मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Easy Weight Loss Tips: लय भारी! झोपेदरम्यानही वजन करता येतं कमी; फक्त या सवयी बदला

Easy Weight Loss Tips: लय भारी! झोपेदरम्यानही वजन करता येतं कमी; फक्त या सवयी बदला

Easy Weight Loss Tips: झोपेदरम्यानही वजन कमी करता येतं; फक्त या सवयी बदला

Easy Weight Loss Tips: झोपेदरम्यानही वजन कमी करता येतं; फक्त या सवयी बदला

Easy Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात, परंतु झोपेदरम्यानही (Sleep) तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता, हे तुम्हाला माहित आहे का? नाही ना? होय, हे शक्य आहे. परंतु त्यासाठी तुम्हाला काही सवयी बदलण्याची गरज आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 26 जून : आपण स्लिम आणि फिट (Slim and Fit) दिसावं असं प्रत्येकाला वाटतं. लोक त्यासाठी खूप मेहनतही घेतात. धावणं, व्यायाम करणं, पोहणं, चालणं असं आपल्या परिने जे काही करता येईल, ते लोक करत असतात. चांगला आहार आणि व्यायामाचा नित्यक्रम पाळल्यास, आपण चांगले वजन कमी करू शकता.

पण फक्त झोपूनसुद्धा तुम्ही वजन कमी (Weight loss) करू शकता, असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर त्यावर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना? परंतु एका संशोधनात असं म्हटलं आहे की, तुम्ही वजन कमी करण्यासाठी झोपेच्या तंत्रांचे (weight loss while sleeping) अनुसरण करू शकता.

संशोधन काय सांगते?-

झोपताना वजन कसे कमी करायचे यावर बरेच संशोधन झाले आहे. 2021 च्या अभ्यासात असे आढळून आले आहे की स्लीप एपनिया असलेल्या लोकांचे 12 महिन्यांत जास्त वजन आणि चरबी कमी झाली. या काळात त्यांनी शांत आणि पुरेशी झोप घेतली होती.

या सवयी बदला-

1) झोपण्याची वेळ ठेवा-

जर तुम्ही दररोज ठराविक वेळी झोपलात तर तुमच्या शरीराला त्या वेळी झोपण्याची सवय होईल. अशा स्थितीत जर तुम्ही दिवसभर थकून झोपलात तर तुम्हाला लगेच झोप लागेल आणि 7 ते 8 तासांची गाढ झोप वजन कमी करण्यास उपयुक्त ठरेल.

हेही वाचा- तुम्हालाही जान्हवी कपूरसारख्या जाड आणि घनदाट भुवया हव्या आहेत? फॉलो करा या 5 सोप्या टिप्स

२) ब्लँकेटशिवाय झोपा-

जेव्हा तुम्ही थंड तापमानात झोपता तेव्हा तुमची चयापचय क्रिया वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे जास्त कॅलरी जाळण्यास मदत होते. अहवालानुसार, ज्या ठिकाणी तुम्ही झोपता त्या खोलीचे तापमान कमी केल्याने चांगल्या ब्राऊन फॅटचे प्रमाण वाढते. त्यामुळे शरीराला रक्तातील अतिरिक्त साखरेपासून मुक्त होण्यास आणि अधिक कॅलरी बर्न करण्यास मदत होते.

३) जेवणानंतर काही तासांनी झोपा-

जेवल्यानंतर लगेच झोपलात, तर त्यामुळे तुमच्या पचनामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे तुमची चयापचय क्रिया नीट होत नाही. अशा स्थितीत झोपण्याच्या किमान २ ते ३ तास ​​आधी अन्न खावे.

हेही वाचा-  पाणी प्यायल्यानेही वाढू शकतं Blood Pressure? संधोधनात समोर आली धक्कादायक माहिती

4) चांगल्या झोपेसाठी खोली तयार करा-

जेव्हा तुम्ही झोपत असाल तेव्हा कमीत कमी प्रकाश खोलीत ठेवा कारण तेजस्वी प्रकाश झोपेत अडथळा आणू शकतो. झोपताना नेहमी स्वच्छ चादरीवर झोपा.

टीप- झोपेचे तंत्र चयापचय दराच्या आधारावर कार्य करते. हे तंत्र प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळे असू शकते.

First published:

Tags: Weight loss, Weight loss tips