवत होऊ लागतात. कॉर्नमध्ये असलेले कॅल्शियम घटक हाडे मजबूत करण्यास मदत करतात. त्यामुळे कॉर्न भरपूर सेवन करावे. खोकल्यामध्ये मिळतो अराम सर्दी-खोकला यांसारख्या आजारांमध्येही कॉर्नचा फायदा होतो. एक चमचा मक्याची पावडर कोमट पाण्यात टाकून प्यायल्याने खोकल्यामध्ये आराम मिळतो. किडनी स्टोनसाठी फायदेशीर कॉर्नमध्ये असलेल्या फायबरनेही स्टोन रोग बरा होऊ शकतो. ज्यांना स्टोनची समस्या आहे त्यांनी रात्री कॉर्नचे रेशम म्हणजेच धागे पाण्यात भिजवून सकाळी ते गाळून प्यावे. त्यामुळे किडनी स्टोनची समस्या लवकर दूर होते.

  Pregnancy Tips : गरोदरपणात कॉफी पिणे सुरक्षित असते का? आरोग्यावर कसा होतो परिणाम?

  गर्भवती महिलांनी कॉर्न कॉर्न गर्भवती महिलांसाठी खूप फायदेशीर आहे, कारण त्यात फॉलिक अॅसिड भरपूर असते. गर्भवती महिलेला सुरुवातीपासूनच फॉलिक अॅसिडचे औषध दिले जाते, ज्यामुळे गर्भाचा विकास होण्यास मदत होते. मका नैसर्गिकरित्या फॉलिक ऍसिडचा पुरवठा करू शकतो.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Health Tips, Lifestyle, Monsoon

  पुढील बातम्या